AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: अखेर वेळा जुळल्या, राज ठाकरे-चंद्रकांतदादांची 15 मिनिटं खलबतं; चंद्रकांत पाटील म्हणतात…

राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कालच केलं होतं. ( Raj Thackeray- Chandrakant Patil Meet)

VIDEO: अखेर वेळा जुळल्या, राज ठाकरे-चंद्रकांतदादांची 15 मिनिटं खलबतं; चंद्रकांत पाटील म्हणतात...
Raj Thackeray- Chandrakant Patil File Photo
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 12:33 PM

नाशिक: राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कालच केलं होतं. आज या दोन्ही नेत्यांच्या वेळाही जुळल्या. एवढेच नव्हे तर चंद्रकांत पाटील आणि राज यांच्यात 15 मिनिटे चर्चाही झाली. मात्र, या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात असल्याने त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Raj Thackeray and Chandrakant Patil meet in nashik)

बॉडी लँग्वेज काय सांगते?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज सकाळी नाशिकच्या विश्रामगृहाच्या दारातच भेट झाली. राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्राम गृहाबाहेर जात होता. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज यांना नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच 15 मिनिटं चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे हाताची घडी घालून उभे होते. तर चंद्रकांतदादा त्यांना हातवारे करून काही तरी सांगत होते. राज हे सर्व काही गंभीरपणे ऐकत होते. अनेकवेळा राज हे चंद्रकांतदादांच्या बोलण्यावर मान डोलवतानाही दिसत होते. दोघांचीही बॉडी लँग्वेज खूप काही सांगत होती. यावेळी दोन्ही नेत्यांशिवाय कोणीच नव्हते. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही.

फक्त हाय, हॅलोच झालं

राज ठाकरे आणि मी खूप जुने मित्र आहोत. आम्ही दोघेही विद्यार्थी चळवळीतील आहोत. मी निघालो तेवढ्यात त्यांच्या गाड्या दिसल्या. त्यांना मी नमस्कार केला. बाकी काही नाही. आमच्यात दहा-पंधरा मिनिटं चर्चा झाली हे खरं आहे. पण दोन तास चर्चा होण्याइतपत आमचे संबंध आहेत. आजच्या भेटीत फक्त हाय, हॅलोच झालं, असं पाटील यांनी सांगितलं.

‘त्या’ प्रश्नावर चंद्रकांतदादा फक्त हसले

तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमकं काय सांगत होता?, असा सवाल चंद्रकांतदादांना करताच ते फक्त हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असं मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस. आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे. मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो. 40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही. आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती. आज झाली. तासभर भेटलंच पाहिजे, असं काही नाही, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीस निर्णय घेतात, नाशिकवर चर्चा नाही

राजकारण आणि समाजकारणात दोस्ती वेगळी आणि व्यवहार वेगळा असतो. व्यवहारात आमचे निर्णय राज्याची टीम घेत असते. मी राज्याचा अध्यक्ष आहे. पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, असं सांगतानाच नाशिक निवडणुकीवर एका शब्दानेही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Raj Thackeray and Chandrakant Patil meet in nashik)

संबंधित बातम्या:

राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा एकमेकांना भेटण्याची शक्यता; दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात

उद्धव-मोदींच्या भेटीनं महाराष्ट्रातलं सरकार ‘अस्थिर’ झालं, आता पवार-मोदींच्या भेटीनं काय होईल?; वाचा सविस्तर

दोन वर्षात म्हातारी मुलीला भेटली नाही, मुलगी म्हातारीला भेटायला आली नाही, लॉकडाऊनचं काय ते एकदाचं ठरवा: पाटील

(Raj Thackeray and Chandrakant Patil meet in nashik)

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.