राजकारणातील अजातशत्रू हरपला, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) याचं निधन झालं आहे.

राजकारणातील अजातशत्रू हरपला, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 11:40 PM

सोलापूर : तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. “आबासाहेबांच्या जाण्याने आमच्या देशमुख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आतापर्यंत चांगली होती. पण आज संध्याकाळी रात्री नऊ वाजता आबासाहेबांचं निधन झालं”, अशी माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली.

“आबासाहेबांनी डोंगराएवढा आदर्श उभारला आहे. जो पुरोगामी विचारसरणीचा वारसा त्यांनी जपला तो इथून पुढे असाच जपण्याचा आमचा पूर्ण कुटुंबियांचा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल, या दु:खाला सामोरं जाण्याची शक्ती इश्वराने सर्वांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो”, असं अनिकेत देशमुख ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत बोलताना म्हणाले.

‘विधीमंडळ पोरकं झाल्यासारखं वाटतंय’

गणपतराव यांच्या निधनानंतर शेकाप नेते जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “गेले चार दिवस मी सोलापुरातच होतो. आज सकाळी आलो. त्यांची तब्येत सुधारत होतो. पण आता घरी पोहोचल्यावर त्यांच्या निधनाची माहिती मिळाली. त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मला फोन केला. मी पुन्हा सांगोल्याकडे निघालो आहे. आबासाहेब यांच्या निधनाने विधीमंडळ पोरकं झाल्यासारखं वाटतंय. आबासाहेब म्हणजे विधीमंडळातलं विद्यापीठ होतं. वेगवेगळ्या कायद्यांवर त्यांनी केलेली भाषणं ही ऐकताना आम्हाला एकदम भारावून जायचं. गणपतराव यांनी आम्हाला घडवलं. ग्रामीण भागात काम करताना कष्टकरांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची, त्यांच्यात जिव्हाळा निर्माण करुन त्यांच्यासोबत कसं काम करावं ही शिकवण आबासाहेबांनी आम्हाला दिली. म्हणून त्यांची पोकळी आमच्यासाठी कधीही भरुन न निघणारी आहे. मला आता बोलायला सुद्धा शब्द कमी पडत आहेत. गेले तीन दिवस मी त्यांच्याजवळ रुग्णालयातच होतो”, असं जयंत पाटील म्हणाले.

गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

आबासाहेब देशमुखांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्या निस्सीम प्रेम केलं.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

साधा माणूस

गणपतराव देशमुख हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे सर्वाधिक लोकप्रिय होते. 11 वेळा आमदार राहूनही त्यांची राहणीमान अत्यंत साधी राहिली आहे. एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा आमदार म्हणूनही त्यांच्याबद्दल राज्यातील नागरिकांना नेहमीच कुतुहूल वाटायचे. त्यामुळेच त्यांच्या साधी राहणीमानाची नेहमीच चर्चा व्हायची. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणाऱ्या माणसाचा नेता अशी त्यांची ख्याती होती. सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले.

केवळ दोनदा पराभव

शेतकरी कामगार पक्ष राज्यात प्रभावहीन झाला आहे. तरीही देशमुख यांनी सांगोला मतदारसंघ राखला. या मतदारसंघातून ते तब्बल 11 वेळा निवडून आले. 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या देशमुखांना केवळ 1972 आणि 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला. 1972 मध्ये काकाळासाहेब साळुंखे-पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तर 1995मध्ये काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी त्यांना पराभूत केले. हे दोन पराभव वगळता देशमुख यांनी सातत्याने विजय मिळवला आहे. मात्र, प्रकृती आणि वय या दोन कारणामुळे 94 वर्षीय देशमुख यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली नाही.

अधिककाळ विरोधी बाकावर

गणपतराव देशमुख सर्वाधिक काळ विधानसभेत राहिले असले तरी बहुतेक काळ ते विरोधी पक्षातच होते. 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले. त्यावेळी देशमुखांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. हा अपवाद वगळता ते नेहमी विरोधी पक्षातच राहिले.

तर मुख्यमंत्री झाले असते…

पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूची 5वी युवा संसद जानेवारी 2020मध्ये पार पडली. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. 1999मध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार असा पेच निर्माण झाला. कारण आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती. पण बहुमत नसल्याने आमदार आपल्यासोबत येणार नाहीत, हेही दिसत होते. त्यावेळी शेकापचे तीन आमदार निवडून आले होते. तेव्हा गोपीनाथ मुंडेही मुख्यमंत्री नको आणि नारायण राणेही मुख्यमंत्री नको… गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा… असा विचार आला. त्यावर सर्व सहमतही होते. पण नंतर ते झालं नाही, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला होता.

संबंधित बातमी : राज्याच्या राजकारणातील एक पर्वाचा अस्त, गणपतराव देशमुखांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा आढावा

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.