Maharashtra Breaking News Live : निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही : उद्धव ठाकरे
शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप नेते नारायण राणे यांचं वर्चस्व असलेल्या कोकणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली.
मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप नेते नारायण राणे यांचं वर्चस्व असलेल्या कोकणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली.
LIVE NEWS & UPDATES
-
आमदार वैभव नाईकांची उदय सामंतांवर टीका
वैभव नाईक नेमकं काय म्हणाले?
कितीही त्रास झाला तरी आम्ही शिवसेना उद्धव ठाकरेंबरोबरचं राहणार
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार आज शिवसैनिकांनी केला आहे
आदळ आपट कोणी केली हे सगळ्यांना माहिती आहे
आम्ही दसरा मेळावा घेतो म्हणून त्यांनीही दसरा मेळावा घेतला
दसरा मेळाव्याला किती गर्दी झाली आपण पाहिली
शिवसेनेच्या सभेच्या गर्दीची तूलना कोणाशी होऊ शकत नाही
आमदार वैभव नाईकांची उदय सामंतांवर टीका
-
निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
तुम्हाला कोण विचारत होतं. भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं. तेव्हा शिवसेनाप्रमुख यांच्या मागे उभे राहिले नसते तर आज हे कुठे राहिले असते? पण एवढं निष्ठुर आणि निर्घृणपणाने वागत आहेत की, ज्याने सोबत दिली त्यांना पहिले संपवा. बघा प्रयत्न करुन
आज संजय कदम आणि त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत आणलेले आहेत. हो मी शिवसेनाच म्हणणार. कारण निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही. अजिबात नाही. निवडणूक आयोग चिन्ह आणि नाव देऊ शकतं. पण पक्ष देऊ शकत नाही. आम्ही देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत
गोळीबार मैदान. मैदानाचं नाव खूप चांगलं आहे. पण मला शिवसैनिकांनी एक शिकलंय. ढेकण्या चेहऱ्याला गोळीबाराची गरज नसते. ढेकण आपलं रक्त पिवून फुगलेली आहेत. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकण्यांना चिरडणार आहे. तोफेची काय गरज आहे? या तोफा आहेत ना. मुलखमैदान तोफा आहेत.
आज सुद्धा दोन-तीन तोफा गडाडल्याच ना. भास्कर जाधव, गिते आहेत, सुषमा अंधारे आहेत. संजय कदम आता आणखी एक तोफ आपल्यासोबत आलेली आहे. पण तोफा या देशद्रोह्यांविषयी वापरायच्या असता. दुर्देवं असं की ज्यांना आपण कुटुंबीय मानलं. ज्यांना मोठं केलं. त्यांनीच आपल्या आईवर वार केलाय. होय, शिवसेना ही आपली आई आहे. शिवसेना ही चार अक्षरं नसती तर तुम्ही-मी कोण होतो? आज जे टिमक्या वाजवत आहेत की, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. तुमचा जन्म तेव्हा कदाचित झाला असेल, मुंबईनंतप पहिला भगवा इथे फडकला होता.
तुम्हाला तुमचा गर्व असेल की, आम्ही शिवसेना बांधली तर घ्या स्वीकारा आव्हान, शिवसेना नाव बाजूला ठेवा. तुमच्या आई-वडिलांचा नाव लावा जर त्यांना तुमची लाज वाटत नसेल तर आणि पक्ष बाधून दाखवा. मी तर उघडपणे बाहेर पडलो आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.
-
-
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले?
या अभूतपूर्व अशा दृश्याचं वर्णन काय करायचं. डोळ्या मावत नाही असं हे आई जगदंबेचं रुप आहे
लहानपणी बाळासाहेबांच्या भाषणाला जायचो. तेव्हा मला कळायचं नाही. पण आज मला जाणीव झाली
ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल ते दिलं, तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं तरीसुद्धा ते खोक्यांमध्ये बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. माझे हात आज रिकामे आहेत. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात. याच्यासाठी पूर्वजांची पुण्यायी असावी लागते. आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. तुमची साथ-सोबत मला पाहिजे.
जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार, तोतया आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही शिवेसना नाही चोरु शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?
मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, तुमच्या डोळ्यांत मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या. कोणती शिवसेना आहे ते बघायला या.
हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत. वरुन जो हुकूम येतो त्याप्रमाणे वागणारे हे गुलाम आहेत. हे निवडणूक आयोग म्हणायच्या लायकीचे नाहीत हे मी उघडपणे बोलतोय.
