Maharashtra Political News live : अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तांवर बालविवाह रोखण्यासाठी पोलीस पथकं नियुक्त करा, सुशीबेन शाह यांची मागणी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 9 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
नागपूर जिल्ह्यात चौथ्यांदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. जिल्ह्यातील कामठी परिसरात 2.4 तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले. पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि शिरुर मतदार संघातील उमेदवार अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव यांना नोटिसा निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक खर्चात दुसऱ्या फेरीत तफावत असल्याचे या नोटिसा दिल्या आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीने महिलेच्या मृत्यूप्रकरणी नागपूर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता यांच्यासह अकरा डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 15 कोटी रुपयांचं कोकेन जप्त
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १५ कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं आहे. डीआरआयकडून याबाबतची कारवाई करण्यात आली आहे. कोट डायव्हरी (Cote D’ivore) देशाच्या नागरिकाने कोकेन कॅप्सुलच सेवन केलं होतं. कोकेनने भरलेल्या ७७ कॅप्सुल जप्त करण्यात आल्या आहेत. प्रवशाकडून एकूण १ कीलो ४६८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं आङे. गोपनीय माहितीच्या आधारावर डीआरआयने ही कारवाई केली आहे.
-
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठवत मागणी
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा उत्साह राज्यात पाहायला मिळत आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तांवर बालविवाह लावण्याची अनिष्ट प्रथा आहे. विशेष म्हणजे २१ व्या शतकातली ही प्रथा पाळली जाते. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, पुसद आणि महागाव या भागांसोबतच बीड जिल्ह्यातही अशा प्रकारचे बालविवाह लावण्याची प्रथा पाळली जाते. या प्रथेवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने राज्यात पोलीस पथके नियुक्त करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बालविवाह आयोजित करणे आणि तो घडवून आणणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच बालविवाह रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच, अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करतात. परंतु, पोलिसांनी ही सतर्क राहून बालविवाह घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी केली.
तरीही बालविवाहासारखी अनिष्ट प्रथा रोखून पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह बंद करण्यासाठी पोलिसांचे सहाय्य आवश्यक आहे. तरी, मी आपणांस विनंती करते की, अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी आणि या अनिष्ट प्रथेची पाठराखण करणाऱ्या दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्यासाठी यवतमाळ, बीड या जिल्ह्यांसह राज्यभरात भरारी पथकं नेमण्यात यावी, अशी माहिती ॲड. सुशीबेन शाह यांनी पत्रात नमुद केली आहे.
याबाबत, ॲड. सुशीबेन शाह यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी फोनवरही संभाषण साधलं. त्यावेळी आपण यावर योग्यती कारवाई करू, असे आश्वासन रश्मी शुक्ला यांनी दिल्याचंही ॲड. सुशीबेन शाह यांनी स्पष्ट केलं.
-
-
उद्धव ठाकरे यांची 16 मे ला ठाण्यात सभा होणार
ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आणि पाचव्या टप्यातील प्रचार संपताना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात सभेचे नियोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे ठाण्यात येऊन काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून राजन विचारे तर महायुतीकडून नरेश म्हस्के मैदानात आहेत. दोन्ही गटाकडून ठाण्यात जोरदार प्रचार सुरु असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई दौरा केला असून मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी देखील नवी मुंबई दौरा केला होता.
-
दिल्लीत मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांचे स्वागत
दिल्लीत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांचे स्वागत केले.
-
हरियाणात राजकीय संकट, काँग्रेसने राज्यपालांकडे भेटण्याची वेळ मागितली
हरियाणातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे उपनेते आफताब अहमद यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे वेळ मागितली आहे. हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे फ्लोर टेस्ट व्हायला हवी, अशी काँग्रेसची मागणी आहे.
-
-
समाजवादी पक्ष आणि INDIA युतीचा विजय निश्चितः शिवपाल यादव
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल यादव यांनी इटावा येथे सांगितले की, इंडिया आघाडी भाजपचा पराभव करत आहे, भाजपचा नायनाट निश्चित आहे. चौथ्या टप्प्यातील निवडणुका होत असून, त्यातही समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीचा विजय होणार आहे. बदाऊन, जसवतनगर, मैनपुरी आदी भागात सरकारने गुंडगिरी केली आहे. लोकशाहीत हे योग्य नाही.
