‘उद्धव ठाकरेच आमचा चेहरा, सिनेमात खलनायक विरोधात एक हिरो लागतो’

"महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आहेत. कॉंग्रेस पक्षाचं नेतृत्व एक नाही, महाराष्ट्रात कॉंग्रेसचे अनेक नेते आहेत. काही माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे चेहरा असेल तर तो त्यांनी जाहीर केला पाहिजे", असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं.

'उद्धव ठाकरेच आमचा चेहरा, सिनेमात खलनायक विरोधात एक हिरो लागतो'
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 10:00 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीचं सरकार झाल्यानंतर ठाकरे-2 सरकार होऊ शकतं. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आहेत. कॉंग्रेस पक्षाचं नेतृत्व एक नाही, महाराष्ट्रात कॉंग्रेसचे अनेक नेते आहेत. काही माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे चेहरा असेल तर तो त्यांनी जाहीर केला पाहिजे. शरद पवारांचा चेहरा होता म्हणून राष्ट्रवादीला इतक्या जास्त जागा मिळाले. राहुल गांधी होते म्हणून कॉंग्रेसला 100 चा आकडा पार करता आला. सिनेमात खलनायका विरोधात एक हिरो लागतो. उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“अजित पवार हे महाविकास आघाडीत नाहीत. अजित पवार महाविकास आघाडीत होते. तेव्हा ते उद्धव ठाकरेंचे खंदे सहकारी होते. अनेक गोष्टीत दादा खमके होते. आता त्यांची विचारसरणी बदलली आहे. त्यांनी पक्ष सोडला, अमित शाह, अहमद शाह अब्दाली सारखे लोकांनी फोडलं. आता त्यांना आपलं राजकारण फसत आहे, असं वाटत असेल. राजकारणात माणसं निराश होतात, वैफल्यग्रस्त होतात. देवेंद्र फडणवीस सुद्धा अशीच वक्तव्यं करत होते. राज्याचे निकाल लागल्यावर त्यांना वैफल्य येईल”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

शरद पवार अजित पवारांना पुन्हा संधी देतील?

“शरद पवार अजित पवारांना परत राजकारणात संधी देतील, असं वाटत नाही. पवारांनी वेळोवेळी बैठकीत बोलून दाखवलं. बारामतीत अजित पवार पराभूत होतील. सुनेत्रा पवार झाल्या, पार्थ पवार पराभूत झाले. अजित पवार मतदारसंघ बदलतील, कर्जत जामखेड निवडतील. बारामती सोडणं हाच त्यांचा पराभव आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“अजित पवारांची एवढी ताकद नाही ते भाजपला सांगावं आणि ते ऐकावं. अजित पवार, एकनाथ शिंदे हे भाजपचे आश्रित आहेत. भाजपची भूमिका गरज सरो आणि वैद्य मरो अशी आहे. त्यांना शिवसेना फोडायची होती. राष्ट्रवादी फोडायची होती. त्यांनी ते केलं. केला तुका आणि झाला माका अशी परिस्थीती झाली”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“आम्ही जर कपटी भाऊ असू तर तुम्ही कोण आहात? बाळासाहेबांनी तुमचे सगळे लाड पूर्ण केले. एकनाथ शिंदेंचं राजकारण आवळावरचं पाणी आहे. दिल्लीत जोपर्यंत व्यापाऱ्यांचं सरकार तोपर्यंत शिंदेंना महत्त्व आहे. लाडकी बहीणचा फायदा बहिणींनी घेतलाच पाहिजे. सरकारी तिजोरीत खडका नाही”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.