-
भारतीय सैन्य दलातील सैनिक मधुसुधन सुर्वे यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार
खेड :
भारतीय सैन्य दलातील सैनिक मधुसुधन सुर्वे यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार
नक्षलवादी भागात केलेल्या कामगिरीबद्दल सत्कार
-
खेडमध्ये संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश, रामदास कदम यांच्यावर केली चौफेर टीका
रत्नागिरी :
खेडमध्ये संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितत जाहीर कार्यक्रमात पक्षप्रवेश पक्षप्रवेश केल्यानंतर संजय कदम यांचा रामदास कदम यांच्यावर चौफेर टीका
-
-
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल, खेडमध्ये मोठ्या घडामोडी
रत्नागिरी :
उद्धव ठाकरे खेडमध्ये कार्यक्रमस्थळी दाखल
सुषमा अंधारे यांचं भाषण सुरु
-
उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना-भाजपची आशीर्वाद यात्रा
मुंबई :
ठाकरे गटाचे नेते आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात थोड्याच वेळात शिवसेना-भाजप महायुतीची आशीर्वाद यात्रा निघणार आहे या यात्रेत मोठ्या संख्येत दोन्ही पक्षाचे युवा पदाधिकारी बाईक रॅली काढणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या यात्रेला प्रतिउत्तर देण्यासाठी ही आशीर्वाद यात्रा भाजपकडून मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघात काढण्यात येत आहे. आज सकाळी ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात ही आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती पक्षाचा चिन्ह आणि नाव शिंदे गटाला मिळाल्या नंतर आशीर्वाद यात्रे निमित्ताने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या यात्रेच आयोजन करण्यात आलं आहे थोड्याच वेळात वरळी जांभोरी मैदानाच्या इथून या महायुतीच्या आशीर्वाद यात्रेला सुरवात होणार आहे या यात्रेला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि अन्य आमदार आणि प्रमुख पदाधिकारी या यात्रेला उपस्थित असणार आहेत
-
उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी संजय कदम यांची रॅली, जोरदार शक्तीप्रदर्शन
खेड :
उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी संजय कदम यांची रॅली
संजय कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन
-
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात सभास्थळी पोहोचणार
खेड :
उद्धव ठाकरे थोड्या वेळात खेडमधील सभेसाठी निघणार
आमदार वैभव नाईक, आणि माजी मंत्री सुभाष देसाई रविंद्र वायकरांच्या घरी.आहेत
थोड्याच वेळात निघतील
-
चंद्रपूर : पाण्यात पडलेला मोबाईल वाळायला ठेवलेला असताना स्फोट
चंद्रपूर : पाण्यात पडलेला मोबाईल वाळायला ठेवलेला असताना स्फोट
चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील घटना
अशोक अंबिरवार यांचा MI कंपनीचा मोबाईल पाण्याने ओला झाला होता
बॅटरीसुद्धा काही प्रमाणात फुगली असल्याने मोबाईल दुचाकीवर वाळविण्यासाठी ठेवला बाहेर
मात्र अचानक मोबाईलचा झाला स्फोट, स्फोटात दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान
-
कांदाप्रश्नी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना शेतकऱ्यांचा घेराव
निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील प्रकार
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी घातला घेराव
नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच
सरकार याप्रश्नी चालढकल करीत असल्याचा केला आरोप
निर्यात वाढली म्हणतात मग शेतमालास भाव का नाही?
नाफेड काहीच कामाचे नसल्याचे सांगताच केंद्रीय मंत्र्यांचा संताप अनावर
शेतकरी संघटनेने लेखी निवेदन द्यावे आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, भारती पवार भडकल्या
या प्रश्नांमुळे काही काळ तणावाचे वातावरण
भारती पवार यांना काढता पाय घ्यावा लागला
-
अरेरे, Mohammad Rizwan ला किती जोरात लागला बॉल, हातातली बॅट टाकून पळावं लागलं, VIDEO
टीममधला एक सहकारी लगेच मोहम्मद रिजवानच्या मदतीला धावला. वाचा सविस्तर….
-
Shocking news : धक्कादायक! विकृताकडून कुत्र्यावर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलीस कारवाई
कुठे घडली ही धक्कादायक घटना? वाचा सविस्तर….
