Maharashtra Breaking News LIVE : नाशकात शिक्षकांची ‘फर्स्ट क्लास’ कामगिरी, नंदुरबारमधून सर्वाधिक मतदान
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 26 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान होणार आहे. एनडीएचे उमदेवार ओम बिर्ला तर इंडिया आघाडीचे के.सुरेश यांच्यात लढत होणार आहे. सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. एनडीएकडे बहुमत असल्यामुळे ओम बिर्ला यांची निवड निश्चित आहे. देशाचे लक्ष लोकसभा अध्यक्षाच्या निवडणुकीकडे लागले असताना राज्याचे लक्ष विधान परिषद निवडणुकीकडे लागले आहे. राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान आज सुरु झाले आहे. त्यात महाविकास आघाडी की महायुती कोणाची सरसी होते, हे 1 जुलै रोजी स्पष्ट होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बैल जोडीची पुण्यात जंगी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्याच्या बैलजोडीसाठी यंदा कुऱ्हाडे कुटुंबाला मान मिळाला. जम्मू ते माता वैष्णोदेवी मंदिरापर्यंत थेट हेलिकॉप्टर सेवा मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे ज्या भाविकांना एका दिवसात या मंदिरातून दर्शन घेऊन परतायचे आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
उद्धव ठाकरे ताज लँड हॉटेलमध्ये बैठकीसाठी पोहोचले
शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज वांद्रेच्या ताज लँड हॉटेलला बैठक आयोजित करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीचे शेवटचे अधिवेशन असल्याने या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनिती असणार यावर बैठकीत चर्चा होणार आहे. लोकांचे कोणते प्रश्न हाती घेवून आवाज उठवायचा, याबद्दल उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
-
ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई, सहा महिन्यात 55 कोटी 76 लाख 10 हजार रुपयाचे अमली पदार्थ जप्त
पुणे येथील अंमली पदार्थांचा विषय ताजा असतानाच ठाणे पोलिसांनी देखील गेल्या सहा महिन्यात 55 कोटी 76 लाख 10 हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 2724 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या मुली पदार्थांमध्ये आतापर्यंत गांजा, हायब्रीड गांजा, चरस, चरस ऑइल , मेफेड्रोन (एम डी), हॅश ऑइल, कफ सिरप आणि नशेच्या गोळ्या, कोकेन, ब्राऊन शुगर असे अमली पदार्थ जप्त केले आहेत. 1 जानेवारी ते 23 जून 2024 या कालावधीत ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली असून गुरुवारी देखील 18 लाख ९० हजार किमतीचा एक किलो 890 ग्राम वजनाचा चरस त्य जप्त करत तीन आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक केली आहे.
-
-
पोर्शे अपघातप्रकरणी पुणे न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
पोर्शे अपघातप्रकरणी पुणे न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. बचाव पक्षाच्या वकिलाने आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबांच्या जामिनासाठी अर्ज केला होता.
Maharashtra | Pune court has reserved the order in the Porsche accident case. Defence lawyer had applied for the bail of the father and grandfather of the accused juvenile..
— ANI (@ANI) June 26, 2024
-
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत स्पष्टच सांगितलं की…
उत्तर प्रदेश : लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड झाल्याबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले की,विरोधी पक्षनेते बनण्याचा अधिकार सरकारला आरे की विरोधकांना?
#WATCH प्रयागराज, उत्तर प्रदेश: लोकसभा में राहुल गांधी को विपक्ष का नेता चुने जाने के ऊपर उठाए जाने वाले सवाल पर कांग्रेस नेता दिग्विजय सिंह ने कहा, "विपक्ष का नेता बनने का अधिकार सरकार का है या विपक्ष का है?" pic.twitter.com/6RaxvihjKk
— ANI_HindiNews (@AHindinews) June 26, 2024
-
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 11 आणि 12 जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस, लष्कर आणि राखीव पोलीस दलाने संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली होती. या कारवाईचा एक भाग म्हणून आज एका दहशतवाद्याने सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल लष्कराच्या गोळीबारात दहशतवादी मारला गेला.
