‘महाराष्ट्राचा बिहार करु नका’, छोट्या पुढारीने गौतमी पाटील हिला सुनावलं

"छोटा पुढारी म्हणून सांगतो की, गौतमी पाटील असेल किंवा आणखी कोणी, असे वर्तन करणे आम्ही खपवून घेणार नाही. त्याला सुट्टी नाही. माझा गौतमी ताईंना विरोध नाही. मात्र डान्स करण्याच्या पद्धतीमुळे गर्दी होते. ती पद्धत त्यांनी बदलावी", अशा इशारा घनश्याम दराडे याने दिला.

'महाराष्ट्राचा बिहार करु नका', छोट्या पुढारीने गौतमी पाटील हिला सुनावलं
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 9:02 PM

सोलापूर : महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका छोटा पुढारी घनश्याम दराडे याने यावेळी नृत्यांगणा गौतमी पाटील हिला सुनावलं आहे. “गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. गौतमी पाटलांचा कोणत्याही कार्यक्रम शांततेत पार पडलाय, असं दिसत नाही. लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. तो अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला फेमस व्हायचे असेल तर जरूर व्हा. मात्र ते तुमच्या कर्तुत्वावर. चुकीच्या पद्धतीने अश्लीलता दाखवून फेमस होऊ नका”, असा सल्ला महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दराडे यांनी दिला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज हे बाई वाचवणारे होते नाचवणारे नव्हते हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. छोटा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतो की, वाकडेतिकडे चाळे करून तुम्ही डान्स केला तर येणाऱ्या पिढीवर काय संस्कार होतील? नव्या पिढीला वाटेल की असे वाकडेतिकडे चाळे करून डान्स केला तर फार फेमस होतं. त्यामुळे नवी पिढी त्याकडे आकर्षित होईल आणि त्याप्रमाणे वागेल”, असं घनश्याम दराडे म्हणाला.

‘गौतमी ताईंनी क्रेज टिकून ठेवायची असेल तर…’

“छोटा पुढारी म्हणून सांगतो की, गौतमी पाटील असेल किंवा आणखी कोणी, असे वर्तन करणे आम्ही खपवून घेणार नाही. त्याला सुट्टी नाही. माझा गौतमी ताईंना विरोध नाही. मात्र डान्स करण्याच्या पद्धतीमुळे गर्दी होते. ती पद्धत त्यांनी बदलावी. गौतमी ताईंना महाराष्ट्रावर कायम क्रेज टिकून ठेवायचे असेल तर चांगला कार्यक्रम, चांगला डान्स करावा लागेल. गौतमी ताईंनी तरुणांचा आकर्षण न राहता महाराष्ट्राचा आकर्षण राहावं तेवढं कर्तृत्व त्यांच्यामध्ये आहे”, असंदेखील छोटा पुढारी घनश्याम दराडे म्हणाला.

हे सुद्धा वाचा

‘अजितदादा बोलले त्यात चुकीचं काय?’

“विरोधी पक्षनेते अजित पवार (अजितदादांनी) भाषणात सांगितले की गौतमी पाटलांना बोलवा. त्यात चुकीचे काही नाही. महाराष्ट्रात सध्या सबसे कातील गौतमी पाटील ही फेमस आहे. त्यामुळे उरसामध्ये गौतमी पाटीलला बोलवा असे अजित दादा म्हणाले. अजितदादा कुठेही चुकीचं किंवा वाईट बोललेले नाहीत. त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नये. गौतमी पाटलांवर मी फेमस होण्यासाठी टीका करतोय असे काही तरुणांनी मला कमेंटमध्ये म्हटले. मात्र मला तसे करायची गरज नाही. कारण जेव्हा गौतमी पाटलांचा ट्रेंड नव्हता तेव्हा महाराष्ट्रात छोटा पुढाऱ्याचा ट्रेंड होता”, असं घनश्याम दराडे म्हणाला.

घनश्याम दराडे यांचा राजकारण्यांवर निशाणा

घनश्याम दराडे याने यावेळी महाराष्ट्रातील राजकारण्यांवरही निशाणा साधला. “महाराष्ट्रातील कोणाच्या बुडाखाली किती आमदार आहे आणि किती नाही हे आपल्याला माहिती आहे. आता महाराष्ट्रातील पुढार्‍यांवर बोलले नाही पाहिजे तर डायरेक्ट प्रक्रिया केली पाहिजे. 2024 ला या सर्व पुढार्‍यांना मतदानाच्या प्रक्रियेतून मुसंडी दाखवायची. ज्यांनी जनतेसाठी 24 तास काम केले त्यांनाच सत्तेत बसवले पाहिजे. अन्यथा खुर्च्यातली दोन माणसे बदलतायेत मात्र खुर्च्या तशाच राहतात”, असं घनश्याम म्हणाला.

“भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र भंगार 40 रुपये, रद्दी 20 रुपये आणि दिवस-रात्र कष्ट करून पिकवलेल्या कांद्याला चार-पाच रुपये भाव मिळतोय. अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे? शेतकरी आत्महत्या करेल नाहीतर काय करेल?”, असा सवाल घनश्यामने केला.

“दुधाचे भाव वाढले म्हणून शेतकऱ्यांनी गाई घेतल्या तर लगेच दुधाचे भाव पाडले. या सत्ताधाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. हे कुठे पाप फेडतील. सत्ताधाऱ्यांची फक्त खुर्च्यासाठी मारामारी आणि धराधरी सुरू आहे. हे राजकारण नाही तर गजकरण करतायेत”, अशी टीका घनश्यामने केली.

“2024 ला तुम्ही पक्ष, माणूस बघूनका. कोणी कोणत्या गटाकडून कोणत्या गटाकडे उड्या मारल्यात हे बघू नका. मात्र त्या नेत्याचं काम बघा जनतेसाठी काय काम केलं ते बघा. जो योग्य पात्रतेचा असेल तरच त्याला निवडून द्या. अन्यथा घरी पाठवा”, असं आवाहन घनश्याम दराडे यांनी केलं.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....