दानवे निवडून कसे आले?, खोतकर काय म्हणाले?; रावसाहेब दानवेंनी सांगितला निवडणुकीचा अफलातून किस्सा

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे जिथे जातात तिथे जुन्या आठवणींना उजाळा देत एक एक रंजक किस्से सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या भाषणांना अलोट गर्दी लोटते. (Raosaheb Danve tells his election campaign story)

दानवे निवडून कसे आले?, खोतकर काय म्हणाले?; रावसाहेब दानवेंनी सांगितला निवडणुकीचा अफलातून किस्सा
Raosaheb Danve
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 4:23 PM

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे जिथे जातात तिथे जुन्या आठवणींना उजाळा देत एक एक रंजक किस्से सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या भाषणांना अलोट गर्दी लोटते. पुण्यातही त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगितला. त्यांना लोकांनी साडे तीन लाखांच्या मताधिक्क्याने कसं निवडून दिलं याचं गुपितच सांगितलं. (Raosaheb Danve tells his election campaign story)

रावसाहेब दानवे आज पुण्यात होते. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी निवडणुकीतील विजयाचा किस्साच सांगितला. निवडणुकीत दरम्यान आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. निवडून आल्यावर मी विजयाचा प्रमाणपत्रं घ्यायला गेलो होतो. त्यावेळी अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर सोबत होते. मला एवढं मोठं मताधिक्य पडल्याने लोणीकरांना मोठा प्रश्न पडला. एकही सभा न घेता दानवे एवढ्या फरकाने कसे निवडून आले? असा सवाल लोणीकरांनी खोतकरांना केला. त्यावर, लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल. शेवटचं मत देऊन टाकावं. म्हणून निवडून आले असतील, असं खोतकरांनी सांगितलं. दानवे यांनी हा किस्सा ऐकवताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तो इतका की दानवेंनाही हसू अवरेना झालं.

अन् फाटका शर्टच दाखवला

याचवेळी दानवेंनी अजूनही एक किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताना त्यांनी त्यांचा फाटका शर्टच उपस्थितांना दाखवला. मी केंद्रात तीनदा मंत्री झालो आणि महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष राहिलो. पण मी साधेपणा कधी सोडला नाही. काल मी हैदराबादला एका मित्राकडे गेलो. मोठा माणूस आहे. तो म्हणाला, दादा तुम्ही खादीचं शर्ट घ्या. मी म्हणालो, का? त्यावर तो म्हणाला, तुमचं शर्ट फाटलंय, असं सांगत असतानाच आता तुमच्या पैकी कोणी फाटलेलं शर्ट घालून बसलंय का? घरातून निघताना तुमच्या पत्नीने सांगितलं तुमचं शर्ट फाटलेलं आहे, असा आहे का कोणी माणूस इथं बसलेला? असा सवाल दानवेंनी उपस्थितांना केला.

बरं एवढं सांगून थांबतील ते दानवे कसले? त्यांनी भर सभेत थेट आपला फाटलेला शर्टच दाखवला. हे बघा माझं शर्ट फाटलेलं आहे. याला आम आदमी म्हणतात. लोकं म्हणतात आपल्यासारखाच दिसतो, आपल्यासारखाच बोलतो. आपल्या सारखाच राहतो. ह्यो असला काय आणि दुसरा असला काय फरक पडतो आपल्याला. म्हणूनच लोकं मला एवढ्या वेळा निवडून देतात, असं ते म्हणाले. त्यावर पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हस्याचे फव्वारे उडाले.

दानवेंचा भन्नाट सल्ला

सध्या पेट्रोल दर 100 पार झाल्याने आता ई-बाईकच परवडते. इंधनाचे दर हे आता आंतरराष्ट्रीय बाजारातून ठरतात आणि हे धोरण मोदींनी नाहीतर काँग्रेस सरकारने ठरवलं आहे. हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे, असं ते म्हणाले. ई बाईकवरचा जीएसटी केंद्राने कमी केला आहे. ई बाईकला सायलन्सरच नाही त्यामुळे गाडीचा आवाजच येत नाही. त्यामुळे तरूणाईमध्ये ई बाईकची क्रेझ कमी आहे म्हणून या बाईकही आवाज मारतील असं काहीतरी करा, असा भन्नाट सल्लाही दानवेंनी दिला.

एक हजार एक्सप्रेस रेल्वे सेवेत

‘वंदे भारत’ नावाच्या एक हजार एक्सप्रेस आता रेल्वेच्या सेवेत येणार आहेत. चेन्नईत या रेल्वे तयार होत आहे. मी पाहणी करून आलो. चांगले डबे आणि चांगली सेवा द्यायची आहे. पण रेल्वे चालवायची असेल तर पैसा कुठून आणायचा? भाडे तर वाढवू शकत नाही. आता काही रेल्वे आम्ही खासगीत चालवायला देत आहोत. समजा पाटलांनी आज बाईक घेतली आणि त्यांनी उद्या म्हटलं दानवे मला रेल्वे चालवायची आहे. मीच भाडं वसूल करेल त्याचं. तर तेही द्यायला तयार आहोत, असं सांगतानाच दोन रेल्वे खासगी कंपनीला चालवायला दिल्याचंही दानवे यांनी सांगितलं. (Raosaheb Danve tells his election campaign story)

संबंधित बातम्या:

VIDEO: तुम्ही जर म्हटलं आम्हाला रेल्वे चालवायला द्या, तर त्याचीही केंद्राची तयारी आहे; रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

VIDEO: आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, देवेंद्र फडणवीसांचं माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मोठं विधान

क्लास-बिसची भानगड नाय, बसल्या बैठकीला 10 तास अभ्यास, UPSC चं चक्र परळीच्या ‘अभिमन्यू’ने सहज भेदलं!

(Raosaheb Danve tells his election campaign story)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.