-
17 दिवसात खेळला 3 टेस्ट मॅच, भारत दौरा सुरु असताना एका ऑस्ट्रेलियन प्लेयरची निवृत्तीची घोषणा
कोण आहे हा प्लेयर? 3 टेस्ट मॅचमध्ये त्याने 6 विकेट काढल्या. वाचा सविस्तर…..
-
IND vs AUS Test : चौथ्या टेस्टमध्ये रोहित अँड कंपनीला मन मारुन एक गोष्ट करावी लागेल, पण पर्याय नाही
इंदोरमधल्या पराभवामुळे अखेरच्या क्षणी बदलला प्लान, रोहित अँड कंपनीचा महत्त्वाचा निर्णय. वाचा सविस्तर….
-
IND vs AUS : टीम इंडियात 10 वर्षानंतर पुनरागमन, फक्त 1 मॅचमध्ये मिळाली संधी, तिन्ही सामन्यात बसवलं बेंचवर
IND vs AUS : टीम इंडियातील तो कमनशिबी खेळाडू कोण? वाचा सविस्तर…..
-
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकणातील आरोपीची जामिनावर सुटका
तुनिषा आत्महत्याप्रकरणी आरोपी शिझान खानची जामिनावर सुटका
1 लाखांच्या जात मुचलक्यावर शिझानला जामीन मंजूर करण्यात आला
आरोपी शिझान खान तुरुंगाबाहेर
-
अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा विरोध
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
कांदा, सोयाबीन व कापसाला भाव देण्याची मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर जोरदार निर्देशने
पोलिसांनी घेतले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात
अमरावतीत देवेंद्र फडणवीस यांच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राडा
-
उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी ठाकरे गट आणि शिवसेनेत बॅनरवॉर
कितीही लांडगे एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाही
वाघ त्यांना फाडतोच हे लक्षात ठेवा
कोकणचे भाग्यविधाते देवमाणूस असा रामदास कदमांचा बॅनर
तर दुसरीकडे संजय कदमांच्या पक्ष प्रवेशाचेही बॅनर्स
सभेआधी खेडमध्ये पोस्टरवॉर
-
भाजपची आशीर्वाद यात्रा सुरू, वरळीतून यात्रेला सुरुवात
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून यात्रेला सुरुवात
बाईक रॅली सुरू, भगवे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांचा रॅलीत समावेश
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची यात्रा
150 पेक्षा अधिक जागा महायुती म्हणून जिंकून, भाजप नेते आशिष शेलार यांचा दावा
-
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खेडमध्ये दाखल, संध्याकाळी तोफ धडाडणार
सौ. रश्मी ठाकरे याही खेडमध्ये दाखल
थोड्याच वेळात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, पदाधिकाऱ्यांना सूचना देणार
पक्षाचं नाव, चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच होतेय सभा
गोळीबार मैदानावरून उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
-
खेडमधील उद्धव ठाकरेंच्या सभेला मुस्लीम मराठी सेवा संघाचा पाठिंबा
खेडमधील उद्धव ठाकरेंच्या सभेला मुस्लीम मराठी सेवा संघाचा पाठिंबा
सभेमध्ये 25 हजार मुस्लिम बांधव सहभागी होणार
मुस्लिम सेवा संघाचे फारूक ठाकूर यांचा दावा
महाराष्ट्रातील आमचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहणार
शिवसेनेनं कधीही मुस्लिमाचा विरोध केला नाही
पाकिस्तान जिंकला म्हणून फटाके फोडणाऱ्यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे बोलायचे
आम्ही सगळे उद्धव ठाकरेंच्या बाजूनू उभं राहणार
-
भूतानची भारतीयांना सुवर्ण साद
26 हजारांनं स्वस्त मिळवा 24 कॅरेट सोनं
भारतात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या आताबाहेर
भूतानमध्ये खरेदी उत्सवात सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल ही अट, वाचा बातमी
-
आमदार राजन साळवी आजच्या खेडमधील सभेला हजेरी लावणार
आमदार राजन साळवी आजच्या खेडमधील सभेला हजेरी लावणार
काल साळवींची एसीबीकडून करण्यात आली होती चौकशी
आजच्या सभेत राजन साळवी बोलणार का?
