पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नदी किनारी पूर संरक्षक भिंत बांधण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. (devendra fadnavis taunt cm uddhav thackeray over river retaining wall)

पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 3:33 PM

कोल्हापूर: नदी किनारी पूर संरक्षक भिंत बांधण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सरसकट भिंत बांधणं किती योग्य आहे हे माहीत नाही. पूर संरक्षक भिंत काही ठरावीक ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंती सारखी सरसकट बांधता येत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis taunt cm uddhav thackeray over river retaining wall)

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा टोला लगावला. सरसकट भिंत बांधणं किती योग्य आहे हे माहीत नाही. अर्थात शासनाने काही सांगितलं असेल. किंवा मुख्यमंत्र्यांनी काही अभ्यास केला असेल. पण पूर संरक्षक भिंत काही ठरावीक ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंती सारखी सरसकट बांधता येत नाही. त्यामुळे ती नेमकी कुठे बांधता येईल याचा विचार करावा लागेल. पूर संरक्षक भिंत बांधणं ही अनेक उपाययोजनांपैकी एक असू शकते. ती विविक्षित भागात होऊ शकते. ती सरसकट बांधता येत नाही. माझं जे छोटं ज्ञान आहे, त्यानुसार सरसकट भिंत बांधणं योग्य होणार नाही. त्यावर सरकार अभ्यास करेल, असं फडणवीस म्हणाले.

विशेष बाब म्हणून व्यापाऱ्यांना मदत करा

पूरग्रस्तांचं नुकसान पाहता, राज्य सरकारकडून तातडीची मदत येणं अपेक्षित होतं, पण अजून पोहोचली नाही. लोक आमच्याजवल सातत्याने 2019 च्या मदतीचा उल्लेख करत होते. आमच्या सरकारने ते दिलं होतं. आपत्ती आल्यानंतर एक काळ महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये रिस्टोरेशन करावं लागतं, त्यावेळी तात्काळ मदत आवश्यक असते. घर-दुकानांमध्ये चिखल घुसतो, ते सफाई करण्यासाठीही खर्च असतो. मिठापासून कपड्यांपर्यंत खराब झाले असतात. अंतर्वस्त्रापर्यंत आणावं लागतं. ही जी तातडीची मदत द्यावी लागते, कारण या पूरग्रस्तांकडे काहीही नसतं. आता उशीर झालाय, पण सरकारने तातडीने मदत करावी, असं सांगतानाच व्यापारी कोरोनामुळे अडचणीत आहेत. आता जो काही माल होता, तो खराब झाला. त्यांना मोठी अडचण आली आहे. आता व्यापाऱ्यांना सरकारने मदत करायला हवी. आम्ही 2019 मध्ये विशेष बाब म्हणून मदत केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर संरक्षक भिंतीबाबत भाष्य केलं होतं. मी भिंत बांधायची कल्पना मांडली होती. पण त्यावर मतमतांतरे असेल तर आपण पुढे सरकता येणार नाही. केवळ भिंत हा पर्याय असू शकतो का असं मी म्हटलं होतं. असेल तर पुढे जाऊ, नसेल तर सोडून देऊ. भिंत बांधावीच हा माझा आग्रह नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. (devendra fadnavis taunt cm uddhav thackeray over river retaining wall)

संबंधित बातम्या:

नदीपात्रातील ब्लू, रेड लाईनमध्ये बांधकामास परवानगी नाही, पूर परिस्थिती रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार: मुख्यमंत्री

VIDEO: वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही; केंद्राकडेही वेडीवाकडी मागणी करणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

(devendra fadnavis taunt cm uddhav thackeray over river retaining wall)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.