Maharashtra Breaking News LIVE : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा भवन’चे भूमिपूजन

| Updated on: Jul 18, 2024 | 6:49 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 17 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा भवन'चे भूमिपूजन

आज आषाढी वारीच्या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आणि वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या तीरावर भक्तांचा महापूर पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्निक श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा केली. या पूजेनंतर त्यांनी राज्यातील जनता सुखी समृद्ध राहू दे, पुरेसा पाऊस होवू दे असे साकडे विठूरायाला घातले. तर दुसरीकडे राज्यातील विविध पक्षांकडून विधानसभा निवडणुकांची चाचपणी केली जात आहे. तसेच पूजा खेडकर प्रकरणी नवनवीन खुलासेही समोर येत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Jul 2024 08:00 PM (IST)

    भवनसाठी 5 कोटी मंजूर, पुढे आणखीन 10 कोटी देणार : मुख्यमंत्री

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा भवन’ चे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी यावेळेस या भवनसाठी 5 कोटी मंजूर केले. पुढे आणखीन 10 कोटी रुपये मंजूर केले जातील. विकास- कल्याणकारी योजनांद्वारे शासन सर्व घटकांसाठी काम करत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

  • 17 Jul 2024 07:35 PM (IST)

    पूजा खेडकरांच्या आरोपच्या पार्श्वभूमीवर पोलीस पुन्हा चौकशीसाठी आल्याची माहिती

    वादग्रस्त प्रोबेशनरी IAS पूजा खेडकर यांची वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी भेट घेतली आहे. मी माझ्या कामासाठी आले आहे मी बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. याआधी 2 दिवसांपूर्वी 3 महिला पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. पूजा खेडकर यांनी आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा पोलीस चौकशीसाठी आल्याची माहिती आहे.

  • 17 Jul 2024 07:06 PM (IST)

    चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील गंभीर जखमी

    गडचिरोली नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू असताना पोलिसांमध्ये आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. भामरागड तालुक्यातील जारावंडी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात ही चकमक झाली. यात काही नक्षलवादी जखमी झाल्याचीही माहिती आहे. पोलीस उपनिरीक्षक यांना हॅलिकॉप्टरने उपचारासाठी तात्काळ रवाना करण्यात आलं आहे.

  • 17 Jul 2024 06:59 PM (IST)

    पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाचे ड्रंक एन्ड ड्राईव्ह

    राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारूच्या नशेत अपघात केला. ड्रंक एन्ड ड्राईव्हच्या या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले आहेत. सौरभ गायकवाड हा देखील जखमी झाला आहे. पुण्यातील मांजरी – मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे हा अपघात झाला.

  • 17 Jul 2024 06:51 PM (IST)

    चुकीच्या गोष्टीच्या पाठी आम्ही उभे राहणार नाही – बाळासाहेब थोरात

    विशाळगड येथील घटनेचा निषेध स्वतः शाहू महाराजांनी केला आहे. कोल्हापूरचे सतेज पाटील यांनी स्वतः जाऊन तिथे निषेध केला. कधीही चुकीच्या गोष्टीच्या पाठी आम्ही उभे राहणार नाही, असे कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

  • 17 Jul 2024 06:35 PM (IST)

    दिग्विजय सिंग यांची आरएसएसवर टीका

    आरएसएसचे लोक चतुराईने लोकांच्या डोक्यात आपली विचारधारा भरतात की ज्याने त्यांच्या डोक्यात घर करून जाते. आरएसएसचा माईंड गेम आपण समजून घेतला पाहिजे. त्यानंतरच आपण त्यांच्याशी लढू शकतो. राजकारण हे पहिल्यासारखे नाही विचारानेच लढलं पाहिजे, असे प्रतिपादन दिग्विजय सिंग यांनी केले. अहमदनगर येथील श्रीरामपुरमध्ये ते बोलत होते.