सभेला मात्र उपस्थित राहणार खासदार विनायक राऊतांची माहिती
-
सोलापुर: शरद पवार कराड विमानतळावर होणार काही वेळात दाखल
राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचे हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या SGM कॉलेज कराड मधील शताब्दी इमारतीचे उद्घाटन सोहळा
-
WPL 2023 : 10 वी फेल, कमाई 10 लाख, धारावीच्या झोपडपट्टीत राहणारी मुलगी WPL मध्ये करणार कमाल
WPL 2023 : धारावी आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीसाठी ओळखलं जातं. याच धारावीच्या झोपडपट्टीतून आलेल्या एका मुलीने वूमेन्स क्रिकेटमध्ये एक मोठी झेप घेतली आहे. कोण आहे ती? जाणून घ्या. वाचा सविस्तर…..
-
WPL 2023 : असं कसं? वाइड बॉलवर कोणी रिव्यू घेतं का? पण Harmanpreet Kaur ने घेतला रिव्यू
WPL 2023 : Harmanpreet Kaur ने वाइड बॉलवर रिव्यू घेऊन सगळ्यांनाच धक्का दिला. तुम्ही म्हणालं हे कसं शक्य आहे. वाचा सविस्तर….
-
WPL 2023 : Harmanpreet Kaur ने एकाचवेळी 5 बॉलर्सच बिघडवलं रिपोर्ट कार्ड, एकी विरुद्ध 400 च्या स्ट्राइक रेटने फटकावल्या धावा
WPL 2023 : गुजरात जायंट्स विरुद्ध महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं. लीगमध्ये अर्धशतक झळकवणारी ती पहिली खेळाडू बनली आहे. WPL 2023 च्या पहिल्याच सामन्यात खेळताना काल Harmanpreet Kaur ने स्फोटक बॅटिंगच प्रदर्शन केलं. वाचा सविस्तर….
-
Kieron Pollard : 800 SIX, 12000 रन्स….कायरन पोलार्डची पाकिस्तानात कमाल
Kieron Pollard : कायरन पोलार्डने शाहीन शाह आफ्रिदीला समोर मारलेला खणखणीत SIX एकदा पहा VIDEO. 800 सिक्स, 12000 धावा करुनही कायरन पोलार्ड टॉपवर नाहीय. मग पहिल्या स्थानावर कोण आहे? वाचा सविस्तर…..
-
WPL 2023 : DC vs RCB पहिल्या लढतीत कोण मारणार बाजी?, ‘हे’ 5 खेळाडू ठरवणार रिझल्ट
WPL 2023 : वूमन्स प्रीमियर लीगमध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना होणार आहे. या मॅचमध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. वाचा सविस्तर…..
-
कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांनी घेतली हेमंत रासनेंची भेट
कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांनी घेतली हेमंत रासनेंची भेट
यावेळी कसबा मंडळातील सर्व कार्यकर्त्यांशी चंद्रकांत पाटलांनी संवाद साधला
भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोट निवडणुकीत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतलेत
त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचे चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
-
गेल्या चार पाच दिवसांपासून घसरलेले पालेभाज्यांचे दर पूर्वपदावर येण्यास सुरुवात
मेथी, कांदापात, कोथिंबीर या पालेभाज्यांना 10 ते 12 रुपये दर
मात्र कमी प्रतीच्या पालेभाज्यांना अजूनही दर कमीच
कमी प्रतीच्या पालेभाज्यांना 2 ते 5 दर
आवक कमी झाल्यास दर वाढण्याची चिन्हे
-
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा धोका आणखी वाढणार
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा धोका आणखी वाढणार
रुंदीकरणासाठी रस्त्याची उंची सहा फुटाने वाढवली जाणार
कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर भराव टाकून उंची वाढवण्याच काम सुरू
रस्त्याची उंची वाढणार असल्याने बालिंगा,दोनवडे सह भागातील गावांनी घेतला धसका
उंची वाढवल्याने महापुराची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज
भरावं टाकून रस्ता रुंदीकरणाला ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा विरोध
-
या आठवड्यात सुवर्णसंधी, खरेदीदारांची चांदी
सोन्याच्या खेळीने गुंतवणूकदारांना लागली लॉटरी
आठवड्याभरात झाला दोन हजारांचा फायदा
चांदीने ही केली गुंतवणूकदारांची चांदी
सोन्या-चांदीकडे अजूनही गुंतवणूकदारांचा ओढा, बातमी एका क्लिकवर
-
नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी
कळवणच्या पाच्छिम पट्टयात अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात अवकाळी पावसाचा फटका
आंबा, गहू, हरबरा, मसूर वाटाणासह कांदा उत्पादकांना पावसाचा मोठा फटका
अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतपिकांवर मोठा परिणाम
द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत; मालेगाव, सटाणा भागात हलक्या सरी
-
रविवारी पेट्रोल-डिझेलचे भाव झाले का कमी?
