Maharashtra Breaking News LIVE 17 March 2025 : सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडेवर घणाघाती टीका, काय म्हणाल्या?
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 17 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडेवर घणाघाती टीका, काय म्हणाल्या?
बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणारा पुरुष नाही, अशा शब्दादत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेवर घणाघाती टीका केली आहे. तसेच पुढच्या 6 महिन्यांत आणखी एका मंत्र्याची विकेट जाणार, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
प्रदूषण रोखण्यासाठी सरकार टास्क फोर्स स्थापन करणार : पंकजा मुंडे
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सरकार टास्क फोर्स स्थापन करणार असल्याचं पर्यावरण मंत्र्यांनी जाहीर केलंय. तसेच पर्यावरण विभाग केवळ आता नोटीसा देणार नाही, असा इशाराही यावेळेस पंकजा मुंडे यांनी दिला.
-
-
डोंबिवलीत शिवसेना-भाजप बॅनरबाजीवरून महायुतीत नाराजीचे सूर?
डोंबिवलीत शिवसेना-भाजप बॅनरबाजीवरून महायुतीत नाराजीचे सूर आहेत का, अशी चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे. महायुतीच्या बॅनरवर सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो असताना, शिवसेनेच्या बॅनरवर फक्त एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचेच फोटो झळकत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या बॅनरबाजीवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळले असून कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.
-
राज्य कॅबिनेटच्या बैठकीत औरंगजेबाच्या थडग्याचा मुद्दा अग्रस्थानी
राज्य कॅबिनेटच्या बैठकीत औरंगजेबाच्या थडग्याचा मुद्दा अग्रस्थानी असल्याचं समोर आलं आहे. लोकभावनेनं जर बाबरी पाडली जाऊ शकते तर औरंगजेबचं थडगं का हटवलं जाऊ नये? असा प्रश्न काही मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व महायुतीचे नेते औरंगजेबाच्या मुद्द्यावर आक्रमक होणार असल्याचं समजत आहे. तसेच उद्या सरकारमधील आमदार या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडणार असल्याचं समजत आहे. तिन्ही प्रमुख नेत्यांकडून आमदारांना आक्रमक भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आल्याचं समजत आहे.
-
हे बजेट विकसित मध्यप्रदेशासाठी समृद्धीचे दरवाजे उघडेल: मुख्यमंत्री मोहन
भोपाळमध्ये मध्य प्रदेश अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, विधानसभेतील विरोधी पक्षनेते उमंग सिंघर आणि विधानसभा अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. बैठकीनंतर मुख्यमंत्री मोहन म्हणाले, “४ लाख २१ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा आजपर्यंतचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. ज्यामध्ये सर्व विभागांसाठी पुरेसा निधी ठेवण्यात आला आहे. यामुळे विकसित मध्य प्रदेशासाठी समृद्धीचे दरवाजे उघडतील.
-
-
मणिपूर हिंसाचार: न्यायमूर्ती गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा कार्यकाळ वाढवला
मणिपूर हिंसाचार प्रकरणात न्यायमूर्ती गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या आठवड्यापर्यंत आपला कार्यकाळ वाढवला आहे. मणिपूर हिंसाचाराशी संबंधित हस्तांतरण प्रकरणाची सुनावणी गुवाहाटीमध्ये सुरू राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
-
दिल्लीचे खासदार आज संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेणार
दिल्लीचे सर्व खासदार आज संध्याकाळी ६ वाजता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना त्यांच्या कार्यालयात भेटतील.
-
-
भारत टॅरिफ वादाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे: गॅबार्ड
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकेच्या टॅरिफ व्यवस्थेबद्दल सांगितले की, “मी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांकडून ऐकले आहे की आमचे आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी येथे अधिक शक्यता पाहण्याची संधी आहे. जेव्हा आपण दरांकडे पाहतो तेव्हा मला आनंद होतो की ते त्याकडे केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून नव्हे तर सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत.”
