VIDEO: शिवसेना-भाजपमध्ये कोण दुरावा निर्माण करतंय?; संजय राऊतांकडून पहिल्यांदाच नाव जाहीर

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपमधील नातेसंबंधावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे, असं सांगतानाच नारायण राणे या एका व्यक्तीमुळे हे नातं बिघडलं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. (sanjay raut)

VIDEO: शिवसेना-भाजपमध्ये कोण दुरावा निर्माण करतंय?; संजय राऊतांकडून पहिल्यांदाच नाव जाहीर
sanjay raut
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 3:25 PM

नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपमधील नातेसंबंधावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे, असं सांगतानाच नारायण राणे या एका व्यक्तीमुळे हे नातं बिघडलं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच भाजपने राणेंना शिवसेनेवर टीका करण्यासाठी पुढे केल्याचा आरोपही त्यांनी केला. राणेंनी भाजप-सेनेत दुरावा निर्माण केल्याचं राऊत यांनी जाहीरपणे सांगितल्याने त्यावर भाजप काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (narayan rane spoil relation between shiv sena and bjp, sanjay raut’s allegations)

शिवसेना नेते संजय राऊत नाशिमधंये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट नारायण राणे यांचं नाव घेऊन युतीतील बेबनावाल त्यांना जबाबदार धरलं. एकमेकांच्या कार्यालयावर हल्ला करणे उद्धव ठाकरे आणि आम्हाला आवडत नाही. भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे. मात्र एका व्यक्तीमुळे हे नात बिघडलं. राणे जे बोलताय ते फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार बोलू शकत नाही म्हणून त्यांनी राणेंना बोलायला पुढे केलं, असा आरोप राऊत यांनी केला.

एका व्यक्तीमुळे नातंच तुटलं

आम्ही 25 वर्षे एकत्र नांदलो, राहिलो. आता अचानक एका व्यक्तीमुळे, एखाद दुसऱ्या व्यक्तीमुळे नातच तुटून जातं पूर्णपणे. एकमेकाचे वैरी झालो की काय असं वातावरण तयार झालं आहे, असं ते म्हणाले.

सेनेतून अनेक गेले, पण उतमात केला नाही

हे म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू. तुम्हाला कुंडल्या नाहीत का? आम्ही तुमचे संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा, असा इशारा देतानाच जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात. ज्यांनी राणेंच्या विरोधात आयुष्य घालवलं ते हे विधान करत आहेत. सेनेतून अनेक जण गेले, पण यांच्या सारखा उतमात कोणी केला नाही. पण उद्धवजींनी सांगितलं, वेडंवाकडं केलं तर सोडणार नाही. ज्या हिमतीने तुम्ही ही लढाई लढता आहात, त्यासाठी मी नाशिकला आलोय. गुन्हा दाखल करण्याचं हिमतीच काम नाशिकमध्येच होऊ शकत, हे मला माहिती होतं, असं ते म्हणाले.

बंद दाराआडील चर्चा सर्वांना माहीत

उद्धव ठाकरे उत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले. एक तरी भाजपाचा मुख्यमंत्री पहिल्या पाचात आहे का? असा सवाल करतानाच मी ठाकरे आहे. माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्यात काल बंद दारा आड चर्चा झाली. सगळ्यांना माहिती आहे काय चर्चा झाली, असं सांगून राऊत यांनी संशय निर्माण केला आहे.

जीभेला लगाम घालणं आवश्यक होतं

सगळ्यांनी यात्रा केली. पण सेनेवर कोणी वक्तव्य केली नाही. मोदींनी मंत्र्यांना यात्रेसाठी काय सांगितलं मला माहिती आहे. मोदी काय सांगतात हे मला जास्त माहिती आहे. यांना काय माहीत. पण एक अतिशहाणा, मोदींचा आदेश पाळत नाही. सरकारचा, मोदींचा प्रचार न करता उद्धव ठाकरे, शिवसेना, संजय राऊत यांच्याबद्दल बोलतो. शेवटी व्हायचं ते झालं. वारंवार जीभ घसरली. त्याला एकदा लगाम घालणं गरजेचं होतं. ते आम्ही कायद्याने केलं, असा हल्लाही त्यांनी चढवला. (narayan rane spoil relation between shiv sena and bjp, sanjay raut’s allegations)

संबंधित बातम्या:

अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता, तो मुख्यमंत्र्यांनी घातला, राणेंच्या अटकेवर सेनेची पहिली प्रतिक्रिया

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, वर्षा गायकवाड यांची माहिती

संजय राऊतांनी नाशिकमध्ये वात पेटवली, भाजपचा माजी उपमहापौर फोडला?

(narayan rane spoil relation between shiv sena and bjp, sanjay raut’s allegations)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.