राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षणासाठी मराठमोळ्या आयपीएस अधिकारी दिपाली माशीरकर यांची नियुक्ती, चंद्रपूर जिल्ह्याला मिळाला बहुमान!

दिपाली माशीरकर या आवाळपूर गावातील आहेत. 2008 मध्ये त्या आयपीएस अधिकारी झाल्या. त्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षणासाठी मराठमोळ्या आयपीएस अधिकारी दिपाली माशीरकर यांची नियुक्ती, चंद्रपूर जिल्ह्याला मिळाला बहुमान!
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 9:56 AM

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील दिपाली रविचंद्र मासीरकर (Deepali Masirkar) 2008 च्या नागालँड बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूकीकरिता संचालक म्हणून दिल्ली येथे त्यांची नेमणूक केली आहे. दिपाली या निवडणुकीचे निरीक्षण देखील करणार आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. आज देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक (Election) होणार आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून एनडीएकडून द्रोपती मुर्मू तर यूपीए कडून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीयं.

2008 मधील आयपीएस अधिकारी

दिपाली माशीरकर या आवाळपूर गावातील आहेत. 2008 मध्ये त्या आयपीएस अधिकारी झाल्या. त्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठमोळ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला राष्ट्रपती निवडणुकीत आपले कर्तव्य बजावण्याची संधी मिळालेली आहे. ही खरोखरच चंद्रपूरसाठी एक मोठी गोष्ट आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती

मुंबई येथे सहाय्यक महानिरीक्षक या पदावर त्यांनी कार्य केले. नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी सुद्धा त्यांनी काम केले असून भारत निर्वाचन आयोगाच्या संचालक पदी नियुक्ती पूर्वी नागालँडमधील कोहीना येथे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आता त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.