Western Railway: ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची जलद लोकल सेवा ठप्प; ऐन सकाळी चाकरमान्यांची फरफट

Western Railway: आज सकाळी 5.50 वाजता बोरीवली ते विरार दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली.

Western Railway: ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची जलद लोकल सेवा ठप्प; ऐन सकाळी चाकरमान्यांची फरफट
ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची जलद लोकल सेवा ठप्प; ऐन सकाळी चाकरमान्यांची फरफटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 7:43 AM

मुंबई: पश्चिम रेल्वेवर (Western Railway) बोरीवली ते विरार दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली (overhead wire snaps) आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील जलद लोकल (fast local) बंद आहेत. पाऊण तासापूर्वी ही ओव्हरहेड वाहर तुटली आहे. बोरिवली-विरार रेल्वे मार्गाची ओव्हरहेड वायर तुटल्याने बोरिवली ते विरार जलद लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. विरार ते बोरिवली आणि बोरीवली ते विरार या जलद लोकल सेवा सुमारे अर्धा तास बंद आहेत. त्यामुळे ऐन सकाळीच ओव्हरहेड वायर तुटल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या विरार ते बोरिवली आणि बोरिवली ते विरार ये-जा करण्यासाठी धीम्या लोकल सेवा सुरू आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड वायर बांधण्याचे काम हाती घेतले आहे. युद्धपातळीवर हे काम सुरू असून लवकरच दुरुस्तीचे काम करून लोकल सेवा पूर्ववत केली जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं. मात्र, कितीवेळेत हे काम पूर्ण होईल हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही.

आज सकाळी 5.50 वाजता बोरीवली ते विरार दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेने येणारी जलद लोकलसेवा बंद झाली आहे. तसेच चर्चगेटहून विरारकडे जाणारी लोकलही बंद झाली आहे. लोकल ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारून लोकल मार्गावरून जवळचं रेल्वे स्टेशन गाठलं. तसेच स्लो लोकल सुरू असल्याने प्रवाशांनी स्लो लोकलमधून प्रवास सुरू केला आहे. मात्र, फास्ट लोकलची गर्दी स्लो लोकलकडे वळल्याने रेल्वे स्थानकांमध्ये तुफान गर्दी झाली. दहीसर ते बोरीवली या मार्गावर चाकरमान्यांची तुफान गर्दी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रवाशांचा खोळंबा

आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने लोकलने कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा प्रचंड खोळंबा झाला आहे. फास्ट लोकल बंद झाल्याने चाकरमान्यांना स्लो लोकल पकडावी लागत आहे. मात्र, स्लो लोकललाही तुफान गर्दी झाल्याने अनेक प्रवाशांना लोकलमधून लटकंती करतच प्रवास करावा लागत आहे.

रोज मरे…

दरम्यान, सकाळी सकाळी लोकल बंद झाल्याने चाकरमान्यांचा पारा चढला आहे. अनेक चाकरमान्यांनी हे आता रोजचंच झाल्याचं सांगितलं आहे. लोकल का बंद आहेत? कधी सुरू होतील? पर्यायी व्यवस्था काय आहे याबाबतची माहिती रेल्वेकडून दिली जात नाही. त्यामुळे कामावर जायचं कसं असा प्रश्न पडल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.