ठेकेदाराने केडीएमसीला लावला २० कोटींचा चुना; तिघांविरोधात गुन्हा दाखल
ट्रक टर्मिनस प्रकल्प विकसीत करण्यासाठी दिलेला असताना भाडे थकवून महापालिकेला तब्बल 20 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. त्यामुळे या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (kdmc lodge complaint against contractor for fraud worth rs 20 crore)
कल्याण: ट्रक टर्मिनस प्रकल्प विकसीत करण्यासाठी दिलेला असताना भाडे थकवून महापालिकेला तब्बल 20 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. त्यामुळे या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (kdmc lodge complaint against contractor for fraud worth rs 20 crore)
मॅथ्यू जॉन कुचीन, अनिल चंदूलाल शहा आणि सीमा अनिल शहा असं या ठेकेदारांचं नाव आहे. या तिघांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने बीओटी तत्त्वावर कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी येथे ट्रक टर्मिनस प्रकल्प खासगी ठेकेदाराला विकसीत करण्यासाठी दिला होता. या ठेकेदाराने महापालिकेचे भाडे थकवून खोट्या कागदपत्रंच्या आधारे महापालिकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे. तब्बल 20 कोटी 69 लाख रुपयांची महापालिकेची फसवणूक केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरित्या कर्ज घेतलं
ठेका दिलानंतर वेळेत हा प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराने हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला नाही. त्याचबरोबर त्याने नियमबाह्ये करारनामे केले. या करारनाम्याच्या आधारे त्याने अवैधरित्या कर्ज घेतले आणि थर्ड पार्टी हक्क प्रस्थापित केले होते. त्यानंतर त्याने महापालिकेचे भाडे आणि त्यावरील व्याजही थकविले. त्यामुळे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रकल्प काय?
महापालिकेने सात ठिकाणी बीओटी तत्त्वावर प्रकल्प विकसीत करण्यासाठी ठेकेदारांना जागा उपलब्ध करून दिली होती. त्यातू महापालिकेला उत्पन्नही मिळणार होते. या प्रकल्पानुसार ट्रक टर्मिनल, पार्किंग प्लाझा, वाडेघर येथे स्पोर्ट्स क्लब, विठ्ठलवाडी येथे व्यापारी संकूल आणि भाजी मंडई, रुक्मिनीबाई रुग्णालयाशेजारी मॉल, लाल चौकी येथे कम्युनिटी सेंटर, डोंबिवली क्रीडा संकुलावर वाणिज्य संकुले आदी प्रकल्प करायचे होते. त्यातील काही प्रकल्प पूर्णही झाले आहेत. मात्र, काही प्रकल्प अजूनही अर्धवट आहे. काही प्रकल्पातील प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत, असंही सूत्रांनी सांगितलं. (kdmc lodge complaint against contractor for fraud worth rs 20 crore)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 September 2021 https://t.co/D52fzj0Ov2 #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2021
संबंधित बातम्या:
CCTV VIDEO | वसई स्टेशनवर वृद्धा चालत्या लोकलसमोर उभी राहिली, आणि…
कल्याणच्या तुरुंगात दोघा कैद्यांचा जेलरवर हल्ला, टोकदार वस्तूने वार
(kdmc lodge complaint against contractor for fraud worth rs 20 crore)