नवजात बालकाला जन्मानंतर अवघ्या 12 तासात कोरोनाची लागण, सहा दिवसांचे उपचार अखेर अयशस्वी

पालघरमधील नवजात बाळाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या बाळाला जन्मानंतर अवघ्या 12 तासात कोरोनाची लागण झाली होती (Newborn baby dies due to Corona in Nashik)

नवजात बालकाला जन्मानंतर अवघ्या 12 तासात कोरोनाची लागण, सहा दिवसांचे उपचार अखेर अयशस्वी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 11:14 PM

नाशिक : लहान बालकांसाठी पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधा नसल्याने कोरोनाची लागण झालेल्या आणि उपचारासाठी वणवण फिरलेल्या पालघरमधील नवजात बाळाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान करूण अंत झाला. गेले सहा दिवस हे बाळ मारणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला (Newborn baby dies due to Corona in Nashik).

मतेचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह

पालघर तालुक्यातील सफाळे दारशेत येथील राहणाऱ्या आदिवासी समाजाची अश्विनी काटेला यांनी सहा दिवसांपूर्वी पालघर शहरातील एका खाजगी दवाखान्यात नवजात बाळाला जन्म दिला. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते म्हणून त्याला पालघरच्या एका दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी हलविले गेले. तेथे बाळाची अँटीजन टेस्ट केल्यानंतर बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मात्र मातेची टेस्ट निगेटिव्ह आली होती (Newborn baby dies due to Corona in Nashik).

बालकाची उपचासाठी फरफट

बाळाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे बालकांसाठी सुविधा नसल्याने तसेच करोना लागण झालेल्या बालकांसाठी जिल्हा प्रशासनाने कोणतीही आरोग्य सुविधा उभारली नसल्याने बाळाला उपचारासाठी पालकांना प्रचंड पायपीट करावी लागली. उपचारासाठी अनेक तास वाट बघितल्यानंतर बालकाला जव्हार येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले.

नाशिक जिल्हा रुग्णालयात बालकाचा मृत्यू

मात्र बाळाची प्रकृती खालावल्याने आणि जव्हार रुग्णालयात उपचार पद्धती उपलब्ध नसल्याने बाळाला दोन दिवसानंतर जव्हार येथून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अखेर आज पहाटे 5 च्या दरम्यान बाळाने शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. या नवजात बाळाला 6 दिवसांच्या जीवन मरणाच्या झुंजात उपचारअभावी अखेर हार पत्कारावी लागली.

हेही वाचा : Corona Vaccine : नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.