उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या असहिष्णुतेचे जनक, आशिष शेलार यांचा घणाघाती हल्ला
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. या यात्रेत भाजप नेते आशिष शेलारही सहभागी झाले असून शेलार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (ashish shelar)
रत्नागिरी: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. या यात्रेत भाजप नेते आशिष शेलारही सहभागी झाले असून शेलार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. (cm uddhav thackeray is the father of intolerance, says ashish shelar)
स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. ज्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. तर सुरेश प्रभू यांना सुध्दा त्याकाळी अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झालं, अन्य नावे मी घेत नाही. आता राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं? असा सवाल शेलार यांनी केला. उद्धव ठाकरेंविरोधात कोकणातील जनतेच्या मनात संताप आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, असा इशाराही शेलार यांनी दिला.
हल्ल्याचा पाढा वाचला
महाराष्ट्रात असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हेच आहेत. वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहीले म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एका निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एक व्यंगचित्र फॉरर्वड केले म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला तर अभिनेत्री कंगना यांचे घर तोडण्यात आले. सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केली गेली. महाराष्ट्रात आज जे असहिष्णुतेचे हे वातावरण तयार झालेय त्याचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत अशी टीका त्यांनी केली.
केंद्राच्या योजना घराघरात नेऊया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळात कोकणाला मोठे स्थान दिले म्हणून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा निघाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरिबांसाठी ज्या अनेक योजना आहेत त्या आता घराघरात, गावागावात आपण घेऊन जाऊ या, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. (cm uddhav thackeray is the father of intolerance, says ashish shelar)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 August 2021https://t.co/UO1rQexmHK#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2021
संबंधित बातम्या:
वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही, नारायण राणेंचा रोखठोक इशारा
… तर ओबीसींची अपरिमित हानी होईल; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा
आवाज खणखणीत झाली की खणखणीत वाजवणार, टप्याटप्याने जुनीप्रकरणं बाहेर काढणार; राणेंनी शिवसेनेला ललकारले
(cm uddhav thackeray is the father of intolerance, says ashish shelar)