-
पुण्यातील खडकवासला धरणाजवळ बर्निंग बसचा थरार
पुण्यातील खडकवासला धरणाजवळ बर्निंग बसचा थरार झाला. स्वारगेट – खानापूर पीएमपीएल बसने खडकवासला धरणाजवळ अचानक पेट घेतली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.
-
तृप्ती देसाई मसाज मस्साजोग येथे दाखल
तृप्ती देसाई मसाज मस्साजोग येथे दाखल झाल्या आहेत. त्या धनंजय देशमुख व कुटुंबियांची घेणार भेट घेणार आहेत. फरार आरोपी कृष्णा आंधळे व घटनेच्या अनुषंगाने त्या चर्चा करणार आहेत.
-
तृप्ती देसाईने पोलिसांना दिले पुरावे
तृप्ती देसाईने वाल्मीक कराड याच्या जवळच्या असलेल्या 26 पोलिसांचे दिले पुरावे दिले. त्यासाठी त्यांनी बीडच्या अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडरकर यांची भेट घेतली. लेखी व पेन ड्राइव्हच्या माध्यमातून हे पुरावे दिले.
-
चिपळूण येथे गोडाऊनला मोठी आग
चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलच्या बाजूच्या गोडाऊनला मोठी आग लागल्याचे वृत्त असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत आहेत.
-
विरार ते डहाणू रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण 2027 पर्यंत
पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
-
पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत! नागरिकांच्या घरात घुसखोरी
पुण्याच्या रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या या कोयता गँगने आता नागरिकांच्या घरातच घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे आरोप होत आहेत. दत्तनगर परिसरातील काही रहिवाशांनी सांगितले की, काही समाजकंटकांनी कोयत्याच्या धाकावर त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देण्यात आल्या. अशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी तत्काळ दत्तनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले मात्र, पोलिसांनी दुपारी अकरा नंतर या असे सांगितले.
-
संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढण्यासाठी बजरंग दल आक्रमक, राज्यभर आंदोलन
संभाजीनगर मध्ये असलेली औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीसाठी आज राज्यभर बजरंग दलाने ठिकठिकाणी आंदोलन केले आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील बजरंग दलाने आंदोलन केले असून औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे..
-
पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या वर लोखंडी रॉडने हल्ला
पेट्रोल देण्यास नकार देताच एका तरुणास तिघांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केल्याची घटना माजलगाव शहरात घडली होती. या प्रकरणात कृष्णा कांबळे, अरबाज पठाण व अर्जुन गरड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली होती. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
-
औरंगजेबाची कबर नष्ट करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात आंदोलन
पुणे- औरंगजेबाची कबर नष्ट करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात येणार आहे.
-
केवळ हे मंदिर नाही, ही सुंदर तटबंदी आहे- फडणवीस
“केवळ हे मंदिर नाहीय. ही सुंदर तटबंदी आहे. अतिशय चांगला बुरुज त्या ठिकाणी आहे. दर्शनी प्रवेशाचा मार्ग आहे. बगिच्याची जागा आहे. शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग त्या ठिकाणी पहायला मिळतात” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
खात्याला निधी मिळाला नाही म्हणून शिवसेनेचे काही मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार
खात्याला निधी मिळाला नाही म्हणून शिवसेनेचे काही मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहेत. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. खात्याला निधी नसेल तर काम कसं करणार, असा सवाल त्यांनी केला होता. खात्याचा निधी वळवताना मंत्र्यांना विचारले देखील जात नसल्याची तक्रार त्यांनी केली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहेत.
-
हे राष्ट्रमंदीर आहे, त्यामुळे सर्वांना यातून प्रेरणा मिळेल- फडणवीस
“इथे केवळ मंदिर नाही तर तटबंदी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व प्रसंग इथे आहेत, आई तुळजाभवानी देखील आहेत, आई जिजामाता देखील आहे, हे राष्ट्रमंदीर आहे, त्यामुळे सर्वांना यातून प्रेरणा मिळेल,” असं फडणवीस म्हणाले.