-
30 लाख रिक्त सरकारी पदे 15 ऑगस्टपर्यंत भरली जातील: राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून देशातील तरुणांना संदेश दिला आहे. ते म्हणाले, भारताचे सरकार 4 जून रोजी स्थापन होत आहे आणि आमची हमी आहे की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही 30 लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचे काम सुरू करू. नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा. ते म्हणाले, INDIA चं ऐका, द्वेष करू नका, नोकरी निवडा.
-
सत्यजित पाटील यांची खासदारपदी निवडी बद्दल अभिनंदन करणारे लागले बॅनर
कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील यांची खासदारपदी निवडी बद्दल अभिनंदन करणारे लागले बॅनर. हातकणंगले लोकसभेसाठी मतदान होऊन एक दिवस पूर्ण होतात लागले बॅनर. चार जूनला निकाल लागणार आहे मात्र त्याआधीच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. महाविकास आघाडीला सत्यजित पाटील सरूडकर यांच्या विजयाचा विश्वास.
-
शिवाजी पार्कवरुन ठाकरे गटाकडून रडीचा डाव – केसरकर
मुंबईत 15 तारखेला मोदी यांचा रोड शो आहे. 17 तारखेला जाहीर सभा आहे. शिवाजी पार्कवर महायुतीचीच सभा होणार. त्याच्या आम्ही सर्व परवानग्या घेऊ. मैदानासंदर्भात ठाकरे गटाकडून रडीचा डाव हा खेळला जातो. असं दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
-
सुजय विखे पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा
अहमदनगर – जामखेड : सुजय विखे पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होणार आहे.
-
कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप करत कांदा लिलाव पाडला बंद
अहमदनगरला नेप्ती कांदा मार्केटमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. व्यापारी संगमत करून शेतकऱ्यांना कांदा भाव देत नसल्याचा केला आरोप. कांद्याचा भाव हजार रुपयांनी गडगडल्याने एकच गोंधळ.
-
फडणवीसांचं ठाकरेंवर टीकास्त्र
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी कोणी केली असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांचे विचार जपले असतील तर ते एकनाथ शिंदेंनी…, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे.
-
‘त्या’ नोटीसनंतर महाविकास आघाडी आक्रमक
सुधाकर बडगुजर यांना आलेल्या तडीपारेच्या नोटीसनंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना आली पोलीस उपायुक्तांकडून तडीपारची नोटीस देण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी पोलीस आयुक्तांच्या भेटीला पोहोचलेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची घेतली महाविकास आघाडीच्या काही प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट झाली.
-
कोपरगावचे आजी माजी आमदार एकाच व्यासपीठावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं सभा होतेय. शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात सभा होतेय. मंत्री दादा भुसे, निलम गो-हे सभेला उपस्थित आहेत. कोपरगावचे आजी माजी आमदार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.
-
राज ठाकरे दोन दिवस पुण्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. महायुतीच्या उद्याच्या सभेसाठी राज ठाकरे पुण्यात आहेत. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. उद्या स्वारगेट परिसरात राज ठाकरेंची सभा होणार आहे. राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्कामी आहेत.
-
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात वाघाचे दर्शन
पारशिवनी तालुक्यातील पालोरा गावात गुरुवारी सकाळी वाघ दिसला. गावात शिरून वाघाने एका गायीची शिकारही केली. लगतच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
-
गुलाबराव पाटील यांचे मोठे विधान
संजय राऊत स्वतः तुरुंगात गेले आहेत, त्यामुळे तुरुंगात गेलेल्या माणसाला दुसऱ्या गोष्टी सुचत नाहीत- असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
-
सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला दीड महिना झालाय. ते विधान आम्हाला वेदना देणार होत. चंद्रकांत पाटील अस काय म्हणतायत याच वाईट वाटलं. शरद पवारांना संपवायचं हे शब्द होते. यावर कोणीच काही बोलल नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
-
सुहास कांदे यांचं अतिशय चुकीचं वक्तव्य- भुजबळ
आम्ही महायुतीचे काम करत आहोत. ही आमदारकीची निवडणूक असल्यासारखं काम करून कमळ निशाणी निवडून आणायच्या सूचना दिल्यात. सुहास कांदे हा आमचा विरोधक आहे हे सर्वांना माहीत. तो नेहमीच आमच्या विषयी खोटं बोलतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी दाखल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. सभेपूर्वी फडणवीस हे कोल्हे यांच्या निवसस्थानी पोहोचले आहेत. नाराज स्नेहलता कोल्हेंशी फडणवीस चर्चा करणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात मतभेद आहेत.