-
-
राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील, असे ठरले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्यानेही त्यांना प्रोटेम स्पीकरला पत्र लिहून याची माहिती दिली होती.
-
नाशिक शिक्षक मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 64.41 टक्के मतदान
नाशिक शिक्षक मतदारा संघासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 64.41 टक्के मतदान झालं आहे. एकूण 5 जिल्ह्यांपैकी नंदुरबारमध्ये सर्वाधिक 72.69 टक्के मतदान झालं आहे.
नंदुरबार – 72.69 टक्के धुळे – 67.41 टक्के जळगाव – 61.13 टक्के नाशिक – 66.11 टक्के अहमदनगर – 60.42 टक्के
-
सिंधुदुर्गात सर्वाधिक 59.52 टक्के इतक मतदान
महाराष्ट्रात आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. त्यापैकी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 6 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांच्या जवळपास मतदान झालं आहे. सिंधुदुर्गात सर्वाधिक 59.52 टक्के इतक मतदान झालं आहे.अनुक्रमांक जिल्हयाचे नांव एकुण झालेले मतदान एकुण टक्केवारी 1 पालघर 13529 46.77% 2 ठाणे 45025 45.54% 3 रायगड 26402 48.54% 4 रत्नागिरी 11236 49.54% 5 सिंधुदूर्ग 11042 59.52% 6 एकूण 107234 48.00% -
चोपडा बसस्थानकाला 50 लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस
एसटी महामंडळाने घेतलेल्या ” हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगावमधील चोपडा बसस्थानकाने बाजी मारली आहे. चोपडा बसस्थानकाने पहिलं बक्षिस पटकावलं आहे. त्यासाठी बसस्थानकाला 50 लाखांचं बक्षीस मिळालं आहे. तर ‘ब’ वर्गामध्ये भंडाऱ्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आल्याने 25 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. तसंच ‘क’ वर्गातून साताऱ्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आलाय. त्यामुळे 10 लाखाxचे बक्षीस मिळालं आहे.
-
पिपाणी वाजविणारा माणूस आमचं चिन्ह- जयंत पाटील
पिपाणी वाजविणारा माणूस आमचं चिन्ह आहे. तुतारी ही त्यात आहे. जुण्याना घेणे आमची प्रायोरिटी नाही. सत्ता घेण्यासाठी त्यांचा उपयोग झाला ते संपर्कात आहेत. आम्हाला झालेला जुना त्रास लक्षात राहणारच, असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले
-
खासदार कल्याण काळे यांचे पत्रिकेत नाव नसल्यामुळे काँग्रेसचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसने आंदोलन केलं आहे. अल्पसंख्याक आयुक्तलयाच्या उद्घाटन विरोधात काँग्रेसचे आंदोलन असून काँग्रेस खासदार कल्याण काळे यांचे पत्रिकेत नाव नसल्यामुळे आंदोलन केलं आहे. हज हाऊस सभागृहाच्या बाहेर काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे.
-
बोगस प्रमाणपत्र नोंदी रद्द करा अन्यथा पुन्हा उपोषण करणार- लक्ष्मण हाके
राजकीय नेत्यांनी जरांगे ला पुढे करून ओबीसींच्या अंगावर घातले आहे. 54 लाख लोक ओबीसी त आले तर आपले आरक्षण राहणारच नाही. बोगस प्रमाणपत्र नोंदी रद्द करा अन्यथा पुन्हा उपोषण करणार, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे आश्वासन हवे, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
-
संत तुकाराम महाराजांच्या गुरूंच्या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान
संत तुकाराम महाराज यांचे गुरू संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचे आज ओतूर येथून प्रस्थान झाले आहे. 64 वर्षांची परंपरा असणाऱ्या या दिंडी सोहळ्याला आज ओतूर येथून सूरवात झाली असून आगामी चाळीस दिवस पायी प्रवास करून हा दिंडी सोहळा पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
-
घाटकोपरमध्ये दरड प्रवण क्षेत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी
घाटकोपरमध्ये दरड प्रवण क्षेत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. दरड प्रवण क्षेत्राचा सर्व्हे करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
-
अंमली पदार्थाचं सेवन करणार नाही, विद्यार्थ्यांना पोलीस आयुकांनी दिली शपथ
पुण्यात अंमली पदार्थाचं सेवन करणार नाही अशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस आयुकांनी शपथ दिली. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात कार्यक्रम होता. तरुणाईत वाढलेला ड्रग्जचा विळखा कमी करण्यासाठी महाविद्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि संदीप गिल उपस्थित होते.
