Raigad Satara landslide live : साताऱ्याच्या मिरगाव येथून ढिगाऱ्याखालून दोघांना जिवंत बाहेर काढण्यात रेस्क्यू टिमला यश
Landslide in Maharashtra LIVE Updates : महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
Raigad Satara landslide मुंबई : महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.
रायगड : पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तिन्ही घटनांतील मृतांचा आकडा आता 89 वर गेला आहे.
कुठे किती मृत्यू?
चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू तळीये, महाड – 38 मृतदेह हाती आंबेघर, सातारा – 13 जणांचा मृत्यू पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू
पोसरे, रत्नागिरी – 17 जणांचा मृत्यू
कणकवली – दिगवळे, सिंधुदुर्ग – 1 महिलेचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू
LIVE NEWS & UPDATES
-
साताऱ्याच्या मिरगाव येथून ढिगाऱ्याखालून दोघांना जिवंत बाहेर काढण्यात रेस्क्यू टिमला यश
कराड (सातारा) : पाटण तालुक्यातील मिरगाव येथून मातीच्या ढिगाऱ्याखालून दोघांना जिवंत बाहेर काढण्यात रेस्क्यू टिमला यश, तर एका मुलीचा मृतदेह सापडला, पाऊस आणि दृर्गमतेमुळे शोध मोहिम थांबली आहे
-
पोसरी गावात खासदार सुनील तटकरे दाखल, मदतीचं आश्वासन
पोसरी गावात खासदार सुनील तटकरे यांनी घेतली भेट, चिपळूनसाठी विशेष पॅकेज देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न, लवकरच मुख्यमंत्री पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता, केंद्र सरकारने निकषाच्या पुढे जाऊन मदत करावी, तटकरे यांची प्रतिक्रिया
-
-
महाडमधील सावित्री नदीचा प्रवाह पुन्हा वाढला, नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा
महाडमधील सावित्री नदीचा प्रवाह पुन्हा वाढला आहे, दुपारी पाण्याचा प्रवाह कमी झाला होता. आता पुन्हा महाबळेश्वर, पोलादपूरमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने नदीचं पात्र भरून वाहत आहे, नदीकाठच्या गावांना पुन्हा इशारा देण्यात आला आहे. -
Posare village chiplun ratnagiri : रत्नागिरीतील पोसरेत दरड कोसळून 17 ठार
दरड कोसळून महाडचं तळीये गाव उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत तिकडे चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. पोसरे-बौद्धवाडीत घरांवर दरड कोसळून ही दुर्घटना घडली.
-
Sindhudurg Landslide : सिंधुदुर्गात दरड कोसळून महिलेचा मृत्यू, पती जखमी
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा पहिला बळी, कणकवली – दिगवळे येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू, संगीता जाधव वय ४२ महिलेचे नाव. महिलेचा पती आणि सासरा जखमी. पती प्रकाश जाधव यांची प्रकृती चिंताजनक. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल. घराशेजारी पाच ते सहा फूट उंचीची दलदल. डोंगराचा भाग खचून दगड – माती आणि मोठ मोठे वृक्ष आले खाली.
-
-
शानदार नृत्याने समारंभाला सुरुवात
लाल रिबननी एकमेकांशी बांधलेल्या डान्सर्सनी एक शानदार नृत्य करत समारंभात सर्वांचच लक्ष वेधलं. त्यानंतर जपानच्या संघाने मार्च पास्ट करत समारंभाची सुरुवात केली.
We’re all connected ?#Tokyo2020 | #Olympics | #UnitedByEmotioin | #StrongerTogether pic.twitter.com/i8qOrn7oUK
— #Tokyo2020 (@Tokyo2020) July 23, 2021
-
IND vs SL : रंगतदार सामन्यात पावसाची बाधा
अतिशय रंगतदार स्थितीत सुरु असलेल्या सामन्यात पावसाने बाधा घातली आहे. 23 ओव्हरनंतर पाऊस वाढल्याने सामना थांबवण्यात आला आहे. भारताची स्थिती 147 वर 3 बाद आहे. सध्या मनिष पांडे आणि सूर्यकुमार यादव क्रिजवर आहेत.
-
Maharashtra landslide death toll : रायगड, सातारा, चिपळूणमधील मृतांचा आकडा 71 वर
कुठे किती मृत्यू?
चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटरमधील ८ रुग्णांचा मृत्यू तळीये, महाड – 38 मृतदेह हाती आंबेघर, सातारा – १२ जणांचा मृत्यू पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू
आतापर्यंत 71 जणांचा मृत्यू
-
Raigad Landslide : आता पोलादपुरात भूस्खलन, 11 जणांचा मृत्यू
रायगड : पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तिन्ही घटनांतील मृतांचा आकडा आता 61 वर गेला आहे.
-
Satara Landslide : देवरुखवाडीत माळीणसारखी दुर्घटना, भूस्खलनात दोन महिलांचा मृत्यू, 27 जणांना बाहेर काढण्यात यश
सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील देवरूखवाडी येथे माळीण सारखी दुर्दैवी घटना घडली. भूस्खलन झाल्याने 7 ते 8 घरे जमिनीत गाडली गेली होती. यामध्ये 27 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर जखमींना वाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र या दुर्घटनेत 4 जण बेपत्ता झाले होते. यामध्ये दोन महिलांचा समावेश होता.. आज शोधकार्य करताना मातीच्या ढिगाऱ्याखालून 2 महिलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.. यामध्ये 60 वर्षाची वृद्ध महिला आणि 25 वर्षाची महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली रात्रीपासून अडकल्या होत्या. मातीचा ढीग अंगावर पडल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
Chiplun Landslide : चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीत 17 घरांवर दरड कोसळली
एकीकडे महाडचं तळीये गाव उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमणी इथं दरड कोसळलून 2 जण दगावले आहेत.
-
Maharashtra landslide : अजित पवार यांचा राजनाथ सिंहांना फोन, लष्कराची मदत मागितली
रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
-
Maharashtra landslide : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
राज्यात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी (Rain) हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
-
Satara landslide : साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू
सातारा: महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.
-
Raigad Taliye Landslide : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तलीये गावात
तळीये गावात काल म्हणजेच 22 जुलैला दुपारी चारच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. इतके तास होऊनही राज्य सरकारला या दुर्घटनेचा थांगपत्ताही नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे भाजपच्या काही आमदारांसह तळई गावात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, असा सतांप तळई गावातून प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला. प्रवीण दरेकर, भाजप आमदार गिरीश महाजन हे या गावात आहेत.
-
Raigad landslide : आतापर्यंत 38 मृतदेह बाहेर
काल सायंकाळी 4 वाजता ही दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडी खाली 35 घरे दबली गेली. त्यामुळे या दुर्घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 38 लोकांचे मृतदेह बाजूला काढले. पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत होता. दरडीखाली असून 80 ते 85 लोक दबले असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
Published On - Jul 23,2021 2:43 PM