  • 17 Jul 2024 06:24 PM (IST)

    मुंबईतून 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

    अंमली विरोधी पदार्थ कक्ष पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई केली. पोलिसांनी सलाउद्दीन अलाउद्दीन शेख, फजल जाफर खान या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 किलो 4 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केलेत. या अंमली पदार्थाची किंमत 2 कोटींहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • 17 Jul 2024 06:18 PM (IST)

    19 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसच्या 2 महत्वाच्या बैठका

    19 जुलै रोजी मुंबईमध्ये काँग्रेसच्या 2 महत्वाच्या बैठका होणार आहेत. यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची पहिली बैठक काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांच्यासोबत होणार आहे. तर, दुसरी बैठक वरिष्ठ नेते आणि महत्वाचे कार्यकर्ते यांच्यासोबत होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे.

  • 17 Jul 2024 06:06 PM (IST)

    अजित गव्हाणे यांचा शरद पवार गटात प्रवेश, ठाकरे गट अस्वस्थ

    पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आपल्या समर्थकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले. मात्र, त्याचे पडसाद ठाकरेच्या शिवसैनिकांमध्ये उमटले. भोसरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेतली. अजित गव्हाणे यांना विधानसभेचे तिकीट मिळाले तर तुतारीचा प्रचार करायचा का नाही? याबाबत ठाकरे गटाच्या नेत्यांची प्रदीर्घ चर्चा झाली.

  • 17 Jul 2024 03:30 PM (IST)

    वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरूण सरदेसाई निवडणूक लढणार?

    वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे झिशान सिद्दीकी विरूद्ध वरूण सरदेसाई अशी लढत होण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सरदेसाई विविध उपक्रम राबवत आहेत.

  • 17 Jul 2024 03:15 PM (IST)

    चंद्रभागा बस स्टँडचं उद्घाटन

    आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांचा मेळा पंढरपूरमध्ये जमला आहे. आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज चंद्रभागा बस स्टँडचं उद्घाटन होत आहे. चंद्रभागा यात्री निवासच पण उद्घाटन होणार आहे.

  • 17 Jul 2024 02:42 PM (IST)

    फडणवीस आणि पवारांचे हेलिकॉप्टर जमिनीवर सुखरुप उतरले

    नागपूर ते गडचिरोली प्रवासात पावसाळी ढगांमुळे राज्याचे मंत्र्‍यांचे हेलिकॅाप्ट भरकटले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार,उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार त्यात होते. पायलटने प्रसंगावधान दाखवित सुखरुपपणे हेलिकॉप्टर उतरविले.

  • 17 Jul 2024 01:54 PM (IST)

    स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवर कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

    संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटना अधिकृत पेजवरील पोस्टने चर्चेला उधान. विशाळगडावरील अतिक्रमण मुक्त मोहिमेनंतर स्वराज्य संघटनेच्या अधिकृत पेजवरून संभाजीराजेंचा हिंदूपदपातशाह असा उल्लेख

  • 17 Jul 2024 01:26 PM (IST)

    आमदार फारुक शहा यांची भूमिगत गटर योजनेची पाहणी

    गेल्या काही महिन्यांपासून संत गतीने भूमिगत गटर योजनेचा काम सुरू. देवपूरात गेल्या काही दिवसापासून दिम्या गतीने काम सुरू असल्याने आमदार फारुक्शा यांनी केली पाहणी..

  • 17 Jul 2024 01:18 PM (IST)

    जरांगे आणि हाकेंसोबत झालेली चर्चा सांगा

    जरांगे आणि हाकेंसोबत झालेली चर्चा आम्हाला अगोदर सांगा असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

  • 17 Jul 2024 01:15 PM (IST)

    मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही- शरद पवार

    नुकताच शरद पवार यांनी म्हटले आहे की, मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाहीये.

  • 17 Jul 2024 01:10 PM (IST)

    माझा मतदारांशी सुसंवाद चांगला आहे- शरद पवार

    नुकताच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी मोठे भाष्य केले असून ते म्हणाले की, माझा मतदारांशी सुसंवाद चांगला आहे.

