राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर काय उधळलं? आंदोलकाला लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण; रेस्ट हाऊसमध्ये काय घडलं?

राज्याचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. मात्र, या दौऱ्यात विखे पाटील यांना एका विचित्र प्रकाराला सामोरे जावं लागलं आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर काय उधळलं? आंदोलकाला लाथाबुक्क्याने जोरदार मारहाण; रेस्ट हाऊसमध्ये काय घडलं?
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 10:36 AM

सोलापूर | 8 सप्टेंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं आहे. रोजच कुठे ना कुठे मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी निदर्शने केली जात आहे. तर काही ठिकाणी मोर्चे काढले जात आहे. जाळपोळ सुरू आहे. तर काही ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी जिल्हे आणि तालुके बंद पुकारण्यात आले आहेत. मराठा आंदोलक पेटलेले असतानाच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला असून या आंदोलकांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी ते रेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. विखे पाटील आल्याची कुणकुण लागताच धनगर समाजातील आंदोलकांनी रेस्ट हाऊसकडे धाव घेतली. मंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे. आम्हाला त्यांची भेट हवीय असं आंदोलकांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनीही त्यांचं म्हणणं विखे पाटील यांच्याकडे पोहोचवलं. तेव्हा विखे पाटील यांनी आंदोलकांना येण्याची परवानगी दिली. आम्ही जनतेचे प्रश्नच सोडवण्यासाठी बसलो आहोत, असं सांगत विखे पाटील यांनी धनगर समाजातील कार्यकर्त्यांना बोलावलं.

विखे पाटीलही गोंधळले

हे कार्यकर्ते रेस्ट हाऊसमध्ये आले. कार्यकर्ते येताच विखे पाटील ऊठून उभे राहिले. त्यांना नमस्कार केला. आणि तुमचं काय म्हणणं आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी धनगर समाजातील आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना निवेदन दिलं. बंगाळे हा विखे पाटील यांच्या बाजूलाच उभा होता. विखे पाटील निवेदन वाचत असतानाच अचानक बंगाळे यांनी खिशात हात घातला आणि खिशातून पुडी काढत विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे विखे पाटील यांच्या अंगावर संपूर्ण हळद पसरली. या प्रकाराने विखे पाटील काहीसे गोंधळले.

लाथा बुक्क्याने तुडवलं

हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनी अरे सोडून द्या त्याला. मारू नका, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बंगाळे याला बाहेर ओढत नेलं.

तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे फासणार

यावेळी शेखर बंगाळे यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. आम्ही आज भंडारा उधळला आहे. आमचा निषेध नोंदवला आहे. धनगर समाजाला अजूनही आरक्षण देण्यात आलेलं नाही. आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही. आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये, असं सांगतानाच आम्हाला आरक्षण नाही दिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बंगाळे यांनी दिला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.