नारायण राणेंचं कुणकेश्वराच्या साक्षीने औक्षण, उत्तम आरोग्यासाठी मंत्रपठण

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली आहे. कणकेश्वरमध्ये जन आशीर्वाद आल्यानंतर राणेंचं मंत्रोच्चारात औक्षण करण्यात आलं. (narayan rane)

नारायण राणेंचं कुणकेश्वराच्या साक्षीने औक्षण, उत्तम आरोग्यासाठी मंत्रपठण
narayan rane
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 2:53 PM

सिंधुदुर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली आहे. कणकेश्वरमध्ये जन आशीर्वाद आल्यानंतर राणेंचं मंत्रोच्चारात औक्षण करण्यात आलं. राणेंना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून यावेळी प्रार्थना करण्यात आली. (Union Minister narayan rane’s jan ashirwad yatra reached at sindhudurg)

नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गातील कणकेश्वरमध्ये आली. यावेळी मंडपात कणकेश्वराच्या साक्षीने पुरोहितांनी मंत्रपठण करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी राणे कुटुंबासहित विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार, प्रमोद जठार आणि रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या औक्षण कार्यक्रमानंतर राणेंची पुन्हा यात्रा सुरू झाली.

राणेंचं मनस्वास्थ बिघडलं: राऊत

नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत, त्यांची प्रकृती बरी नसते. अटकेचा प्रसंग आला तेव्हा ते आजारी पडले. मनस्वस्थ बिघडलं आहे. त्यांच्या मुलाने त्यांना त्रास देऊ नये, अशी टोलेबाजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली. संजय राऊत यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे्य यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणेंना लक्ष्य केलं.

राणेचं आरोग्य उत्तम

राणेंच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. उलट आता लवकरचं विरोधकांचं स्वास्थ्य बिघडेल, असं सांगतानाच आम्ही लवकरचं दोन राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिला आहे.

देवगडमध्ये पोलीस बंदोबस्त

देवगड शिवसेना शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याठिकाणी काही शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन उभे आहेत. साधारण 30 ते 40 शिवसैनिक उपस्थित आहे. जामसंडेची सभा झाल्यानंतर याच मार्गावरून नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा जाणार आहे.

जामसंडे यात्रेत राणे काय म्हणाले?

दरम्यान, जामसंडे इथे नारायण राणेंनी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, “मोदी यांनी मला केंद्रीय मंत्री बनविले, भारताला मोदी प्रगतीकडे घेऊन जात आहेत. मोदींबदल गर्व आणि अभिमान वाटतो” (Union Minister narayan rane’s jan ashirwad yatra reached at sindhudurg)

संबंधित बातम्या:

नाव राणे अन् चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांचा राणेंवर बोचरा वार

राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय, त्यांनी विपश्यना करावी; संजय राऊतांचे हल्ले सुरूच

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर

(Union Minister narayan rane’s jan ashirwad yatra reached at sindhudurg)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.