मोठी बातमी! ठाण्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 3 जानेवारीपासून लसीकरण; केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी
ठाणेकरांसाठी मोठी बातमी आहे. ठाण्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे येत्या 3 जानेवारीपासून लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर ठाणे महापालिकेने ही महत्त्वाची घोषणा केली आहे.
ठाणे: ठाणेकरांसाठी मोठी बातमी आहे. ठाण्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे येत्या 3 जानेवारीपासून लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर ठाणे महापालिकेने ही महत्त्वाची घोषणा केली आहे. तर येत्या 10 जानेवारीपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.
आरोग्य मंत्रालायाने नुकतेच 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि जेष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आवश्यक ते नियोजन सुरु करण्यात आले आहे.
कोव्हॅक्सिन लस मिळणार
15 ते 18 वर्षांची मुले लसीकरणासाठी आपल्या आयडी कार्डवरून कोविन अॅपवर नोंदणी करू शकतात. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व किशोरवयीन मुले या लसीकरणासाठी पात्र आहेत. ते ऑनलाइन किंवा केंद्रात जाऊन नोंदणी करू शकतात. 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये (15 ते 18 वर्षे) किशोरवयीन मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.
ज्येष्ठांना डोस कधी?
प्रतिबंधात्मक तिसरा डोस घेण्यासाठी 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या गंभीर आजार असलेल्या वृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनंतर किंवा 39 आठवड्यांनंतरच तिसरा डोस दिला जाणार आहे. लसीच्या दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे मोजले जातील. हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या कोविन ॲपच्या माध्यमातून हा प्रतिबंधनात्मक डोस मिळेल. त्यांना हा डोस कधी द्यायचा आहे, याबद्दल जुन्या नोंदणीकृत नंबरवर एसएमएसद्वारे देखील कळवले जाणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा केंद्रात जाऊन नोंदणी करता येणार आहे.
खासगी रुग्णालयातही लसीकरण
सर्व नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाची स्थिती विचारात न घेता सरकारकडून लसीकरण केंद्रावर मोफत कोविड-19 लस देण्यात येत आहे. परंतु ज्यांच्याकडे पैसे देण्याची क्षमता आहे त्यांना खाजगी रुग्णालयांच्या लसीकरण केंद्रांचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.
Video : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 28 December 2021 https://t.co/Duu5fM44bm @OfficeofUT @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra #Headlines #Tv9Marathi #SuperfastNews #MahafastNews #fastnews #DistrictNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2021
संबंधित बातम्या:
Nashik| नाशिकमधल्या मखमलाबाद कालव्यात तीन मुले बुडाली!
Maharashtra News Live Update : कोकणात काही भागात नाचे आहेत नाचे, जाधवांच्या नक्कलेवर राणेंची फिरकी