-
पुण्यात इस्को बारवर बुलडोजर कारवाई
पुण्यातील ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर बार आणि पब वर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पुणे महापालिकेकडून बुलडोजर कारवाई करण्यात येत आहे.
-
शिक्षक मतदार संघ निवडणूक : धुळे जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 47.25% मतदान
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्य़ात सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 47.25% मतदान झाले आहे.
-
कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अंबरनाथमध्ये मतदारांच्या रांगा
कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अंबरनाथमध्ये मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. मतदार यादीत अनेकांची नावं नसल्यानं अनेक जण निराश झाले. दरवर्षी नव्याने मतदार नोंदणी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
-
लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे मातृतिर्थावर नतमस्तक
बुलढाणा: लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे मातृतिर्थावर नतमस्तक झाले. माँसाहेब जिजाऊंच्या चरणी लीन झाले. हाके, वाघमारे यांच्या अभिवादन यात्रेचा आज पहिला दिवस आहे. सिंदखेड राजा मध्ये हाके, वाघमारे यांची रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
-
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान; ठाकरे कुटुंब मतदानसाठी दाखल
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वांद्रे पूर्वमधील असलेल्या महात्मा गांधी विद्यालयात मतदानासाठी दाखल झाले आहेत. या ठिकाणी मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी अख्खं ठाकरे कुटुंब दाखल झालं आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब त्यांच्यासोबत आहेत. ठाकरे ज्यांना मत देतात तेच विजयी होतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मुंबई पदवीधर मतदार संघात अनिल परब विरूद्ध किरण शेलार यांच्यात थेट लढत होत आहे.
-
पुण्यातील इस्को बारवर कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील इस्को बारवर कारवाई करण्यात येत आहे. इस्को बारवर धडक कारवाई करण्यात येत आहे. पुणे महापालिकडून कारवाईला सुरुवात झाली आहे.
-
लक्ष्मण हाकेंची अभिवादन यात्रा बुलढाण्यात
लक्ष्मण हाके यांची अभिवादन यात्रा बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे पोहचली आहे. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या स्वागताला मोठी गर्दी झाली आहे. एक किलोमीटर पासून रॅलीला सुरुवात झाली आहे. मात्र लक्ष्मण हाके यांनी हार तुरे नाकारले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बॅनरबाजी
छत्रपती संभाजीनगर शहरात वंचित बहुजन आघाडीची बॅनरबाजी पाहायला मिळाली. बॅनरच्या माध्यमातून 4 मागण्या करण्यात आल्या आहेत. सगे सोयरे जीआर रद्द करण्याची मागणी, मायक्रो ओबीसी साठी रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची मागणी, sc/ st प्रमाणे ओबीसी ला घटनात्मक आरक्षण द्या, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
-
पंढरपुरात विठ्ठल पदस्पर्श दर्शन रांगेत गोंधळ
पंढरपुरात विठ्ठल मंदिरात पदस्पर्श दर्शन रांगेत गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. दर्शन रांगेत भाविकांची गर्दी झाल्याने ढकला ढकली झाली आहे. दर्शन रांगेच्या बाजुला नगर पा लिकेचे रस्त्याचे काम सुरु असल्याने भाविक दर्शन रांगेत घुसले. आषाढीपूवी दर्शनबारीची व्यवस्था कोलमडली आहे. दर्शन रांगेत पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने घुसखोरीच्या प्रकार वाढले आहेत. दर्शन रांगेत घुसखोरी वाढल्याने गोंधळ झाला आहे. यामुळे दर्शनासाठी रांगेत उभारलेल्या भाविकांचे हाल झालेत.
