Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक चकमकी अजूनही सुरूच आहेत. आजही संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली.

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन
शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 1:05 PM

गौतम बैसाणे, टीव्ही9 मराठी, नंदूरबार: शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक चकमकी अजूनही सुरूच आहेत. आजही संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. (shiv sena mp sanjay raut slams chandrakant patil)

संजय राऊत आज नंदूरबारमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असं सांगतानाच शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

पवार-प्रशांत किशोर भेटीकडे लक्ष देण्याची गरज नाही

यावेळी त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. एखादा सर्व्हे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.

आरक्षणाचा निर्णय केंद्रालाच घ्यावा लागेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. शिष्टाचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधानांना भेटायला गेले होते. या भेटीत महाराष्ट्रातील समस्यांवर चर्चा झाली. त्यामुळे या भेटीवर राजकारण करण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत आता राज्याची भूमिका राहिलीच नाही. आता केंद्रालाच भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, असं ते म्हणाले.

काँग्रेसला सल्ला

काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रसने आता सामान्य जनतेत पक्ष संघटन मजबूत करावे, असं मी म्हटलं होतं. शेवटी विरोधी पक्ष हा मजबूत आणि सक्षम असावा लागतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. (shiv sena mp sanjay raut slams chandrakant patil)

संबंधित बातम्या:

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमची मैत्री पिंजऱ्यातील नव्हे जंगलातील वाघाशी, आता संजय राऊतंचं उत्तर

आम्ही जंगलातील वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या नाही; चंद्रकांत पाटलांची डरकाळी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का? नितीन राऊतांचा सवाल

(shiv sena mp sanjay raut slams chandrakant patil)

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.