Photo Story: हिजाबचा हिसाब 2024ला करणार, कर्नाटकातील हिजाब वादाचे सोलापुरात पडसाद; चक्काजाम
कर्नाटकातील (Karnataka) शाळांमध्ये हिजाब घालण्यावरून रणकंदन सुरू आहे. हिजाबच्या (Hijab Controversy ) मुद्द्यावरून मुस्लिम विद्यार्थीनी आणि हिंदुत्ववादी संघटना आमनेसामने आल्या आहेत. हा वाद इतका पेटला असून खुद्द कर्नाटक सरकारला तीन दिवस राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढावे लागले आहेत.
सोलापूर: कर्नाटकातील (Karnataka) शाळांमध्ये हिजाब घालण्यावरून रणकंदन सुरू आहे. हिजाबच्या (Hijab Controversy) मुद्द्यावरून मुस्लिम विद्यार्थीनी आणि हिंदुत्ववादी संघटना आमनेसामने आल्या आहेत. हा वाद इतका पेटला असून खुद्द कर्नाटक सरकारला तीन दिवस राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढावे लागले आहेत. कर्नाटकमधील हा वाद सुरू असतानाच महाराष्ट्रातही हिजाबच्या वादाचं लोण पोहोचलं आहे. सोलापुरात (solapur) आज हिजाबच्या समर्थनार्थ मोठं आंदोलन करण्यता आलं. महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर प्रहार जनशक्ती संघटनेने आज जोरदार रास्तारोको केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. या रास्तारोको आंदोलनामुळे या महामार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती. आंदोलक जोरजोरात घोषणा देत गाड्या अडवतानाही दिसत होते. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कर्नाटक सरकारने महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतर कर्नाटकामधील वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रातही पाहायला मिळतं आहेत. सोलापूर – विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर आज प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्ते जमले होते.
कोणत्याही समाजाच्या व्यक्तिगत आचरणावर सरकारने किंवा प्रशासनाने गंडांतर आणणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध करतो. हिजाबवर बंदी आणणाऱ्यांचा 2024 साली जनताच हिशोब करेल, असा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला.
यावेळी ‘मोदी सरकार, बोम्मई सरकार मुर्दाबाद’च्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून सोडला. त्यामुळे आदोलन स्थळी दक्षिण सोलापूर तालुका पोलिस स्टेशनच्या पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काय आहे वाद?
कर्नाटकात 23 दिवसांपूर्वी हा वाद सुरु झाला. कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी सांगितले की, हा वाद सुरु होण्यापूर्वी या महाविद्यालयात येमाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला. याविरोधात मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली आहे. या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे.
संबंधित बातम्या:
Nitesh Rane : नितेश राणेंची अँजिओग्राफी टेस्ट करणार, राणेंना नेमकं झालंय काय?