ZP Election result 2022: काय आहे गोंदियाचं चाबी संघटन, ज्यांना शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्यात?

गोंदिया जिल्हा परिषदेत सर्वच बलाढ्य पक्ष स्वबळावर लढले. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जागांची लयलुट केली आहे.

ZP Election result 2022: काय आहे गोंदियाचं चाबी संघटन, ज्यांना शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्यात?
vinod agrawal
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 4:37 PM

गोंदिया: गोंदिया जिल्हा परिषदेत सर्वच बलाढ्य पक्ष स्वबळावर लढले. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जागांची लयलुट केली आहे. मात्र, शिवसेनेला अजूनही खातं उघडता आलेलं नाही. असं असतानाच चाबी संघटनेने मात्र, जिल्हा परिषदेच्या तीन जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील सत्ता पक्ष असलेल्या शिवसेनेपेक्षाही जास्त जागा जिंकल्याने चाबी संघटनेच्या विजयाचीच अधिक चर्चा जिल्हात रंगली आहे. त्यामुळे ही चाबी संघटना नक्की काय आहे याचं कुतुहूल सर्वांना लागलं आहे.

गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढत असले तरीही अद्यापही शिवसेनेचे खाते उघडले नाही. आतापर्यंत गोंदिया जिल्हा परिषदेचा एकूण 53 जागा जागांपैकी 32 चे निकाल जाहीर झाले आहेत. तर भंडारा जिल्हा परिषदेचा 52 पैकी 34 चे निकाल जाहीर झाले आहेत.

तीन जागांवर चाबी संघटना विजयी

या निवडणुकीत भाजपने आतापर्यंत 13 जागांवर विजय मिळविला आहे. राष्ट्रवादीने 6, काँग्रेसने 5 आणि चाबी संघटनेने 3 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे चाबी संघटनेकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

गोंदिया जिल्हा परिषद 53 जागा

भाजप – 13

1) तिरोडा अर्जुनी- चतुरभूज बिसेन, 2) सोनी – पंकज रहांगडाले 3) सेजगाव- पवन पटले 4)कीकरीपार- किशोर मारवाडे 5) पुराडा – सविता पुराम 6)धापेवाडा – विजय ऊके 7) डव्वा – बी. एम. पटले 8) गोटाबॉडी – कल्पना वलोद 9) कामठ – रीतेशकुमार बलगाम 10) सौंदड – निशा तोडास 11) ठाणा :- हनुवत वट्टी 12)घोटी :- कतलाम बाई 13)कुऱ्हाडी :- शैलेश नंदेश्वर

राष्ट्रवादी –6

1) बरसोला – नेहा तुरकर 2) घाटटेंमनी – सुरेश हरसे 3) सुकळी – जगदीश बावंथडे 4) पाढरी – रहांगडाले 5) बोंडगांवदेवी – किशोर तरोने 6) कवलेवाडा – किरण पारधी

काँग्रेस– 5

1) शाहरवानी- जितेन्द्र कटरे 2) झालीया – छाया नागपुरे 3) पिपरिया – गीता लिल्हारे 4) गोरठा – छबु ताई ऊके 5) भरेगावं- संदीप भाटिया

चाबी संघटन 3 (अपक्ष संघटन)

1) काटी- आनंदा वाडीवा 2) पांजरा – वैशाली पंधते 3) नागर – सोनु कुथे

काय आहे चाबी संघटना?

विद्यमान अपक्ष आमदार विनोद अग्रवाल हे चाबी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून 14 जागा लढवल्या होत्या. त्यातील आतापर्यंत तीन जागांवर त्यांचा विजय झाला आहे. विनोद अग्रवाल हे भाजपचे नेते होते. मात्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांना भाजपने 2019च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्यामुळे विनोद अग्रवाल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत अपक्ष असूनही त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. त्यांनी गोपालदास अग्रवाल यांचा 27169 मतांनी पराभव केला होता. निवडून आल्यावर त्यांनी त्यांनी जनता की पार्टी या संघटनेची स्थापना केली होती. भाजप विरोध आणि सामाजिक कामे करण्यासाठी त्यांनी या संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या स्थापनेनंतर गोंदियाभर संघटनेचं जाळं विणण्याचं काम त्यांनी केलं. संघटन बांधून ठेवण्यासाठी पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंतच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवार दिले आहेत. आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या संघटनेने स्वबळावर खाते खोलून प्रस्थापित राजकीय पक्षांपुढे मोठं आव्हान निर्माण केलं आहे.

अग्रवाल यांनी जनता की पार्टी संघटनेची निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. त्यांना आयोगाने चाबी हे निवडणूक चिन्हं दिलं आहे. मात्र, त्यांचा पक्ष पक्षाच्या नावाने लोकप्रिय होण्याऐवजी संघटनेच्या चिन्हाच्या नावानेच अधिक लोकप्रिय झाला आहे. चाबी संघटना म्हणून त्यांच्या पक्षाची जिल्ह्यात ओळख झाली आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: अजितदादा म्हणतात, रोहित जमिनीवरचा नेता, आरआर आबांचं ब्लड त्याच्यात आहे!

Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : जळगाव बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

Goa Eelections 2022 : लढाई आधीच शस्त्र टाकले? राऊत म्हणतात, गोव्यात भलेही आम्ही सरकार बनवणार नाही पण..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.