-
नवी दिल्ली- एअर इंडियाची अनेक विमान उड्डाणे रद्द
नवी दिल्ली- एअर इंडियाची अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कर्मचारी सुट्टीवर गेल्याने आज सकाळपासून 8 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दिल्लीमधून गोवा, श्रीनगर , गुवाहाटी, सुरतला जाणारी विमानांची उड्डाणे रद्द तर अनेक विमानांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
-
‘भारतातील बहुसंख्य हिंदूंची लोकसंख्या गेल्या 65 वर्षांत घटली’
भारतातील बहुसंख्य हिंदूंची लोकसंख्या गेल्या 65 वर्षांत घटली आहे, 1950 ते 2015 या काळात देशातील हिंदूंची लोकसंख्या सुमारे 7.82% कमी झाली आहे. त्याच वेळी या कालावधीत मुस्लिम लोकसंख्या 43.15% वाढली आहे. पंतप्रधान आर्थिक सलाहकर परिषदेनं हा अहवाल दिला आहे.
-
‘सीईटी’च्या तारखांमध्ये बदल
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने पुन्हा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. त्यानुसार सीईटी सेलने विधी 5 वर्षे, बी. ए., बी. एस्सी. बी. ए. यासह आठ अभ्यासक्रमाच्या तारखांमध्ये बदल केला आहे. तर पीजीपी-एम. एससी, एम. एमसी या सीईटी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
-
राजधानी दिल्लीतील प्रचाराची धुरा भगवंत मान यांच्या खाद्यांवर
राजधानीत लोकसभा निवडणूक जबाबदारी भगवंत मान सांभाळणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीत प्रचार करणार आहेत.11 मे रोजी मान यांचा दिल्लीत रोड शो करतील. पूर्व दिल्ली आणि दक्षिण दिल्ली मतदारसंघात ते प्रचार करतील.
-
नंदुरबारमध्ये मोदींची सभा
भाजप उमेदवार डॉ. हीना गावित यांचा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. यासभेसाठी १ लाख लोक येणार असल्याची माहिती मंत्री. डॉ. गावित यांनी दिली.
-
नाशिकमध्ये दिर भावजय वैर संपुष्टात ?
दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार या कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या भेटीला गेल्या आहेत. आमदार नितीन पवार हे भारती पवार यांचे सख्खे दिर आहेत. मात्र भारती पवार आणि नितीन पवार यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या भेटीमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे
-
गोंदियात अवकाळी पावसाचं संकट
गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला धान खराब होण्याची भीती आहे.
-
कोथरुडमध्ये दोन गट आमनेसामने
पुण्यातील कोथरुडमध्ये काल रात्री काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेसची रॅली निघाली होती. एका चौकात हातात दोन्ही पक्षाचे झेंडे हाती घेत, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केली.
-
कसबा गणपतीला 2 हजार 100 आंब्यांची आरास
सोलापुरातील मानाच्या कसबा गणपतीला 2 हजार 100 आंब्यांची आरास करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मानाचा कसबा गणपती गणेशोत्सव मंडळाने हा स्तुत्य उपक्रम केला आहे. आंब्याची आरास करण्यात आलेल्या 2100 आंब्यांचे वाटप अनाथाश्रम, बेघर लोकांना आंबे वाटप करणार आहेत.
