Maharashtra Breaking News LIVE 18 March 2025 : शिवसेनेचे ॲापरेशन टायगर, ठाकरे गटाला धक्का, तिघांचा प्रवेश सोहळा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 18 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
नागपूरमध्ये नियोजनबद्ध हिंसाचार
नागपूरमधील हिंसाचार हा नियोजनबद्ध होता. औरंगजेबला मानणारे लोक अजूनही अस्तित्वात आहेत, असे दिसून येत असल्याचे विश्व हिंदू परिषदने नागपुरात सांगितले.
-
नाशिकमध्ये रंगपंचमी, पोलिसांचे विशेष लक्ष
नाशिकमध्ये उद्या रंगपंचमी साजरी होत असताना शहरातील पारंपारिक पेशवेकालीन रहाडी देखील उघडल्या जाणार आहेत. दरम्यान अनेक सार्वजनिक मंडळांनी कुठे डीजे कुठे शॉवर तर कुठे पारंपारिक रहाडीचा रंगोत्सव आयोजित केला आहे. मात्र हुंदडबाजी आणि दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे.
-
-
ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये अकराशे सीसीटीव्ही
गुन्ह्याची उकल करण्यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतला जातो. त्यासाठी आता ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये अकराशे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही वॉररूम ठाण्यातील ग्रामीण पोलीस मुख्यालय या ठिकाणी बसवण्यात आले आहे.
-
तिघांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा
शिवसेनेत आज मुंबईतील तीन माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्या पाठोपाठ राज्यातील तीन माजी आमदारांचाही आज पक्ष प्रवेश होणार आहे. विधिमंडळ अधिवेशन काळात शिवसेनेचा ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे.
-
जळगावचे अभियंता प्रशांत सोनवणे यांची संभाजीनगरात बदली
जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली आहे.संभाजीनगरातील विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागात अधिक्षक अभियंता म्हणून त्यांची निवड झाली आहे.
-
-
मुंबई गोवा महामार्गावर दोन कारची धडक
खेड -रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ दोन कार मध्ये धडक झाल्याची घटना घडली आहे. या धडकेत एक कार रस्त्यावर पलटी झाली तर दुसरी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यावर आपटली, सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
-
पुण्यात ८० हजार लिटर गावठी दारु जप्त
पुणे – बिबवेवाडीत पोलिसांकडून 80 हजार लिटर गावठी दारू जप्त केली असून नगमा राजपाल राजनटे या 27 वर्षीय महिलेला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.
-
-
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड की केज न्यायालयात? आज होणार निर्णय
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भात आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. हा खटला केज न्यायालयात चालवायचा की बीड न्यायालयात यावर बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद संपला. आता थोड्याच वेळात न्यायालय निर्णय देणार आहे. साधारणत: चार वाजायच्यादरम्यान न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.
-
औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि दंगल होतात नागपूरमध्ये – मनोज जरांगे पाटील
मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीवरुन सध्या वाद सुरु आहे. महाराष्ट्रात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी, ‘औरंगजेबाची कबर निवडणुका आल्यास उकरून काढायचे काम सुरु आहे. समजाने सावध रहा. रहे सर्व कावे आहेत. औरंगजेबची कबर संभाजीनगरला आणि दंगल होतात नागपूरमध्ये’ असे म्हटले आहे.
-
नागपूरच्या हंसापुरी येथे जाळपोळ, १९ गाड्या जाळून खाक
नागपूर शहरातील हंसापूरी या भागात मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. यात सुमारे 19 गाड्या जाळल्या गेल्या असून अनेक घरावरती दगडफेक देखील करण्यात आली आहे. जाळपोळ करण्यापूर्वी या भागातील cctv कॅमेरे फोडण्यात आले.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान सभेतही रिपोर्टर आणि कॅमेरामनच्या आंदोलनाचा प्रश्न मांडला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान सभेतही रिपोर्टर आणि कॅमेरामनच्या आंदोलनाचा मांडला प्रश्न.