-
Maharashtra News : आमच्या मागण्यांवर सरकार काहीही काम करत नाही – मनोज जरांगे पाटील
“छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि देशातील सर्व जनतेला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व आमदार आणि खासदार यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटाव यासाठी पत्र लिहून द्यावे, हे जर सदाभाऊ खोत म्हणाले असतील तर त्यांनी चांगली मागणी केली आहे. आमच्या मागण्यांवर सरकार काहीही काम करत नाही. सरकारने आमच्या आमच्या ज्या नोंदी मिळाल्या, त्यांनाही प्रमाणपत्र देणे बंद केले आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
Maharashtra News : नीट परीक्षा घोटाळ्यावर जितेंद्र आव्हाड आक्रमक
नीट परीक्षा घोटाळ्यावर जितेंद्र आव्हाड आक्रमक. अजितदादा विद्यार्थ्यांची भेट काय घेता? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. गुणवत्ता तपासणार नसाल, तर देशाच भवितव्य अंधारात असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलय.
-
Maharashtra News : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात सकाळी 11 पर्यंत किती मतदान?
– नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात सकाळी 11 पर्यंत 23.16% मतदान
– सर्वाधिक मतदान धुळे जिल्ह्यात, 26.65 टक्के टक्के इतका झाला मतदान
– नाशिक जिल्ह्यात 25.22 टक्के, नगर जिल्ह्यात 19.91 टक्के, जळगावला 20.5 टक्के, नंदुरबारला 26.35 टक्के मतदानाची नोंद.
-
Maharashtra News : पुण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळले
पुण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळले. एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झाली लागण. पुणे महापालिकेकडून लागण कशी झाली याचा शोध सुरु. सध्या ते दोन जण क्वारंटाइनमध्ये. पुणे महापालिकेकडून उपाय योजना सुरु आहेत.
-
Maharashtra News : मुंबई पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मतदान
पदवीधरसाठी मुंबई शहरातून सकाळी 11 वाजेपर्यंत 27.25 टक्के, उपनगरातून 26.93 टक्के मतदान.
शिक्षक मतदारसंघासाठी मुंबई शहरातून सकाळी 11 वाजेपर्यंत 20.63 टक्के, उपनगरातून 17.87 टक्के मतदान.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मतदान
पालघर 17.33 टक्के, ठाणे 20.59 टक्के, रायगड 19.83 टक्के, रत्नागिरी 19.28 टक्के, सिंधुदुर्ग 24.17 टक्के
शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान
सात ते अकरा वाजे दरम्यान जळगाव जिल्ह्यात 20.05 टक्के एवढे मतदान
-
Maharashtra News : राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीची बॅनरबाजी
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीची बॅनरबाजी… सर्व समाज घटकांना खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्याची केली मागणी… रोहिणी आयोग लागू करून मायक्रो ओबीसींना न्याय देण्याची मागणी… वंचित बहुजन आघाडीची बॅनरबाजी संभाजी नगरात चर्चेत… खाजगी क्षेत्रातही आरक्षणाची मागणी केल्यामुळे डोळे उंचावले
-
Maharashtra News : बिर्ला सर्वांना समान संधी देतील, अशी अपेक्षा – अखिलेश यादव
बिर्ला सर्वांना समान संधी देतील, अशी अपेक्षा… बिर्ला कोणाचा आवाज दाबणार नाहीत, अशी अपेक्षा… संसदेत पुन्हा खासदारांचं निलंबन होऊ नये… असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केलं आहे.
-
Maharashtra News : बिर्ला अध्यक्ष असताना आपण नव्या संसदेत प्रवेश केला – मोदी
बिर्ला अध्यक्ष असताना आपण नव्या संसदेत प्रवेश केला… ओम बिर्ला यांनी नवा इतिहास रचला…. बिर्लांच्या मागच्या कार्यकाळात महत्त्वाची विधेयकं मंजूर झाली – पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
Maharashtra News : ओम बिर्ला दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, त्यांना शुभेच्छा देतो – नरेंद्र मोदी
ओम बिर्ला दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, त्यांना खूप शुभेच्छा देतो… बिर्ला दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी… ओम बिर्ला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत राहतील… असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
-
Maharashtra News : ओम बिर्ला लेकसभेचे नवे अध्यक्ष
18 व्या लोकसभेचे ओम बिर्ला नवे अध्यक्ष झाले आहेत… राहुल गांधी यांनी देखील ओम बिर्लांचं अभिनंदन केलं आहे.
