Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएसआयच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा, विद्यार्थी संतापले; एमपीएससी आयोगावर आंदोलनाचा इशारा

एमपीएससी आयोगाने आरक्षणानुसार पद भरती न केल्याने धनगर आणि वंजारी समाजातील विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. (Dhangar community warns of agitation against mpsc)

पीएसआयच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा, विद्यार्थी संतापले; एमपीएससी आयोगावर आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 6:13 PM

पुणे: एमपीएससी आयोगाने आरक्षणानुसार पद भरती न केल्याने धनगर आणि वंजारी समाजातील विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. पीएसआयच्या भरतीत अवघ्या तीनच जागा दिल्याने या विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Dhangar community warns of agitation against mpsc)

एमपीएससी आयोग धनगर आणि वंजारी समाजाला आरक्षणानुसार जागा देत नाही. त्यामुळे धनगर समाजातील मुलांवर अन्याय होत असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे. 2020च्या एमपीएससी आणि पीएसआय पदांच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयोगाने आरक्षणानुसार जागा भराव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीडी आणि एनटीसी जागा आरक्षणानुसार द्या, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे.

मराठा समाजाचे सदस्य MPSC पॅनेलवर

दरम्यान, एमपीएससी आयोगावर नेमण्यात आलेले नवनिर्वाचित तीनही सदस्य हे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आहेत, असा आरोप करत आघाडी सरकारने विदर्भाचे आणि ओबीसी समाजाचे सदस्य पॅनेलवर घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅनेलवरील काही जागा रिक्त होत्या. त्या जागांवर राज्य सरकारने नियुक्त्या केल्या आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे सदस्य शासनाने पॅनेलवर घेतले आहेत, असा आरोप बबनराव तायवाडे यांनी केला होता. MPSC पॅनेलवर विदर्भातील ओबीसी सदस्य घ्या, केवळ पश्चिम महाराष्ट्रातील मराठे नकोत, असं त्यांनी म्हटलं होतं.

ओबीसी सदस्य घ्या, नाहीतर आंदोलन छेडू!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पॅनेलमधील तिन्ही सदस्य मराठा समाजाचे आहेत. म्हणजेच आताचे तीन आणि आधीचे दोन सदस्य मराठा आहेत, ते ही पश्चिम महाराष्ट्रातील…. आघाडी सरकारने विदर्भाचे आणि ओबीसी समाजाचे सदस्य पॅनेलवर घ्यावेत, असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय. तसंच ओबीसी सदस्य न घेतल्यास त्यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. (Dhangar community warns of agitation against mpsc)

संबंधित बातम्या:

ओबीसींचं राजकीय आरक्षण का गेलं?, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सर्वांत मोठा दावा

राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं आज नागपुरात अधिवेशन, ओबीसींची पुढची लढाई कशी, विचारमंथन होणार

रॅगिंग की मानसिक अस्थैर्य, नाशिकमधील डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूचं नेमकं कारण काय?

(Dhangar community warns of agitation against mpsc)

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.