नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडेंनी फ्रॉड केला? मलिकांच्याविरोधात कोर्टात जाणार वानखेडे?
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी फ्रॉड केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांचे आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. (Will take legal action against Nawab Malik, says sameer wankhede)
मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी फ्रॉड केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांचे आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांनी या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे समीर वानखेडे हे आता मलिक यांना कोर्टात खेचणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्म दाखला ट्विट करून इथूनच फ्रॉड सुरू झाल्याचं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात खोडसाळ आरोप केले जात असल्याचं सांगत त्याला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी ते सेशन कोर्टातही रवाना झाले आहेत.
कोर्टात निवेदन देणार
गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंबाबत अनेक माहिती पुढे येत आहे. तसेच त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोपही केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर वानखेडे आणि एनसीबीचे विशेष सरकारी वकील यांच्या चर्चा झाली. विशेष सरकारी वकील यांच्या दालनात चर्चा होती. गुन्हा क्रमांक 94/21 बाबत ही चर्चा सुरू होती. या गुन्ह्या बाबत समाज माध्यमावर सतत चर्चा सुरू आहे. अनेक पंचांची नाव उघड होत आहेत, एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहे, या पार्श्वभूमीवर कोर्टाला काय माहिती द्यायची याबाबत चर्चा सुरू होती. या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये, कारवाईवरही परिणाम होऊ नये, याबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर एक सविस्तर निवेदन विशेष एनडीपीएस कोर्टात सादर केलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली
अंतर्गत चौकशी होणार?
दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांची एनसीबीनेही घेतली आहे. पंचानीच वानखेडेंवर आरोप केल्याने वानखेडेंची खात्यांतर्गत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एनसीबीने वानखेडेंना दिल्ली मुख्यालयात बोलावलं असून उद्या ते दिल्लीला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंचांनीच आरोप केल्यामुळे वानखेडे गोत्यात आले आहेत. पंचांनी आर्थिक व्यवहाराचेच आरोप केल्याने एनसीबीची बदनामी होत आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मलिक म्हणतात, फर्जिवाडा
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे. नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हे पत्रकार परिषद घेत समोर आणले होते.
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 25 October 2021https://t.co/kX28rfXUdJ#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021
संबंधित बातम्या:
शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई
RTPCR कोडवर्ड वापरुन क्रूझवर प्रवेश, पार्टी सुरु होताच छापा, समीर वानखेडेंची पुन्हा डॅशिंग कामगिरी
(Will take legal action against Nawab Malik, says sameer wankhede)