Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 25 March 2025 : 60 टक्के अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकाचे नदीत उतरुन आंदोलन

| Updated on: Mar 25, 2025 | 7:03 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 25 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 25 March 2025 : 60 टक्के अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकाचे नदीत उतरुन आंदोलन
फाईल फोटो

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Mar 2025 07:00 PM (IST)

    विक्रोळी परिसरातील अनधिकृत भोंगे आणि मशिदींवर कारवाई करा, किरीट सोमय्या यांची मागणी

    विक्रोळी परिसरातील अनधिकृत भोंगे आणि मशिदींवर कारवाईची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी आज विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्याला देखील भेट दिली. यावेळी त्यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे.

  • 25 Mar 2025 05:46 PM (IST)

    संसदेत छावा चित्रपटाचे होणारे स्क्रीनिंग लांबणीवर

    छावा चित्रपटाच स्क्रीनिंग लांबणीवर – सूत्रांची माहिती

    संसदेत छावा चित्रपटाचे होणारे स्क्रीनिंग लांबणीवर

    येत्या गुरुवारी होणार होते स्क्रीनिंग

    मात्र आता ते लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती

  • 25 Mar 2025 03:51 PM (IST)

    60 टक्के अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचे नदीत उतरुन आंदोलन

    गोंदियात 60 टक्के अनुदान न मिळाल्याने शिक्षकांनी नदीच्या पाण्यात जाऊन आंदोलन केले आहे. शासनाने घोषणा करूनही अद्यापही अनुदान प्राप्त न झाल्याने शिक्षक संतप्त झाले आहेत.

  • 25 Mar 2025 03:41 PM (IST)

    पुण्यात जिल्हा परिषदे समोर नोटा फेकत आंदोलन

    पुण्यात जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्या विरोधात अनिल शिरसाट यांनी जिल्हा परिषदे समोर नोटा फेकत आंदोलन केले आहे.

  • 25 Mar 2025 03:28 PM (IST)

    ईद निमित्त गरीब मुस्लीमांना पीएम मोदींचा शिधा भेट

    ईद निमित्त देशभरातील मुस्लिम बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष भेट देणार आहेत. 32 लाख गरीब मुस्लिमांना तांदूळ,डाळ, पीठ, साखर, तेल, शेवया, खजूर, सुका मेवा भेट दिला आहे.

  • 25 Mar 2025 02:44 PM (IST)

    प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टाबाहेर शिवप्रेमी आक्रमक

    प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी म्हणजे 28 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोरटकरच्या अंगावर शिवप्रेमी धावून गेले. पोलिसांनी दुसऱ्या दारातून कोरटकरला गाडीत बसवलं कोल्हापूर कोर्टाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राजारामपूरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तसेच शिवप्रेमींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 25 Mar 2025 02:33 PM (IST)

    दिशा सालियानप्रकरणात आदित्य ठाकरे आरोपी; अॅड, निलेश ओझा यांचे स्पष्ट वक्तव्य

    दिशा सालियानप्रकरणात अॅड, निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात आदित्य ठाकरे आरोपी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. निलेश ओझा म्हणाले की, “आदित्य ठाकरे खोटे बोलत आहे. आदित्य ठाकरेंचे गुन्हे लपवण्यासाठी ठाकरेंनी पदाचा वापर केला आहे. दिशा सालियानप्रकरणात उद्धव ठाकरेही आरोपी आहे. आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत. आदित्य ठाकरेचा ड्रग्स व्यापारात सहभाग आहे. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्यक्षदर्शीचे नाव सांगत नाही” असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत.  तसेच दिशाचे वडील सतीश सालियान यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. परमबीर सिंग, सचिन वाझेलाही आरोपी करण्याची मागणी केली आहे.

  • 25 Mar 2025 02:13 PM (IST)

    जयकुमार गोरे प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे उत्तर देणार

    जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरातच्या संपर्कात होते. असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे संध्याकाळी उत्तर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “फडणवीस यांनी मला नेता बनवल्याबद्दल मी त्यांची आभार मानतो. त्यांनी माझं नाव घेतलं, मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे.संसदेच्या सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर आज संध्याकाळी दिल्लीत मी प्रतिक्रिया देईन” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

  • 25 Mar 2025 02:00 PM (IST)

    ‘जयकुमार गोरेंविरोधात कट रचण्यात आला होता’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

    जयकुमार गोरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ‘जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या पक्षाचा हात होता. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरातच्या संपर्कात होते’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गोरेंचे प्रतिस्पर्धी प्रभाकर देशमुख यांच्यावरही आरोप केला आहे.