पत्रकारांचा अवमान झाला, त्यांना बोलावलं आणि चर्चा केली. विधीमंडळ प्रमुख डीसीपी बोलावले, संबंधित पोलीस कर्मचारी होता…
ज्यांनी गैरवर्तन किंवा चूक केली त्यावर कारवाई करण्याची सूचना दिली आहे.
-
नागपूरमध्ये पेट्रोल बॉम्ब आणले कुठून ? एकनाथ शिंदेंचा सवाल
नागपूर मध्ये काल घटना घडल्यानंतर दुपारी पोलिसांनी सर्व शांत केलं. मात्र रात्री चार-पाच हजार लोक कसे येतात. हॉस्पिटल वरती दगडफेक केली, हॉस्पिटल मधील देवदेवतांचे फोटो जाळण्यात आले. पेट्रोल बॉम्ब आणले कुठून ? एकनाथ शिंदेंनी सवाल उपस्थित केला.
-
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबीचे उदात्तीकरण सुरु आहे – एकनाथ शिंदे
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबीचे उदात्तीकरण सुरु आहे. अबू आझमी यांनी तुलना केली होती, त्यांना समज दिली होती – एकनाथ शिंदे
-
कोणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छावा चित्रपटानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. कोणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.
-
हा एक नवीन पॅटर्न -संजय राऊत
हिंदूंना भडकवण्यासाठी अशा प्रकारे दंगली घडवतात. आधी हिंदूंवर हल्ले केले जातात. हा एक नवीन पॅटर्न तयार केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
-
जीबीएसचा उद्रेक नाही
18 फेब्रुवारी नंतर जीबीएसचा रुग्ण सापडला नसल्याचं महापालिकाचे म्हणणं आहे.आरोग्य उपसंचालकांना महापालिका पत्र देणार आहे. पुण्यातील सिंहगड रोड या उद्रेक ग्रस्त भागात 18 फेब्रुवारी नंतर एकही जीबीएसचा रुग्ण सापडला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
-
टीना अंबानी सागर बंगल्यावर
टीना अंबानी यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती, हे समोर आलेले नाही.
-
दंगा करणारे चेहरे फडणवीसांना माहिती असतील
नागपूरमध्ये कोणी हिंसाचार घडवला, त्यांना कोणाची प्रेरणा आहे, असा सवाल करत दंगा करणारे चेहरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती असतील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.
-
खोक्याची ती कार पोलीस ठाण्यात
सतीश उर्फ खोक्या भोसलेने गुन्ह्यात वापरलेली गाडी त्याच्या मित्रांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात आणली. गुन्ह्यात वापरलेली गाडी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या मित्राची असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेची एक गाडी जप्त केली आहे.
-
अरबी समुद्रात प्रतिकात्मक आंदोलन
शेतकर्यांचे सोयाबीन कापसाला भावफरक द्यावा, संपूर्ण कर्जमुक्ती करावी, पीक विमा यासह विविध प्रश्न घेऊन रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसह मुंबईचे अरबी समुद्रात सोयाबीन, कापूस आणि सातबारा बुडवून प्रतिकात्मक आंदोलन करणार होते, अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी दिली.
-
राज्यात पोलीस अलर्ट मोडवर
औरंगजेब कबरी संदर्भात नागपूर शहरातील झालेल्या घटनेनंतर राज्यभर पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या मालेगावात शांतता आहे. मालेगावात काल हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले होते.
