VIDEO: कोण आहेत ते तुषार भोसले? अजित पवारांनी जेव्हा भाजपच्या वारकरी नेत्याला जागा दाखवली!

यंदा वारीत खंड पडू न देता वारीला परवानगी देण्याची मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल करण्यात आला.

VIDEO: कोण आहेत ते तुषार भोसले? अजित पवारांनी जेव्हा भाजपच्या वारकरी नेत्याला जागा दाखवली!
ajit pawar
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 7:04 PM

पुणे: यंदा वारीत खंड पडू न देता वारीला परवानगी देण्याची मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल करण्यात आला. तेव्हा कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल करून अजितदादांनी भोसले यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे तुषार भोसले हे चर्चेत आले आहेत. (ajit pawar taunt tushar bhosle, know about acharya)

पवार काय म्हणाले?

अजितदादा आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तुषार भोसले यांनी वारीबाबत सरकारला इशारा दिल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल पवारांनी केला. त्यावर ते भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं. त्यावर, कोणत्याही राजकीय व्यक्तीने काही सांगितलं तर ते कितपत गांभीर्याने घ्यायचं ते वेगळं आहे. आम्ही सर्वांनी वारकीर संप्रदायाशी चर्चा केली आहे. कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे त्यांना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे, असं पवार म्हणाले.

कोण आहेत तुषार भोसले?

तुषार भोसले हे भाजपच्या आध्यात्मिक आघाडचे प्रमुख आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील ते आचार्य आहेत. त्यांना देण्यात आलेल्या आचार्य पदवीबाबतही वाद झाला होता. तसेच तुषार भोसले यांचं खरं नाव तुषार शालीग्राम पितांबर असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ते बहुजन समाजाचे नसून ब्राह्मण असल्याच्या चर्चाही मधल्या काळात रंगल्या होत्या. त्यांनी वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज यांच्याकडे वेदांचे शिक्षण घेतले आहे. ते जगन्नाथ महाराजांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील भारतीय विद्याभवनमधून घेतले आहे. वयाच्या 17व्या वर्षी अखंड 365 दिवस प्रवचन देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

भारतीय विद्याभवनने त्यांना 2012 रोजी अद्वैत वेदांतात शास्त्री ही पदवी दिली. 2014मध्ये त्यांना आचार्य ही पदवी मिळाली. त्यांनी या दोन्ही पदव्या अध्ययन करून मिळविल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ते कीर्तनकार, प्रवचनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. तसेच प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणूनही त्यांची प्रतिमा तयार होत आहे. ते सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. (ajit pawar taunt tushar bhosle, know about acharya)

संबंधित बातम्या:

विनायक मेटे आक्रमक; 36 जिल्ह्यात मेळावे, मुंबईत 10 हजार बाईकची रॅली, पावसाळी अधिवेशावरही आंदोलनाचा इशारा

मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट, मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा

भाजप्रणित अध्यात्मिक आघाडीच्या इशाऱ्यानंतर ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेत वाढ

(ajit pawar taunt tushar bhosle, know about acharya)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.