-
महाराजांनी देश, देव, धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत- फडणवीस
“महाराजांचं मंदिर याकरता, कारण आज आपण आपल्या मंदिरात जाऊन ईष्ट देवतेची साधना करु शकतो. याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देश, देव, धर्माची लढाई जिंकली, म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. आपल्या देवतेचं दर्शन करु शकतो,” असं फडणवीस मंदिर उद्घाटनाच्या वेळी बोलले.
-
भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच उद्घाटन
शिवजयंतीच्या मुहूर्तावर भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
-
सतीश ऊर्फ खोक्या भोसलेचं आजपासून पोलीस कोठडीत अन्नत्याग आंदोलन
सतीश ऊर्फ खोक्या भोसलेचं आजपासून पोलीस कोठडीत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. पोस्को, ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे. घर जाळणाऱ्या आरोपींना अटक करून न्याय देण्याची मागणी होत आहे. न्याय मिळेपर्यंत सतीश ऊर्फ खोक्या भोसले अन्नत्याग आंदोलनावर ठाम राहणार आहे. वकील अंकुश कांबळे यांच्यामार्फत खोक्या भोसलेनं शिरूर कासार पोलिसांना निवेदन दिलं आहे. खोक्या भोसलेची 20 मार्चला पोलीस कोठडी संपणार आहे.
-
कांदा बाजार भावात घसरण सुरूच…
कांदा बाजार भावात घसरण सुरूच आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या सरासरी बाजारभाव प्रती क्विंटल मागे दोनशे रुपयांची घसरण झाली असून कांद्याचे सरासरी बाजार भाव बाराशे रुपयांपर्यंत कोसळले. या मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झालं आहे. तीनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल मागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तोट्यात विक्री करण्याची वेळ आली आहे.
-
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर. विधानपरिषेदसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
-
जय शिवराय नाही अल्लाह अकबर बोला… नितेश राणेंनी डिवचलं
फोन आल्यावर जय शिवराय बोला या भूमिकेवरुन नितेश राणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं.
फोन उचलल्यानंतर अल्लाहु अकबर म्हणा…मंत्री नितेश राणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलं. यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी फोन उचलल्यावर जय शिवराज बोलू नये, राँग नंबर म्हणून फोन ठेवायला लागेल अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना नितेश राणेंनी सुनावले
-
शेतकऱ्यांनी राहुरी – नेवासा रस्ता अडवला, माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन
शेतकऱ्यांनी राहुरी – नेवासा रस्ता अडवला. माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. आरडगाव येथील सौर कृषि वाहिनी प्रकल्प तातडीने सुरू करण्याची मागणी आहे. सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण होऊनही राजकीय हस्तक्षेपामुळे कार्यान्वित केला जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
-
आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार – संजय राऊत
7 ते 8 मंत्र्यांनी राज्याचं वातावरण खराब केलंय, आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार. त्यासाठी भाजपाचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवत आहेत – संजय राऊत
-
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाचा आज चौथा दिवस
नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनाचे पहिले तीन दिवस नॅशनल एजुकेशन पॉलिसी (NEP) आणि ट्राय-लैंग्वेज मुद्यावरून DMK सह विरोधी पक्ष आक्रमकहोते
गुजरातमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अदानी समूहाच्या रिन्युएबल एनर्जी ऊर्जा प्रकल्पाच्या मंजुरीवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकारच हे पाऊल धोकादायक आहे असा आरोप काँग्रेसने केला होता. याच मुद्द्यावर आज संसदेत गोंधळ होण्याची शक्यता आहे.