  • 17 Jul 2024 01:06 PM (IST)

    शरद पवार यांनी मोठे भाष्य

    मला माहिती नव्हतं माझी ओळख आज जादूगार म्हणून करून दिली आहे. पत्रकार आणि वृत्तपत्र यांच्याशी ठरवून माझा कधी न कधी माझा संबध आला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

  • 17 Jul 2024 01:00 PM (IST)

     जयंत पाटील यांच्याबाबतीत आमचा एकत्रित निर्णय नव्हता – शरद पवार

    जयंत पाटील यांच्याबाबतीत आमचा एकत्रित निर्णय नव्हता, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा एकत्रित निर्णय नव्हता, आमची 12 मतं होती, त्यांचा विजय आम्हाला सोपा वाटत होता, संधी आली होती म्हणून डाव्यांचा विचार केला म्हणून शेकापला उमेदवारी दिली, मात्र टेंटर्जीमध्ये मतभिन्नता होती, आम्ही गणित ठरवलं होतं ते सर्वांना मान्य होईल असं नाही, त्यामुळे जयंत पाटलांना यश मिळालं नाही, पण मतभेद नाहीत असं शरद पवार म्हणाले.

  • 17 Jul 2024 12:49 PM (IST)

    हटानेवाले हट गए, मोदीजी तो बैठ गए.. मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना टोला

    केंद्रातलं सरकार जाणार, जाणार, मोदी हटाओ असशी ओरड अनेक दिवसांपासून विरोधकांकडून होत होती. पण,  हटानेवाले हट गए, मोदीजी तो बैठ गए.. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली .

  • 17 Jul 2024 12:41 PM (IST)

    पत्रकार आणि वृत्तपत्र यांच्याशी ठरवून माझा कधी न कधी माझा संबध आला – शरद पवार

    पत्रकार आणि वृत्तपत्र यांच्याशी ठरवून माझा कधी न कधी माझा संबध आला. सकाळ वृत्तपत्रात मी आणि माझे मित्र विठ्ठल मणियार यांनी मुलाखत दिली होती त्यानंतर आमची निवड झाली. नंतर आपणच एक वृत्तपत्र काढावे असं वाटलं नंतर मग मी आणि माझे मित्राने नेता हे वृत्तपत्र काढले, थोडे दिवस चाललं नंतर बंद पडलं. शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  • 17 Jul 2024 12:34 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का

    पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील 24 पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंचा पवार गटात प्रवेश.

  • 17 Jul 2024 12:27 PM (IST)

    माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं – शरद पवार

    माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं. आमच्या इथे कॉलेजात एक जादूगार राहत होते. त्यांची भेट घ्यायचो. काही जादू शिकता येतो का ते पाहायचो. चेष्टेचा भाग सोडून द्या. तुम्हाला भेटता आलो याचा आनंद आहे, असं शरद पवार म्हणाले. पुणे पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप सुरू आहे.

  • 17 Jul 2024 12:17 PM (IST)

    कल्याण वरून शिर्डीला पायी निघालेल्या यात्रेकरूंना भरधाव वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू

    कल्याण वरून शिर्डीला पायी निघालेल्या यात्रेकरूंना भरधाव वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  घोटी सिन्नर दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.  कवी पाटील आणि भावेश पाटील असे मृत्यू झालेल्या साई भक्तांची नावं आहेत. मंगळवारी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान अपघात घडला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

  • 17 Jul 2024 12:06 PM (IST)

    नवी दिल्ली – महायुती सरकार मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नाहीच, भाजप हायकमांडचा मोठा निर्णय

    अखेर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार नाहीच.  महायुती सरकार मध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर भाजप हायकमांडने मोठा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती .  मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक नेते इच्छुक होते , मात्र त्यांच्या आशा-अपेक्षांवर विरजण. मात्र येत्या काही दिवसात खाते बदल होण्याची शक्यता आहे.

