माजी मंत्र्याच्या बंगल्याच्या गेटवर आमदारानं स्फोटकं फोडली? सोलापुरात टोकाचं राजकारण

माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर आज (3 नोव्हेंबर) बार्शी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

माजी मंत्र्याच्या बंगल्याच्या गेटवर आमदारानं स्फोटकं फोडली? सोलापुरात टोकाचं राजकारण
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 10:30 PM

सोलापूर : माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्याच्या गेटवर तसेच गेटच्या आतमध्ये दिवाळीत पाच जणांनी मोठ्या तीव्रतेने आवाज करणारी स्फोटके फोडल्याबद्दल 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी दिलीप सोपल यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राऊत यांच्या समर्थकांनी हे स्फोटके फोडल्याचा आरोप दिलीप सोपल यांनी केलाय. दरम्यान, स्फोटकं फोडतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ही घटना 23 ऑक्टोबरला मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान घडली होती.

या प्रकरणी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर आज (3 नोव्हेंबर) बार्शी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते, नीलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हे सुद्धा वाचा

ही घटना 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती. सोपल यांनी 24 ऑक्टोबर रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने आज माजी मंत्री दिलीप सोपल यांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून स्फोटके फोडणाऱ्यांच्या नावांसह फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

संबंधित प्रकरणामुळे दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. खरंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सतत राजकीय वाद उफाळून येत असतो.

दोन महिन्यांपूर्वी आर्यन शुगर या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकवलेले बील देण्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळून आला होता.

“लोकांचे पैसे बुडवून आमचा काही संबंध नाही असं म्हणणाऱ्या दिलीप सोपलांवर ईडीची चौकशी लावणार आहे”, असं वक्तव्य राजेंद्र राऊत यांनी केलं होतं. “शेतकऱ्यांचे पैसे खायचे आणि माझा काही संबंध नाही म्हणायचं ही मग्रूरीची भाषा चालणार नाही आता ई़डी, इन्कम टॅक्स आहे, माझा काय संबंध असे म्हणून चालणार नाही”, असं राजेंद्र राऊत म्हणाले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.