-
कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदार संघ निवडणूक 2024, कुठे किती झाले मतदान ?
कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील मतदार संघ निवडणूक 2024 साठी आज मतदान होत आहे. आत्तापर्यंत कुठ, किती मतदान झाले ?
पालघर – 1684 – 5.80 %
ठाणे – 8333 – 8.42 %
रायगड -3809- 7.00 %
रत्नागिरी -1149 -5.06 %
सिंधुदूर्ग – 1345 – 7.25 %
एकूण – 16320 – 7.30 %
-
Maharashtra News : मोदींनी ओम बिर्लांच्या नावाचा प्रस्ताव मांडला
मोदींनी ओम बिर्लांच्या नावाचा प्रस्ताव मांडला…. ओम बिर्ला – के. सुरेश यांच्यामध्ये लढत… ओम बिर्लांच्या नावाच्या समर्थनासाठी 13 पक्षांचा प्रस्ताव…
-
लोकसभा अध्यक्षपदासाठी थोड्याच वेळात होणार मतदान
लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी थोड्याच वेळात मतदान होणार आहे. एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के.सुरेश यांच्यात थेट लढत होणार.
-
नवी दिल्ली – लोकसभा अध्यक्ष निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींची वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
दिल्ली : लोकसभा अध्यक्ष निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींची वरिष्ठ नेते तसेच मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. निवडणुकीबाबतचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
-
छत्रपती संभाजीनगर – बिबट्याच्या हल्ल्यात 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथे धक्कादायक घटना
छत्रपती संभाजीनगर – कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भांबरवाडी येथील शेतात मुलाचा मृतदेह मिळाला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला की, काही घातपात आहे याचा पोलिसांकडून तपास सुरू.
-
लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक एनडीएने आमच्यावर लादली – संजय राऊत
लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक एनडीएने आमच्यावर लादली. भाजपचा हुकूम मानणारे वोक १० वर्षांपासून अध्यक्षपदी आहेत. लोकसभा अध्यक्षपदाला मोठी परंपरा आहे,पण भाजपने ती मोडली, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
नाशिक – येवला येथील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मतदारावर घेतला आक्षेप
नाशिक – येवला येथील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मतदारावर आक्षेप घेतला . संशयास्पद मतदार आढळून आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केली मतदाराची पडताळणी. मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांची विवेक कोल्हे यांनी घेतली शाळा. निवडणूक अधिकाऱ्यांकडून संबंधित मतदाराची कागदपत्रं तपासली .
-
जालना – अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका, 13 तासांत अपहरणकर्त्यांच्या आवळल्या मुसक्या
जालन्यात अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी 13 तासांत अपहरणकर्त्यांच्या आवळल्या मुसक्या आवळल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातल्यान पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर.5 कोटींची खंडणी मागणारे अपहरणकर्ते गजाआड.
-
मातोश्रीचा आशीर्वाद ज्यांना असतो ते विजयी होतात
मातोश्रीचा आशीर्वाद ज्यांना असतो ते विजयी होतात, असे मुंबई पदवीधरचे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब म्हणाले. प्रत्येक निवडणुकीत माझ्यासमोर कोण आहे याचा मी विचार करत नाही. मी माझ्या विजयाबाबत आश्वासक असल्याचे ते म्हणाले.
-
कोकण पदवीधर मतदानाला सुरवात
नवी मुंबईत कोकण पदवीधर मतदानाला सुरवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत आहे. नवी मुंबईत एकूण ११ हजार मतदार तर ठाणे जिल्ह्यात ९९ हजार मतदार आहेत. भाजपाचे निरंजन डावखरे विरूध्द कॅाग्रेसचे रमेश किर यांच्यात थेट लढत आहे.
-
छत्रपती शाहु महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त कोल्हापूर मध्ये शोभायात्रा काढण्यात आली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. कोल्हापूर विविध शाळा महाविद्यालय मधील विद्यार्थी शोभायात्रेत सहभागी झाले.