  • 17 Jul 2024 11:55 AM (IST)

    खेडकर कुटुंबियांनी बंगल्याबाहेर असणारं अतिक्रमण स्वतःहून काढलं

    वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी खेडकर कुटुंबियांनी बंगल्याबाहेर असणारं अतिक्रमण स्वतःहून काढलं. महानगरपालिकेने नोटीस दिल्यानंतर खेडकर कुटुंबीयांच्या कामगारांनी अतिक्रमणाचा भाग काढला. पूजा खेडकर यांचा पुण्यातील बाणेर परिसरात आलिशान बंगला आहे. बंगल्याच्या बाहेर भिंतीला लागून अतिक्रमण करण्यात आलं होतं. यासंदर्भात अतिक्रमण काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने खेडकर कुटुंबीयांना नोटीस बजावून सात दिवसांची मुदत दिली होती.

  • 17 Jul 2024 11:50 AM (IST)

    अंबरनाथमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

    अंबरनाथमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीसह एकूण ६ आरोपी अटकेत आहेत. आरोपींमध्ये ४ अल्पवयीन आणि एका मुलीचाही समावेश आहे.

  • 17 Jul 2024 11:40 AM (IST)

    शरद पवार यांचा आज पुणे पत्रकार संघात वार्तालाप

    शरद पवार यांचा आज पुणे पत्रकार संघात वार्तालाप होणार आहे. सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवर शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे. दुपारी 12 वाजता शरद पवारांच्या वार्तालापाला सुरुवात होणार आहे.

  • 17 Jul 2024 11:33 AM (IST)

    अजित पवार गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का

    पिंपरी-चिंचवडमधील चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे. 24 जणांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राहुल भोसले, पंकज भालेकर, यश साने हेदेखील शरद पवार गटात गेले आहेत.

  • 17 Jul 2024 11:30 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दावा

    गोंदिया जिल्ह्यात दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन जागांची मागणी करण्यात आली होती. खासदार प्रफुल पटेल आणि महायुती ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे कार्य करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे. विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

  • 17 Jul 2024 11:20 AM (IST)

    पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या वडिलांच्याही अडचणीत वाढ

    अहमदनगर- वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या वडिलांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाची चौकशी होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवली आहे. खेडकर यांच्या मालमत्ता आणि उत्पन्नाचा स्त्रोतांची माहिती मागवली आहे.

  • 17 Jul 2024 11:10 AM (IST)

    आंबोली घाटातील वाहतूक अखेर पूर्ववत

    आंबोली घाटातील वाहतूक अखेर पूर्ववत झाली आहे. सकाळी आठच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध डोंगराचा भला मोठा दगड आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मोठ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर अडीच तासांनंतर जेसीबीच्या साहाय्याने हा भलामोठा दगड बाजूला करण्यात आला.

  • 17 Jul 2024 10:57 AM (IST)

    Maharashtra News : शिंदखेडा तालुक्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस

    शिंदखेडा तालुक्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस. दोंडाईचा परिसरात भोगावती नदीला मोठा पूर. नदीला पूर आल्याने नदीकाठच्या दुकान आणि घरांमध्ये घुसले पाणी. शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पाणी, कपाशीचे मोठे नुकसान.

  • 17 Jul 2024 10:56 AM (IST)

    Maharashtra News : शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेआधी छगन भुजबळ काय म्हणाले?

    “शरद पवार काय बोलतील हे मी नाही सांगू शकणार. मला खात्री आहे शासनाचे मुख्यमंत्र्यांचे प्रश्न आहेत, त्याच्याबरोबर तुम्ही यायला पाहिजे. तुम्ही दोन-चार लोक बसून राज्यामध्ये शांतता कशी होईल बघितले पाहिजे. तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. तुम्हाला दूर राहून चालणार नाही” असं छगन भुजबळ म्हणाले.

  • 17 Jul 2024 10:31 AM (IST)

    Maharashtra News : भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली

    “काँग्रेसवाले बेईमान आहेत, राष्ट्रवादी वाले हरामखोर, हे शिवसेना वाले उद्धव ठाकरे वाले बेबनाव करत आहेत. जाती पातीच्या लोकांच्या बहकाव्यात येऊ नका. ओबीसी मराठा हे भांडण लावत आहेत. मोदीजी सबका साथ सबका विकास करत आहेत, देशाच्या पंतप्रधानाबद्दल स्वाभिमान बाळगा” असं आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.