  • 25 Mar 2025 01:27 PM (IST)

    शिवप्रेमी आक्रमक! कोरटकरला कोर्टाबाहेर चप्पल दाखवण्याचा प्रयत्न

    कोरटकर प्रकरणावर कोल्हापूर कोर्टात सुनावणी सुरु होती. सुनावणी झाल्यानंतर त्याला कोर्टातून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. एका शिवप्रेमीकडून कोरटकरला चप्पल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चप्पल दाखवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • 25 Mar 2025 01:08 PM (IST)

    कोरटकर प्रकरणी युक्तीवाद संपला, पोलिस कोठवडीच्या मागणीवर लवकरच सुनावणी

    कोरटकर प्रकरणी कोल्हापूर कोर्टातील युक्तीवाद संपला आहे. त्यानंतर कोरटकरांना कोर्टाबाहेर आणण्यात आले आहे. त्यांच्या पोलिस कोठवडीच्या मागणीवर लवकरच सुनावणी होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी, आम्ही केलेली कारवाई योग्य आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 25 Mar 2025 12:50 PM (IST)

    रायगडावरील वाघ्या कुत्र्याच शिल्प हटवून देणार नाही – लक्ष्मण हाके

    “आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, कोर्टात जाऊ पण रायगडावरील वाघ्या कुत्र्याच शिल्प हटवून देणार नाही. पुरातत्व खात्यालाच याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे” असं लक्ष्मण हाके म्हणाले.

  • 25 Mar 2025 12:48 PM (IST)

    किरेन रिजिजू यांच्याविरोधात काँग्रेसकडून हक्कभंग

    संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याविरोधात काँग्रेसकडून आज हक्कभंग. डी के शिवकुमार यांच्या संदर्भाने दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचा किरेन रिजिजू यांच्यावर काँग्रेसचा आरोप.

  • 25 Mar 2025 12:47 PM (IST)

    प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं

    प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले. कोरटकरने डाटा डिलीट केला, त्याचा तपास करायचा आहे, असं पोलिसांनी कोर्टात युक्तीवाद करताना सांगितलं.

  • 25 Mar 2025 11:55 AM (IST)

    Maharashtra News: बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात निलंबित

    बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात निलंबित… कोविड काळात अनियमितता केल्याचा ठपका… आमदार नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधी नंतर कारवाई.. कोविड काळातील कामांची होणार चौकशी…

  • 25 Mar 2025 11:46 AM (IST)

    Maharashtra News: अल्पवयीन मुलाला गार्डनमध्ये खेळण्यावरून वाद झाल्याने बेदम मारहाण

    नाशिक येथील पंचवटीतील श्रीकृष्ण नगर याठिकाणी एका अल्पवयीन मुलाला गार्डनमध्ये खेळण्यावरून वाद झाल्याने बेदम मारहाण… मुलगा नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल… या प्रकरणी मुलाच्या मुलाच्या वडिलांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये केला गुन्हा दाखल…. नाशकातील गार्डनमध्ये सिक्युरिटी गार्ड नसल्यामुळे शहरातील गार्डन देखील धोक्यात…

  • 25 Mar 2025 11:27 AM (IST)

    Maharashtra News: न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी जळालेल्या नोटा सापडल्याच प्रकरण

    संबंधित प्रकरणी आज संध्याकाळी साडेचार वाजता महत्त्वपूर्ण बैठक… राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक… न्यायाधीश वर्मा यांच्या विरोधात राज्यसभेतील सर्व पक्ष खासदार मत मांडणार

  • 25 Mar 2025 11:10 AM (IST)