किती आहे किंमतीत तफावत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात चढउतार
गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल
त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ नाही, वाचा बातमी
-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच
जिल्ह्यातील देवगाव रंगारी जवळ दुचाकी आणि हायवा ट्रकचा भीषण अपघात
अपघातानंतर हायवा ट्रकचालकाने काढला पळ
अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती
राजेंद्र कुलकर्णी असे मृत पतीचे नाव आहे
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अपघातात वाढ
-
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर
कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा पुणे दौऱ्यावर
कसबाच्या निकालासंदर्भात फडणवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्याची शक्यता
फडणवीस यांच्या हस्ते आज साधू महंतांच्या संमेलनाचे उद्घाटन
-
नागपूर : होळीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी कसली कंबर
होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कुठेही अनुचित प्रकार घडू नये
पोलिसांनी आतापासूनच वेगवेगळ्या परिसरात केले रूट मार्च सुरू
संवेदनशील असलेल्या परिसरात केले जात आहे रूट मार्च
रात्री शांतीनगर परिसरात पोलिसांनी रूट मार्च करत नागरिकांना शांततेचे आवाहन केले
होळीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उचलत आहे पावलं
-
कसबा पोटनिवडणूकीच्या निकालानंतर भाजप लागली कामाला
कसबा पोटनिवडणूकीच्या निकालानंतर भाजप लागली कामाला
कसबा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांची आज बैठक
हेमंत रासने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार
बैठकीला कसब्यातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, बुथ प्रमुख उपस्थित राहणार
या बैठकीत पराभवाची कारणे शोधली जाणार
-
उद्धव ठाकरे यांची तोफ आज खेडमध्ये धडाडणार
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा रत्नागिरी खेड होत आहे
सभेला 30 हजाराहून अधिक लोक येणार
उद्धव ठाकरे सभेत काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
-
सिंदखेड राजा तालुक्यातील बारावी गणित पेपर फूट प्रकरणी पाच अटकेत
साखरखेडा पोलिसांची मोठी कारवाई
मुख्य सूत्रधार अद्यापही फरार
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची पोलिसांची माहिती
आरोपींमध्ये दोन संस्थाचालक तथा शिक्षकांचा समावेश
आरोपींमध्ये शिक्षक गोपाल शिंगणे आणि गजनान आढे तर गणेश नागरे, पवन नागरे, गणेश पालवे यांचा समावेश
भादंविच्या कलम 420, 120 ब आणि विद्यापीठ कायद्यानुसार गुन्हा दाखल
-
बुलढाण्यात पडला अर्धा तास जोरदार अवकाळी पाऊस
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकाला बसणार फटका
हवामान खात्याच्या अंदाजानुसार काल रात्रीच्या दरम्यान बुलढाण्यात जोरदार अवकाळी पाऊस पडलाय
जवळपास अर्धा तास हा पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी पिकाला धोका निर्माण झालाय
5 मार्च ते 7 मार्च दरम्यान जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती
या अवकाळी पावसाने आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकांतील काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत
-
डोंबिवली जवळील लोढा हेवन परिसरात एका इमारतीला तडे
इमारतीची माती पडत असल्याने इमारतीत राहणाऱ्या 42 कुटुंबाला पालिका अधिकारी व अग्निशामक दल कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले
विकासकाला वारंवार तक्रार करून विकासक लक्ष देत नसल्याने रहिवाशी रस्त्यावर आल्याचा रहिवाश्याचा आरोप
इमारतीची दुरावस्था पाहून इमारत पाडण्याची पालिका प्रशासनाची तयारी
-
घाटकोपर येथे निर्माणआधीन घराचा भाग कोसळून 8 जण जखमी
घाटकोपरच्या जवाहर प्लॉट, भटवाडी येथे घडली दुर्घटना
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले
बबन भोर, निर्मला भोर, सुरेखा भोर, रिंकू कनोजिया, रेहमत अली, बबलू चव्हाण, धर्मेंद्र चव्हाण आणि बजरंगी यादव आदी जखमींची नावे
Published On - Mar 05,2023 6:05 AM