Video: राणेंना भरल्या ताटावरुन पोलीसांनी उठवलं? निलेश राणे पोलीसांवर भडकले, नेमकं काय घडलं त्यावेळी?

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये आली होती. त्याचवेळी राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्याने त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस संगमेश्वरमध्ये आले. (Union minister Narayan Rane arrested, watch what happened? video viral)

Video: राणेंना भरल्या ताटावरुन पोलीसांनी उठवलं? निलेश राणे पोलीसांवर भडकले, नेमकं काय घडलं त्यावेळी?
narayan rane
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 4:58 PM

संगमेश्वर: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये आली होती. त्याचवेळी राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्याने त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस संगमेश्वरमध्ये आले. राणे जेवत असतानाच पोलीस घरात घुसले आणि त्यांनी राणेंना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भाजप नेते नितेश राणे आणि निलेश राणे संतापले. या घटनेचा एक व्हिडीओच व्हायर झाला आहे. (Union minister Narayan Rane arrested, watch what happened? video viral)

भाजप नेते प्रसाद लाड यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ 57 सेकंदाचा आहे. त्यात एका खोलीत नारायण राणे खुर्चीवर बसून जेवताना दिसत आहेत. खोलीत एक डॉक्टरही आहेत. सोबत निलेश आणि नितेश राणेही आहेत. तसेच प्रसाद लाड आणि इतर काही कार्यकर्तेही दिसत आहेत. त्याच वेळी काही पोलीस आत शिरले आणि त्यांनी राणेंना अटक करण्यात येत असल्याचं सांगितलं. चार पोलीस आत शिरल्यानंतर त्यांना निलेश राणे सामोरे गेले. आणि पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

पोलीस राणेंना अटक करण्यासाठी आल्यानंतर ऑर्डर दाखवा. आधी मला ऑर्डर दाखवा. नंतरच सायबांना अटक करा, असं निलेश राणे पोलिसांना जोरजोरात बोलताना दिसत आहेत. तुम्ही साहेबांना हात का लावणार. साहेबांना हात नाय लावायचा. कधीपासून तुमचं हे चाललं आहे. कधीपासून गप्प बसायचं? आधी वॉरंट ऑर्डर दाखवा मगच साहेबांना अटक करा, असं निलेश राणे जोरजोरात बोलताना दिसत आहेत. तेवढ्यात एकजण एक मिनिट एक मिनिट साहेब जेवत आहेत, असं म्हणताना दिसत आहे. निलेश यांच्यापाठी नितेश राणेही तावातावाने बोलताना दिसत आहेत.

अन् राणेंचं ताट खेचलं

व्हिडीओत सुरुवातीला राणे जेवताना दिसत आहेत. त्यांच्या ताटात भात, भाजी आणि भाकरी दिसत आहे. मात्र, नंतर त्यांचं ताट कुणी तरी हिसकावल्याचं या व्हिडीओत दिसतं. मात्र, हे ताट नेमकं कुणी ओढलं ते दिसत नाही. राणेंना जेवू न देताच त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.

डॉक्टरांचा सावरण्याचा प्रयत्न

या खोलीत असलेले डॉक्टर मात्र निलेश राणेंना सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर पोलीस मात्र, हा सर्व प्रकार शांतपणे ऐकून घेताना दिसत आहेत. (Union minister Narayan Rane arrested, watch what happened? video viral)

संबंधित बातम्या:

नारायण राणेंना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, तातडीनं सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

नारायण राणेंची प्रकृती बिघडली, बीपी, साखरेचे प्रमाण वाढले, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

नारायण राणेंना संगमेश्वरमध्ये अटक; अटकेचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर!

(Union minister Narayan Rane arrested, watch what happened? video viral)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.