    Maharashtra News: धारावी अग्नितांडवा प्रकरणी गुन्हा दाखल

    पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतला असून ,त्यांच्या कडून सखोल चौकशी केली. या प्रकरणात एलपीजी सिलेंडर वाहणाऱ्या ट्रक चालकासहसह त्याच्या सप्लायर विरोधात गुन्हा दाखल.. ज्वलनशील पदार्थ असलेला ट्रक डबल पार्किंगमध्ये पार्क केल्या प्रकरणी गुन्हा दाखल… त्याच ठिकाणी डबल पार्किंग करणाऱ्या इतर ट्रक आणि टेम्पो चालकांवर देखील गुन्हा दाखल… तसेच डबल पार्किंग करवून त्यासाठी पैसे स्वीकारणाऱ्या दोघांविरोधात देखील गुन्हा दाखल… लवकरच काही लोकांना अटक होण्याची शक्यता…

  • 25 Mar 2025 10:59 AM (IST)

    खोक्याला पोलिसांकडून शाही बडदास्त

    बीड कारागृहाबाहेरचा कालचा व्हिडिओ समोर आला. कारागृहाबाहेर खोक्या बिनधास्त मोबाईलवर बोलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे, त्याच्यासाठी खास बिर्याणीचा डब्बा आणण्यात आल्याचेही दिसत आहे.

  • 25 Mar 2025 10:50 AM (IST)

    अमरावती शहरात चोरटे सीसीटीव्हीत कैद

    अमरावती शहरातील संकेत कॉलनी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. काही दिवसागोदर 2 घरफोड्या झाल्या. 25 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास तोंडाला बांधून रस्त्यावरून चोरटे फिरताना CCTV मध्ये कैद झाले.

  • 25 Mar 2025 10:40 AM (IST)

    भात खरेदी केंद्राला आग

    डहाणू तालुक्यातील घोळ येथील आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्राच्या गोदामाला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली, आगीचे कारण समोर आलं नसलं तरी गोदामाचा मागच्या बाजूने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गोदामात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेले साधारण 3 हजार 640 क्विंटल म्हणजेच 75 ते 80 लाख रुपयाचे धान्य असल्याची माहिती देण्यात येत असून यातील 25 टक्के धान्य जाळून खाक झाले आहे.

  • 25 Mar 2025 10:30 AM (IST)

    खासगीकरणाविरोधात उद्धव सेनेचे आंदोलन

    बोरिवलीतील हरिलाल भगवती रुग्णालयाच्या खाजगीकरणाविरोधात शिवसेना उद्धव सेनेने आंदोलन केले. मुंबईच्या बोरिवली येथे हरीलाल भगवती हॉस्पिटलचा खाजगीकरण केल्याबद्दल UBT शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.

  • 25 Mar 2025 10:20 AM (IST)

    युवराजामुळे युती तुटली?

    यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. पण त्यावेळी युवराज यांनी घोषणा केली की 151 जागा लढणार आणि त्यामध्ये एकही सीट कमी होणार नाही. उद्धव सेना कौरवांच्या मूडमध्ये आली होती. पाच गाव सुद्धा देणार नाहीत, असे ते म्हणत होते. आम्ही म्हटलं ठीक आहे, पाच गाव नाही देणार तर श्रीकृष्ण आमच्या सोबत होते. लढाई झाली, असे फडणवीस म्हणाले.

  • 25 Mar 2025 10:11 AM (IST)

    राज्यातील दोन पक्षांच्या चिन्हाबाबतची सुनावणी टळणार?

    सुप्रीम कोर्टात आज सुनावणीची शक्यता खूपच कमी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष चिन्ह आणि नावांबाबत दाखल याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता होती.

  • 25 Mar 2025 10:00 AM (IST)

    परतूरमध्ये जुन्या गोडाऊनला भीषण आग

    जालन्यातील परतूर तहसील कार्यालयाच्या जुन्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडलीय.. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून गोडाऊन मध्ये ठेवलेलं जुनं फर्निचर, कागदपत्र आणि इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले असून, या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलय.दरम्यान तहसील कार्यालयाच्या जुन्या गोडाऊनला अचानक आग लागण्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

  • 25 Mar 2025 09:58 AM (IST)

    कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरची चौकशी पूर्ण

    कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरची चौकशी पूर्ण, जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील एका खोलीत करण्यात आली चौकशी.  पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकाऱ्यांचे मोबाईलही यावेळी काढून घेण्यात आले होते.