-
लोकसभा अध्यक्ष पदासाठी थोड्याच वेळात मतदान
लोकसभा उपाध्यक्ष पदासाठीचा दावा अमान्य झाल्यामुळे विरोधकांनी आता अध्यक्ष पदासाठी दंड थोपाटल्याची चर्चा रंगली आहे. इंडिया आघाडीने शड्डू ठोकले असले तरी विरोधकांचे आव्हान किती मोठे आहे? अगदी थोड्याचवेळात मतदानानंतर हे चित्र स्पष्ट होईल.
-
नाशिक शिक्षक मतदार मतदान प्रक्रियेला सुरुवात
नाशिक शिक्षक मतदार मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यातील बारा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील 8 हजार शिक्षक बजावणार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतदान करण्यासाठी शिक्षकांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत.
-
सोने-चांदीच्या आघाडीवर मोठा दिलासा
मागील दोन आठवड्यात सुरुवातीला भावात घसरण तर अखेरच्या टप्प्यात चढउताराचे सत्र असा रतीब, ट्रेंड सुरु आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला अशीच परिस्थिती आहे. किंमतीत घसरण झाली आहे. मौल्यवान धातूंना कमाल दाखविता आलेली नाही. गेल्या आठवड्यात 22 जून रोजी सोने आणि चांदी दणकावून आपटले होते. त्यानंतर किंमतीत मोठा बदल झालेला नाही.
-
अधिवेशनाच्या तोंडावर महायुतीत धुसफूस
अमोल मिटकरी यांच्यावर प्रवीण दरेकर म्हणाले की, ते प्रमुख नेते नाहीत त्यांना उत्तर देणे योग्य नाही. त्यांनी तोंड बंद ठेवावे. जो काही निर्णय होईल, तो पक्षाचे नेतृत्व करेल. उद्यापासून अधिवेशन सुरू होत असून अधिवेशन शांततेत पार पडेल आणि अनेक मुद्दे मांडले जातील, अशी आशा असल्याचे ते म्हणाले.
-
Marathi News: जम्मू-वैष्णोदेवी हेलिकॉप्टर सुरू
कटरा – जम्मू ते माता वैष्णोदेवी मंदिरापर्यंत थेट हेलिकॉप्टर सेवा मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. यामुळे ज्या भाविकांना एका दिवसात या मंदिरातून दर्शन घेऊन परतायचे आहे, त्यांची सोय होणार आहे. जम्मूहून सेवेची निवड करणारे यात्रेकरू दोन पॅकेजमधून निवड करू शकतील. त्याच दिवशीच्या परतीच्या प्रवासासाठी प्रति प्रवासी ३५ हजार रुपये प्रतिव्यक्ती आणि दुसऱ्या दिवशी परतण्यासाठी ६० हजार रुपये प्रतिव्यक्ती भाडे आकारण्यात येईल.
-
Marathi News: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बैल जोडीची पुण्यात मिरवणूक
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बैल जोडीची पुण्यात जंगी मिरवणूक काढण्यात आली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या बैलजोडीसाठी यंदा कुऱ्हाडे कुटुंबाला मान मिळाला. मानाच्या बैलजोडींची काल श्री क्षेत्र आळंदी येथे ढोल-ताशा, हलगी, सनईच्या मंगल सूरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली.
-
Marathi News: दोन तरुणांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वेखाली आल्याने २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. भद्रावती तालुक्यातील मुरसा शेतशिवारा जवळील रेल्वेरुळाजवळ दोन्ही मृतदेह आढळले. संदीप सहादेव बेलसरे (25) आणि विजय तुलसाराम मावसकर (28) अशी मृतकांची नावे आहेत. दोन्ही मृतक अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातील जामणी येथील रहिवासी आहेत.
-
Marathi News: नीट परीक्षा प्रकरणात चौकशी करा
नीट परीक्षा घोटाळा प्रकरणाच्या माढा कनेक्शनची आरोपी उपशिक्षक संजय जाधवसह सोलापूर जिल्हातील शिक्षण विभागातील शिक्षकांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाअध्यक्ष सचिन जगताप यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे.
Published On - Jun 26,2024 8:06 AM