-
शिरूर शहरात कचरा डेपोला पुन्हा भीषण आग
पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरात कचरा डेपोला पुन्हा भीषण आग लागली असून या आगीत धुराचे लोटे आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र पसरले आहेत, या धुरामुळे शहरवासी यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हा कचरा डेपो तातडीने इतरत्र हलवून त्यावर प्रक्रिया करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मात्र नगरपरिषेदकडून याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे…
-
Maharashtra News: अहिल्यानगर मधून बेपत्ता असलेल्या व्यापाराचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ…
दीपक परदेशी असे व्यापाऱ्याचे नाव असून परदेशी हे 21 दिवसापासून होते बेपत्ता… दीपक परदेशी यांचे अपहरण करून खून केल्याचे निष्पन्न… नगर मनमाड रोड वरील निंबळक बायपास जवळ नाली मध्ये सापडला दीपक परदेशी यांचा मृतदेह… पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात…
-
Maharashtra News: गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाका वाढला…
दररोज 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमानात वाढ… जिल्ह्याचे तापमान 38 अंश तापमान… विदर्भातील इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये गोंदिया जिल्हा हा थंड असून दुसऱ्या क्रमांकावर तापमान… एप्रिल महिन्यात तापमानामध्ये 40 अंशापेक्षा वाढ होण्याची शक्यता… उन्हामध्ये आवश्यक काम असल्यास नागरिकांनी बाहेर पडावे… जिल्हा प्रशासनाचे आव्हान….
-
Maharashtra News: जळगाव जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीचे १७ ग्रामपंचायत सदस्य अपात्र
ग्रा.पं. सदस्यांसह सरपंचाविरोधात दाखल जिल्हाधिकाऱ्यांनी ३२ प्रकरणात सुनावणी पूर्ण करून आदेश जारी केले आहेत. १२ तक्रारदारांनी माघार घेतल्यानंतर संबंधित प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत… तक्रारींमध्ये अतिक्रमणासह तिसरे अपत्य व निवडणूक खर्च मुदतीत सादर केला नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त होते…
-
नाशिक- रामकुंड, सीतागुफा परिसरातील वास्तूंचं स्ट्रक्चरल ऑडिट
नाशिक- रामकुंड, सीतागुफा परिसरातील वास्तूंचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. एलसीपी सल्लागार कंपनीकडून ऑडिट प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ६५ कोटींच्या निधीतून रामकुंड परिसराचे शोभीकरण करण्यात येणार आहे. गंगा गोदावरी मंदिर, त्र्यंबकेश्वर मार्ग यांचेही सुधारणा काम होणार आहे. पंढरपूरच्या धर्तीवर भाविकांसाठी सुविधा उभारणार आहेत.
-
साधू महंतदेखील आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरून आक्रमक
नाशिक- साधू महंतदेखील आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरून आक्रमक झाले आहेत. गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी पूजे वेळी बिसलेरी पाण्याने आचमन का केले असा सवाल महंतांनी केला. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी गोदावरीची पूजा केली होती.
-
ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद
ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात 24 तासासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गेल्या आठवडाभरापासून ठाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने सोमवार रात्री 12 पासून ते मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहील.
-
डोंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणी मोठी बातमी
इमारतींसाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या भूमाफियांचा शोध सुरू आहे. महसूल आणि आर्थिक गुन्हे शाखा ( EOW) पोलीस विभाग संयुक्त तपास करत लवकरच याप्रकरणी दोन प्रमुख भूमाफिया आणि एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
-
शेतकरी नेते रविकांत तुपकर कालपासून भूमिगत
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत उद्या होणाऱ्या आंदोलनाला आज बुलढाणा येथून निघणार होते. मात्र त्यापूर्वीच तुपकर यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर तुपकर सध्या भूमिगत आहेत.
-
नागपुरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, 50 जण ताब्यात
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला काल हिंसक वळण लागलं. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून आंदोलन झाल्यानंतर दोन गटांमध्ये संघर्ष उडाल्यामुळे नागपूरमध्ये सोमवारी तणाव निर्माण झाला. दोन्ही गटातील युवकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस जखमी झाले असून हुल्लडबाजांनी रस्त्यावर जाळपोळही केली. जमावाला नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारी नागपुरात मोर्चा निघाला होता. रात्री आठ वाजताच्या सुमारास महाल चौकात मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत असून नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आपण सातत्याने पोलिसांच्या संपर्कात आहे. नागपूर हे शांतताप्रिय शहर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असंही फडणवीस म्हणाले. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
Published On - Mar 18,2025 8:26 AM





