AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आस्थेला ठेच पोहोचवणाऱ्या मोदी यांना 2024मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवणार आहात काय?; सुब्रमण्यम स्वामी यांचा संघाला सवाल

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली.

आस्थेला ठेच पोहोचवणाऱ्या मोदी यांना 2024मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवणार आहात काय?; सुब्रमण्यम स्वामी यांचा संघाला सवाल
आस्थेला ठेच पोहोचवणाऱ्या मोदी यांना 2024मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवणार आहात काय?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 24, 2022 | 2:45 PM
Share

पंढरपूर: भाजपचे नेते आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच थेट सवाल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या आस्थेलाच ठेच पोहोचवण्याचं काम करत आहेत. त्यांना घेऊन तुम्ही 2024ची निवडणूक लढवणार आहात काय? त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार करणार आहात काय? असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. रामसेतूचं अस्तित्व नसल्याचं काल संसदेत केंद्र सरकारने सांगितलं. पण, वास्तवाशी कुणाला पडलंय? आमची आस्था आहे. राम तिथे गेले होते. त्यांनी सेतू बनवला होता असं आम्हाला वाटतं.

हा एक विश्वास आहे. त्या विश्वासाला तुम्ही ठेच पोहोचवत आहात. याचा संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विचार केला पाहिजे. 2024मध्ये याच मोदींना सोबत घेऊन आपण निवडणूक लढवू शकतो? त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवून लोकांच्या समोर जाऊ शकतो? असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी केला.

आता चीनसमोर आपण झुकलो आहोत. चीनने घुसखोरी केलीच नव्हती असं पंतप्रधान सांगत आहेत. किती खोटं बोलत आहेत. एखादा पंतप्रधान कधी असं बोलतो का? आम्ही म्हणत नाही कोण आलं? कोण नाही आलं हे पंतप्रधानांनी सांगावं.

पण चीनने आमच्यावर आक्रमण केलं आणि त्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं असं तर सांगू शकता. मोदींबाबत संशय येत आहे. 8 वर्षात मोदी थकले की कायय़ ते नीटसा विचारही करताना दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

मंदिरे सरकारांनी ताब्यात घेऊ नये असं संघाला वाटतं. पण सरकार उलटं करत आहे. रामसेतू हा राष्ट्रीय वारसा घोषित करावा असं संघाला वाटतं. पण सरकार म्हणते रामसेतूचं अस्तित्वच नाही. आता त्यावर संघानेच विचार केला पाहिजे, असं आवाहनच त्यांनी केला.

निवडणूक काळात जो अजेंडा दिला होता. त्यानुसार मोदी सरकार काम करत नाही. मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्यामुळे मी त्यावर अधिकार वाणीने सांगू शकतो. मोदींनी अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे. चीनचं मी अनेकदा विश्लेषण केलं आहे.

चीनने आमची जमीन हडप केली. हे म्हणतात चीनशी चर्चा करू. अरे या राक्षसांसोबत काय चर्चा करणार? चीन चर्चेने ऐकणारा आहे का? चीन मदारी सारखा डमरू वाजवत आहे अन् हे मीटिंगावर मिटिंगा करत आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.