-
शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांकडून दुर्गप्रेमीवर हल्ला, वनविभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना
शिवनेरी किल्ल्यावर सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी दुर्गप्रेमीवर हल्ला केला आहे. शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना मधमाशांचा हल्ला झाला. या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. १५ ते २० जणांवर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
गेल्यावर्षीच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढला, फेब्रुवारीत ९५४ बालिकांचा जन्म
नाशिकमध्ये गतवर्षीच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढला आहे. जानेवारीत हजार मुलांमागे ९६३, फेब्रुवारीत ९५४ बालिकांचा जन्म झाला. दर हजार मुलांमागे ८८७ पर्यंत खाली घसरलेला मुलींचा जन्मदर वाढू लागला आहे. गेल्या 2024 मध्ये शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये १२ हजार २४२ मुल जन्माला आले होते. तर केवळ १० हजार ८६३ मुलींचा जन्म झाला होता. तर सप्टेंबर महिन्यात मुलींचा जन्मदर हा सर्वात निचांकी पातळीवर म्हणजे ८१७ इतका होता.
-
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकासाठी शिवसेनेकडून नावाची घोषणा
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकासाठी शिवसेनेकडून अखेर एका नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेना शिंदे गटाने संधी दिली आहे. आज विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत भाजपकडून 3 तर शिंदे गटाकडून 1 नाव घोषित करण्यात आले आहे.
-
Maharashtra News: किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती उत्सव
किल्ले शिवनेरी वर आज फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शिवजयंती उत्सव साजरा होतोय. या वेळी शिवाई मातेस अभिषेक संपन्न झाला असून जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त दाखल झाले असून या ठिकाणाहून अनेक शिवभक्त ज्योत घेऊन जात आहे. तारखेनुसार शिवजयंतीसोबत तिथीनुसार ही शिवजयंती साजरी होत आहे…
-
Maharashtra News: कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शिवजयंती चित्ररथावर पोलिसांची आक्षेपार्हतेची कारवाई
रामबाग शाखेच्या चित्ररथावर सामाजिक, जातीय तेढ निर्माण होण्याचा आरोप… शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना महात्मा फुले पोलीस ठाण्याची प्रतिबंधात्मक नोटीस… विजय ऊर्फ बंड्या साळवी यांच्या संकल्पनेतून गद्दारी आणि संभाजी महाराजांचा इतिहास दर्शवणारा देखावा… संभाजी महाराजांनी औरंगजेबाला धडा शिकवतानाचा देखावा साकारला… शांतता कायम राखण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप, चित्ररथावर चर्चा सुरू
-
Maharashtra News: खंडणी न दिल्यामुळे अमरावतीत हॉटेल व्यावसायिकावर हल्ला….
हॉटेल व्यवसायिकावर हल्ला करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद… अमरावतीच्या राजकमल चौकातील जय अंबे हॉटेलचे मालक सुमित तरडे यांच्यावर हल्ला… पियुष धोटे व गोलू धोटे या युवकांनी मागितली होती व्यावसायिकास खंडणी… एक महिन्यापूर्वी याच व्यावसायिकाला आरोपींनी खंडणी मागितल्याचा आरोप…
-
Maharashtra News: पुण्यात तापमानात किरकोळ घट, उकाडामात्र कायम
शहरासह जिल्ह्यात 40 पार कमाल तापमान गेल्या 24 तासात एक अंशाने घट झाली आहे… त्यामुळे कोरेगाव पार्क परिसरात 40.5 असलेले तापमान 39.7° पर्यंत खाली आले आहे. तर बहुतांश भागातील कमाल तापमान 39 अंशांच्या पुढे नोंदवले आहे…
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीचे आणि अत्यंत महत्त्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे आहे. म्हणून सोमवारी 17 मार्च रोजी रात्री 12 पासून ते मंगळ 18 मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण 24 तासासाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहील…. ठाणे जिल्ह्याच्या कमाल तापमान 38 ते 40° वर पोहोचले असून लहानग्यांसह ज्येष्ठांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे उष्णताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने सिव्हिल रुग्णालयात 25 घाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष सर्व यंत्रणांनी सज्ज ठेवण्यात आलं आहे…. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड पियुष गणेश भरम यास एमपीडीए कायदा अंतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. यासह देश-विदेश, राज्यातील, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील सर्व महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा….
Published On - Mar 17,2025 8:03 AM





