AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योग्यवेळी सीडी लावणार; ईडीच्या चौकशीवरून एकनाथ खडसेंचा पुन्हा इशारा

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माझी ईडी लावली तर सीडी बाहेर काढीन असं विधान केलं होतं. त्यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली तरी त्यांनी सीडी बाहेर काढली नव्हती. (Will play CD soon, Eknath Khadse warns BJP against use of central agency)

योग्यवेळी सीडी लावणार; ईडीच्या चौकशीवरून एकनाथ खडसेंचा पुन्हा इशारा
एकनाथ खडसे
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 7:10 PM
Share

जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माझी ईडी लावली तर सीडी बाहेर काढीन असं विधान केलं होतं. त्यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली तरी त्यांनी सीडी बाहेर काढली नव्हती. त्यावरून खडसेंना डिवचण्यातही आले होते. मात्र, आता खडसेंनी पहिल्यांदाच सीडीबाबत भाष्य केलं आहे. योग्यवेळी मी सीडी लावणार आहे, असा इशाराच एकनाथ खडसे यांनी दिला आहे. (Will play CD soon, Eknath Khadse warns BJP against use of central agency)

एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला. ईडी लावली तर सीडी लावेन असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले.

हेतुपुरस्सर आरोप

गेल्या 40 वर्षात माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आला. कोर्टानेही आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

चंद्रकांतदादांचा आभारी आहे

जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी. त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभेत मी वारंवार विचारलं माझा दोष काय आहे ते सांगा. आता ईडीने चौकशी लावली. ती कोर्टात काय व्हायचं ते होईल, असंही त्यांनी म्हटलं.

काय म्हणाले होते खडसे?

खडसे यांनी 23 ऑक्टोबर 2020मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी भाषण करताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, अशी इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता.

कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही

उत्तर महाराष्ट्रात भाजपला 6 खासदारकीच्या जागा यायच्या. येथे मी सातत्याने 5 जागा जिंकून आणल्या. जळगावातून नेहमी 2 खासदार निवडून दिले. मी संघर्ष केला, समोरासमोर लढलो, पण मी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. मी 40 वर्ष राजकारण केलं, पण बाईला समोर करुन मी राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही. मी काही लेचापेचा नाही, असेही खडसे म्हणाले होते. मला राष्ट्रवादी काँग्रेसने काहीही दिलेलं नाही. मी केवळ पक्षाचं काम करेल. जितकं काम भाजपचं केलं, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू. हे करुन दाखवू. माझ्या पाठीशी ठाम उभे राहा, मी कुणालाही घाबरणार नाही, असेही त्यांनी सांगितलं होतं. (Will play CD soon, Eknath Khadse warns BJP against use of central agency)

संबंधित बातम्या:

 अनिल देशमुखांप्रकरणी तपास अद्यापही सुरुच, पुराव्यांनुसारच देशमुखांवर गुन्हा दाखल-सीबीआय

जातीनिहाय जनगणना करा, ओबीसींना संवैधानिक आरक्षण द्या; दिल्लीत समता परिषदेच्या बैठकीत ठराव मंजूर

अनिल देशमुखांबाबतचं सत्य, असत्य काय?, सीबीआयने खुलासा करावा; नवाब मलिक यांची मागणी

(Will play CD soon, Eknath Khadse warns BJP against use of central agency)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.