पुणे इसिस मॉड्यूलमधील दहशतवाद्यांच्या रडारवर हिंदू नेते, या नेत्यांच्या हत्येचा होता कट

pune isis module case | पुणे शहरात पकडलेल्या अतिरेक्यांनी पुणे इसिस मॉड्यूल तयार केले होते. त्यात त्यांनी युवकांना दहशतवादी संघटनेत सहभागी करुन घेणे, हिंदू नेत्यांची हत्या घडवून आणणे, देशात बॉम्बस्फोट घडवून अराजकता तयार करण्याचा उद्देश ठेवला होता. एनआयएच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.

पुणे इसिस मॉड्यूलमधील दहशतवाद्यांच्या रडारवर हिंदू नेते, या नेत्यांच्या हत्येचा होता कट
terroristImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 6:06 PM

पुणे | 16 नोव्हेंबर 2023 : पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यात महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी यांचा समावेश होता. या दोघांना 18 जुलै रोजी मोटारसायकल चोरी प्रकरणात पकडले होते. त्यानंतर ते राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) लिस्टमधील दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिला गेला होता. त्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अतिरेक्यांनी पुणे इसिस मॉड्यूल तयार केले होते. त्यात त्यांनी युवकांना इसिसमध्ये ओढण्यापासून देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यापर्यंत कट रचला होता. तसेच या अतिरेक्यांच्या रडारवर काही हिंदू नेते होते. ती माहिती चौकशीतून समोर आली आहे.

कोण होते दहशतवाद्यांच्या रडारवर

अतिरेक्यांच्या रडारवर कोण कोणते नेते होते, याची माहिती इसिस मॉड्यूलमधील दहशतवादी अब्दुल्ला अर्सलान याच्या चौकशीतून एनआयएला मिळाली आहे. या अतिरेक्यांच्या रडारवर उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील शिवशक्ती धाम मंदिराचे महंत नरसिंहानंद होते. त्यांनी त्यांच्या हत्येच्या कटही रचला होता. तसेच इतर हिंदू नेतेही होते. त्या नेत्यांची नावे एनआयएकडून उघड करण्यात आलेली नाही. या अतिरेक्यांकडून एनआयएने एक पिस्तूल, पाच काडतूस आणि काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस जप्त केले आहेत. पुणे मॉड्यूलमधील सात जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

दहशतवाद्यांनी तयार केला टार्गेट ‘एस’

दहशतवाद्यांनी टार्गेट ‘एस’ म्हणजेच स्टुडंट तयार केला होता. त्यासाठी सरकार आणि प्रशासनावर नाराज असलेल्या युवकांचा ते शोध घेत होते. त्यानंतर त्या युवकांना जिहादच्या नावावर दहशतवादी बनवत होते. तसेच ज्या पद्धतीने काही वर्षांपूर्वी सीमी संघटनेने युवक आणि विद्यार्थ्यांना लक्ष केले होते, तसेच लक्ष टार्गेट एसमध्ये करण्यात आले होते. अतिरेक्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आपले लक्ष केले होते. या प्रकरणात मागील काही दिवसांपूर्वी काही युवकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून हे युवक आयएसआयएस संघटनेत जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.