  • 17 Jul 2024 10:25 AM (IST)

    Maharashtra News : अमित शाह यांनी राजीनामा द्यावा – संजय राऊत

    “जवान शहीद होतायत, अमित शाह यांनी राजीनामा द्यावा. अमित शाह फक्त राजकारणात व्यस्त. जवानांच्या हत्येला अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा. अमित शाह केंद्रीय गृहमंत्री म्हणून अपयशी. आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी त्यांनी ताकद वापरली” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 17 Jul 2024 09:45 AM (IST)

    Maharashtra News Live:  वर्धासह वेगवेगळया भागात पावसाच्या जोरदार सरी

    वर्धासह वेगवेगळया भागात पावसाच्या जोरदार सरी… विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी… पावसामुळं रस्त्यावरील वर्दळ कमी… काही भागात ढगाळ वातावरण

  • 17 Jul 2024 09:37 AM (IST)

    Maharashtra News Live: ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर तेलवाहतूक करणारे जहाज उलटले

    ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर तेलवाहतूक करणारे जहाज उलटले… प्रेस्टिज फाल्कन या जहाजाचे नाव असून जहाजावर असलेले 13 भारतीय बेपत्ता आहेत… तसेच श्रीलंकेचे 3 नागरिक असे एकूण 16 चालक बेपत्ता आहेत एमएससीने ट्विटरवरील पोस्टमध्ये दिली आहे.

  • 17 Jul 2024 09:26 AM (IST)

    Maharashtra News Live: पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणार पादचारी मार्ग

    पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणार पादचारी मार्ग… राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यासाठी अखेर परवानगी… 100 मीटर लांबीचा पादचारी मार्ग उभारण्यात येणार… राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण

  • 17 Jul 2024 09:12 AM (IST)

    Maharashtra News Live : “चांगला पाऊस येऊ दे, पीकपाणी चांगलं होऊ दे”, मुख्यमंत्र्‍यांकडून विठुरायाला साकडं

    Maharashtra News Live : “पांडुरंगाच्या आशीर्वादाने सलग तीन वर्षे विठ्ठलाची महापूजा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पाऊस चांगला झाला आहे. पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचे संकट नाही. यंदा मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार चांगले काम करत आहे. चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे”, असे साकडं एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातले.

    वाचा सविस्तर बातमी : मुख्यमंत्र्‍यांकडून विठुरायाला साकडं

  • 17 Jul 2024 09:09 AM (IST)

    Maharashtra News Live : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

     Maharashtra News Live : यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली.

  • 17 Jul 2024 09:08 AM (IST)

    Maharashtra News Live : प्रतिपंढरपूर वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

    Maharashtra News Live : ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

    आज राहणार भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर मंदिर खुले

    विठोबा गणपती महादेव मंदिर ट्रस्ट च्या वतीने भाविकांसाठी भाविक रंगांचे नियोजन करण्यात आले

    पहाटे ४ वाजता डॉ. सहजानंद कामत यांच्या हस्ते होणार विठू माऊलीचा महाभिषेक

  • 17 Jul 2024 09:05 AM (IST)

    Maharashtra News Live : पुण्यातील चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यास परवानगी

    Maharashtra News Live : पुण्यातील चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यास परवानगी

    पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणार पादचारी मार्ग

    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यासाठी अखेर परवानगी

    100 मीटर लांबीचा पादचारी मार्ग उभारण्यात येणार

    राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण

    पादचारी मार्गाचे काम कोल्हापूर येथील ‘एमडी इंफ्र’ कंपनीला देण्यात आले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ‘एमडी इंफ्र’ यांच्यातील शेवटच्या टप्प्यातील कराराचे काम सुरू आहे

    चांदणी चौकातील ‘एसटी’चा नवीन बस थांबा इराणी कॅफे बावधन, असा १०० मीटरचा लोखंडी पादचारी मार्ग असणार आहे.

    पुढील महिन्यात पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Published On - Jul 17,2024 9:02 AM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.