  • 25 Mar 2025 09:36 AM (IST)

    धारावी सिलिंडर स्फोट प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल

    धारावी सिलिंडर स्फोट प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.  सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 25 Mar 2025 09:25 AM (IST)

    अमरावती शहरातील संकेत कॉलनी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

    अमरावती शहरातील संकेत कॉलनी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे.  काही दिवसाअगोदर 2 घरफोड्या झाल्या तर 25 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास तोंडाला बांधून रस्त्यावरून चोरटे फिरताना CCTV मध्ये कैद झाले.  नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • 25 Mar 2025 09:13 AM (IST)

    मिरा भाईंदर मनपाकडून तरुणांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार

    मिरा भाईंदर मनपाकडून तरुणांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.  मिरा भाईंदर महानगरपालिका शहरातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनात्मक पावले उचलत आहे.  या उपक्रमामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, कौशल्य विकासामुळे त्यांचे करिअर बळकट होणार आहे.

  • 25 Mar 2025 08:55 AM (IST)

    पुणे- जिल्हा परिषदेची मुलं पाहणार नासा आणि इस्त्रो

    पुणे- जिल्हा परिषदेच्या मुलांना नासा आणि इस्त्रो पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी निवड परीक्षा घेण्यात येणार आहे. इस्त्रोसाठी 50 तर नासासाठी 25 विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची अमेरिकेतील नासा आणि इस्त्रोला भेट देण्यासाठी निवड परीक्षा घेण्यात येणार आहे.

    विज्ञान, गणित आणि कौशल्य विकास या विषयांवर आधारित ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेची निवड प्रश्नपत्रिका आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक केंद्र वतीने तयार करण्यात येणार आहे. साधारण 15 एप्रिलपर्यंत ही परीक्षा होणार आहे.

  • 25 Mar 2025 08:43 AM (IST)

    पुणे- शहरातील तब्बल 10 हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडीत

    पुणे- शहरातील तब्बल 10 हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडीत करण्यात आली. पुणे शहरात 40 कोटी 9 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 24 दिवसांमध्ये दहा हजार 177 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.

  • 25 Mar 2025 08:37 AM (IST)

    पुणे पोलीस आज करणार साडेसात कोटी रुपयांच्या ड्रग्सची होळी

    पुणे पोलीस आज साडेसात कोटी रुपयांच्या ड्रग्सची होळी करणार आहे. पुणे पोलिसांकडून मागील वर्षात पकडलेल्या साडेसात कोटी रुपयांच्या ड्रग्सची आज होळी करण्यात येणार आहे. मात्र यामध्ये कुरकुंभ ड्रग्स प्रकरणात पकडण्यात आलेले 3674 कोटींच्या ड्रग्सचा समावेश नसणार आहे. ती प्रक्रिया एप्रिल महिन्यात पार पाडली जाणार आहे.

  • 25 Mar 2025 08:33 AM (IST)

    प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर कोर्टात हजर केलं जाणार

    प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर कोर्टात हजर केलं जाणार आहे. महिनाभरानंतर प्रशांत कोरटकरला काल अटक करण्यात आली. प्रशांत कोरटकर 25 फेब्रुवारीपासून फरार होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बेड्या घालण्यात आल्या.

  • 25 Mar 2025 08:31 AM (IST)

    कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स

    कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स बजावण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स पाठवण्यात आलं आहे. कामराच्या खारमधील घरी समन्सची एक कॉपी देण्यात आली आहे. कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर असल्याने व्हॉट्सअपद्वारे समन्स पाठवण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक झाली आहे. कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळला होता. इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांतत कोरटकर 25 फेब्रुवारीपासून फरार होता. नागपुरातून फरार झालेला कोरटकर आधी चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. कोल्हापूर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. अखेर आता महिनाभरानंतर त्याला तेलंगणातून अटक केली आहे. तर दुसरीकडे कॉमेडियन कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक कवितेमुळे राज्यात नवा वाद उद्भवला आहे. या कवितेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी राहुल कनाल यांच्यासह 12 जणांना अटक केली. या सगळ्यांची सोमवारी संध्याकाळी जामिनावर सुटका करण्यात आली. शिवसैनिकांच्या तक्रारीनंतर कामरावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…

Published On - Mar 25,2025 8:28 AM

Follow us
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.