-
विलीनीकरणाची शक्यता कमीच-अनिल देशमुख
आमचा पक्ष मोठा आहे भारतातले छोटे-मोठे पक्ष विलीन होतील असं शरद पवार याचं म्हणणं असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढते अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत आमचं स्वातंत्र्य राहणार आहे
-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि प्रकाश आंबेडकर यांचे बंधू भीमराव आंबेडकर हरियाणातून लढवणार निवडणूक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि प्रकाश आंबेडकर यांचे बंधू भीमराव आंबेडकर हे हरियाणा मधील होशियारपुर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारआहेत. ग्लोबल रिपब्लिकन पार्टी या पक्षाकडून भीमराव आंबेडकर हे 14 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
-
4 जूनपर्यंत तांडव करा मग तुम्हाला उत्तर देऊ – संजय राऊत
एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारामुळे पलायन केलंय, त्यांनी या मुद्यावरून बोलूच नये. 4 जून शिंदे तुरूंगात जातील अन्यथा तडीपार होतील. 4 जूनपर्यंत तांडव करा मग तुम्हाला उत्तर देऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
-
निकालानंतर पवार आणि ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार – आशिष देशमुख यांची टीका
निकालानंतर पवार आणि ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, भाजप नेते आशिष देशमुख यांनी टीका केली आहे. पुण्यात भजपची पाळमुळं अतिशय भक्कम आहेत, बाहेरून कितीही नेते आले तरी तिळमात्र फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.
-
Maharashtra News : हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचे चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
पुण्यातील प्रसिद्ध सीओईपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचे चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. अर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा या दोघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. आरोपी आर्या हिने हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून ती तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवत असे.
-
Maharashtra News : नागपूर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह वर्तविला अवकाळी पावसाचा अंदाज. सकाळ पासून ढगाळ वातावरण. सकाळच्या वेळी आकाशात ढग दाटून आल्याने संध्याकाळ प्रमाणे परिस्थिती. काही भागात रिमझिम पाऊस सुरू. पावसाळ्या प्रमाणे झालं आहे नागपूरच वातावरण.
-
Maharashtra News : रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदान यंत्राच्या स्ट्राँग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्राच्या स्ट्राँग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच. मतदानाच्या मतपेट्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था. सीआरपीएफची एक पलटण, राज्य राखीव दलाचे एक पथक आणि स्थानिक पोलिसांचे सुरक्षा कवच. एक अधिकारी आणि 30 सीआरपीएफचे कर्मचारी तैनात. राज्य राखीव दलाचे 30 कर्मचारी तैनात . सहा विधानसभा मतदारसंघातून मतदान झालेली evm मशीन सुरक्षा व्यवस्थेमध्ये रत्नागिरी शहरातील एमआयडीसी इथल्या FCI गोडाऊन मध्ये दाखल.
-
Maharashtra News : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत
पुण्यातील महम्मदवाडी परिसरात कोयता गँगची दहशत. कोयत्याने पान शॉपची केली तोडफोड. दुकानदारावर कोयत्याने हल्ला करण्याचा केला प्रयत्न. ऐन निवडणुकीच्या काळात कोयता गँगची दहशत.
-
Marathi News: राज ठाकरे यांनी पुण्यात सभा
महायुतीचे उमदेवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे उद्या पुण्यात सभा घेणार आहेत. नारायण राणे यांच्यानंतर पुण्यात भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेत आहेत.
-
Marathi News: राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये उष्माघाताच्या १८ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात २०२ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण नाशिक, बुलढाणा, जालना, नाशिक, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आले आढळून आले आहे.
-
Marathi News: शरद पवार आज सातारा दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर जाणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुण्यतिथीनीमित्त अभिवादन करण्यासाठी ते जाणार आहेत. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती राहणार आहेत.
-
Marathi News: अकरा डॉक्टरांवर गुन्हा दाखल
शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीने महिलेच्या मृत्यूप्रकरणी 2019 मधील प्रकरणात नागपूर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता यांच्यासह अकरा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शस्त्रक्रियानंतर मरण पावलेल्या महिलेच्या पतीने 30 जून 2020 रोजी अजनी पोलिसात तक्रार दिली होती.
Published On - May 09,2024 8:20 AM