दरीतून केवळ किंचाळण्याचा आवाज येत होता… प्रवासी गाढ झोपेत, धडाम धडाम आवाज अन्… अपघात नेमका कसा झाला?

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आज पहाटे 4 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात 13 प्रवासी ठार झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच या अपघातातील जखमींवर खोपोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

दरीतून केवळ किंचाळण्याचा आवाज येत होता... प्रवासी गाढ झोपेत, धडाम धडाम आवाज अन्... अपघात नेमका कसा झाला?
accident Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 9:39 AM

खोपोली : लोणावळ्याजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक खासगी बस 500 फूट खोल दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 लोक जखमी झाले आहेत. आज पहाटे चारच्या सुमारास प्रवाशी गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. बस कोसळल्याने धडाम धडाम आवाज येताच काही प्रवासी भानावर आले. त्यांनी लगेच किंचाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे या दरीतून केवळ किंचाळण्याचा आवाज येत होता. या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

लोणावळ्याजवळ बोरघाट परिसरातील शिंगरोबा मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस साईड बॅरियर तोडून सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. त्यामुळे बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. ही बस पुण्यावरून मुंबईला निघाली होती. पहाटे 4ची वेळ होती. सर्वच प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक धडाम धडाम धडाम असा आवाज झाला.

हे सुद्धा वाचा

काही तरी आक्रीत घडल्याची जाणीव होण्याआधीच बस दरीत कोसळली. त्यामुळे कुणाचं डोकं, कुणाचं शरीर तर कुणाचे पाय बसवर आदळले. अनेकांना मुक्का मार लागला. काळोखात काहीच दिसत नव्हतं. जे जिवंत होते त्यांना आपण कुठे आहोत हेही कळत नव्हतं. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला. वाचवा वाचवा… कुणी आहे का? असा पुकारा सुरू झाला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली.

वाहतुकीची कोंडी

स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांना माहिती दिली आणि मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. अपघातातील जखमींना बाहेर काढलं जात आहे. रात्रीचा अंधार असल्याने या बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र, उजाडताच या मदतकार्याच्या कामास वेग आला आहे. क्रेन मागवून बस बाजूला केली जात आहे. रुग्णवाहिकेतून जखमींना खोपोली नगर पालिकेच्या दवाखान्यात दाखल केलं जात आहे. तसेच अपघातामुळे या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

16 प्रवासी जखमी

सध्या बसमधील 16 जखमी प्रवाश्यांना बाहेर काढलं आहे. अजूनही काही लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तसेच जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तसेच खासगी डॉक्टरांनाही खोपोली नगरपालिकेच्या दवाखान्यात पाचारण करण्यात आलं आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.