AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: शेतकऱ्याची कन्या होणार मंत्र्याची सून; गुलाबराव पाटलांच्या घरीही सनई चौघड्यांचे सूर

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पाठोपाठ राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या घरीही सनई चौघाड्यांचे सूर घुमू लागले आहेत.

VIDEO: शेतकऱ्याची कन्या होणार मंत्र्याची सून; गुलाबराव पाटलांच्या घरीही सनई चौघड्यांचे सूर
vikram patil
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 6:58 PM
Share

जळगाव: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पाठोपाठ राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या घरीही सनई चौघाड्यांचे सूर घुमू लागले आहेत. गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा सोमवारी विवाह सोहळा पार पडत आहे. विशेष म्हणजे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांच्या घरी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी सून म्हणून येणार आहे.

गुलाबराव पाटील हे शेतकरी कुटुंबात वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल त्यांना सहानुभूती व जाणीव आहे. याच भावनेतून त्यांनी मंत्रिपदाचा कुठलाही बडेजाव न करता विक्रम यांच्यासाठी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी सून म्हणून निवडली.

साईबाबा मंदिरावर विवाह सोहळा

चोपडा तालुक्यातील सनफुले गावातील भगवान भिका पाटील यांची सुकन्या प्रेरणा हिच्यासोबत सोमवारी विक्रम यांचा पाळधी येथील साईबाबा मंदिरावर विवाह सोहळा पार पडत आहे. भगवान पाटील हे यात्रा केबल्स कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाला आहेत. तसेच घरची शेती सुद्धा ते सांभाळतात. मंत्र्यांचा मुलगा आणि शेतकरी कुटुंबातील सून असा विवाह सोहळा पार पडणार आहे. विवाह सोहळा साध्या पद्धतीनेच पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी विविध मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.

पाळधीचं पानटपरी टाकली

गुलाबराव पाटील हे सुरुवातीच्या काळात जळगावजवळच्या पाळधीमध्येच पानटपरी चालवत होते. या पानटपरीचं नाव ‘नशीब’ असं होतं. तरुण वयात गुलाबराव पाटीलही शिवसेनेच्या संपर्कात आले आणि बघता बघता कट्टर शिवसैनिक झाले. अनेक आंदोलनात गुलाबराव पाटील सहभागी होऊ लागले. गावरान भाषणांनी सभा गाजवू लागले. फर्डा वक्ता अल्पावधीतच शिवसेनेचा फायरब्रँड नेता म्हणून उदयास आला. गुलाबराव पाटील हे 1999 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. पाटील यांनी आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. गरीबी नुसती पाहिली नाही तर अनुभवली आहे. पोट जगवण्यासाठी त्यांनी ऐन उमेदीत तमाशात कामं केली. जळगाव नजीकच्या पाळधीत पान टपरीही चालवली. त्याची जाणीव त्यांना अजूनही आहे. त्यामुळेच आजही ते मंत्री असोत नसोत, लोकांच्या मदतीला धावून जातात. विभागातील विकास कामांपासून ते कौटुंबीक कलहापर्यंतच्या समस्या त्यांच्याकडे येत असतात. त्यामुळे त्यांचे गावातील कार्यालय नेहमी गजबजलेले असते. लोकांची कायम वर्दळ असते. गुलाबराव पाटीलही जमेल तेवढी आणि शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.

संबंधित बातम्या:

‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार नक्की येणार, आम्ही महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार’, दरेकरांचा मोठा दावा

Farmer : सरकार अजूनही फसवणूक करत आहे, मुंबईत आल्यानंतर राकेश टिकैत यांची केंद्रावर सरकडून टीका

सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी पोहोचले नाहीत; 31 पक्षांचे नेते उपस्थित, पेगासस हेरगिरी, महागाई आणि बेरोजगारीवर चर्चेची मागणी

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.