Maharashtra Breaking News LIVE: पुणे पोलिसांचा काँग्रेस भवन परिसरात मोठा बंदोबस्त, नक्की कारण काय?
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 3 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. एकीकडे महाराष्ट्राच्या शिक्षक-पदवीधर निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. तर दुसरीकडे विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. तसेच सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. त्यासोबतच राज्यात अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
परळीतील गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल
बीड : परळीतील गोळीबार प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय. धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्यासह इतर सात जणांवर 307 चा गुन्हा दाखल झाला आहे.
-
पिंपरी चिंचवडवमध्ये अजित पवार गटाला शरद पवारांचा मोठा धक्का, माजी शहर युवक शहराध्यक्षाचा पक्षात प्रवेश
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी शहर युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
-
-
हातरस चेंगराचेंगरी घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुखांची भेट
राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) प्रमुख रेखा शर्मा यांनी हातरस चेंगराचेंगरी घटनास्थळाला भेट दिली.मंगळवारी हातरस येथे आयोजित सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले होते.
#WATCH | Uttar Pradesh: National Commission for Women (NCW) chief Rekha Sharma visits the site of Hathras stampede incident.
Yesterday, 121 people died and 28 people got injured in a stampede during a Satsang organised in Hathras. pic.twitter.com/iDix6crq08
— ANI (@ANI) July 3, 2024
-
झारखंडमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनंतर हिमंता बिस्वा सरमा यांची टीका
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले आहे की “झारखंडमधील एका ज्येष्ठ आदिवासी नेत्याला झारखंडमधील मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकणे हे जेएमएम आणि काँग्रेस पक्षाने अत्यंत दुःखदायक आहे. मला खात्री आहे की झारखंडचे लोक या कृतीचा तीव्र निषेध करतील आणि ठामपणे नाकारतील. “
Assam CM Himanta Biswa Sarma tweets “The removal of a senior tribal leader from the post of Chief Minister in Jharkhand by the JMM and Congress party is deeply distressing. I am certain that the people of Jharkhand will strongly condemn this action and firmly reject it.” pic.twitter.com/XG5sQXIMxo
— ANI (@ANI) July 3, 2024
-
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री होणार
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतून बाहेर आलेले काँग्रेस आमदार इरफान अन्सारी यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, हेमंत सोरेन आमचे मुख्यमंत्री असतील.
-
-
जापानच्या पंतप्रधानांनी हातरस दुर्घटनेवर शोक व्यक्त केला
जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी हातरसमधील अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. या संदेशात त्यांनी पीडितांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करत शोकाकूल कुटुंबासोबत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
-
शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन
भाजप आंदोलनामुळे पुणे पोलिसांनी काँग्रेस भवन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.काँग्रेस भवनात काँग्रेस कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली आहे. त्यामुळे काँग्रेस भवन परिसरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजप हे आंदोलन करत आहे.
-
पोलिसांची मोठी कारवाई
बोगस कागदपत्र तयार करून जामीनदार होणाऱ्या टोळीचा ठाणे नगर पोलिसांनी उचलबांगडी केली आहे. यामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
-
धनगर आरक्षणासाठी तरुणांचे अनोखे आंदोलन
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी केस तालुक्यातील केकचे सारणी गावात तरुणांचं अनोखा आंदोलन सुरू आहे. चार तरुणांनी गावाच्या पाण्याच्या टाकीवर चढून आमरण उपोषण सुरू केले उपोषणाचा आजचा त्यांचा तिसरा दिवस आहे. पाण्याच्या टाकीवरच तरुणांनी छत टाकून उपोषणाला सुरुवात केली.
-
बांधकाम कामगारांनी रोखला पुणे- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग
सोलापुरात शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी मोठी गर्दी केली होती. इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते. मात्र साहित्य वाटप होत नसल्याने कामगार संतप्त झाले आहेत. संतप्त बांधकाम कामगारांनी पुणे- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. बांधकाम कामगारांना वाटप करण्यात येणारे साहित्य मिळत नसल्याने कामगार संतप्त झाले.
-
प्रचारासाठी द्या की हेलीकॉप्टर
कोल्हापुरातील शिरोळमधील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात आली आहे. अंकुश संघटनेने ही अनोखी मागणी केली आहे. अंकुश संघटनेने दत्त सहकारी साखर कारखाना आणि निवडणूक निर्णय अधिकार्यांना याविषयीचे निवेदन दिले आहे. येत्या 24 जुलै रोजी दत्त सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान होणार आहे.
-
ही या सरकारची तानाशाही
विरोधी पक्ष नेत्यांना ज्या पद्धतीने निलंबित केले जाते ही एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारची तानाशाही असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केला आहे.
-
उद्घाटनानंतर थोड्याच दिवसात धुळ्यातील गार्डन बंद
धुळे शहरातील संत रविदास गार्डन बंद आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गार्डन बंद आहे. महापालिकेच्या तात्कालीन भाजपा सत्ताधाऱ्यांनी मोठा गाजावाजा करून गार्डनचे उद्घाटन केले होते.उद्घाटनानंतर थोड्या दिवसात गार्डन बंद आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्च करून महापालिकेच्या वतीने गार्डनर बांधण्यात आले होते.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 21 जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 21 जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या भव्य प्रसादगृहाच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. अक्कलकोटमध्ये अन्नछत्र मंडळातर्फे स्वामी भक्तांसाठी 1 लाख 19 हजार चौरस फुटाचे भव्य महाप्रसादगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे.
-
फडणवीस लवकरच सोलापूर दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 21 जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या भव्य प्रसादगृहाच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहतील. अक्कलकोटमध्ये अन्नछत्र मंडळातर्फे स्वामी भक्तांसाठी 1 लाख 19 हजार चौरस फुटाचे भव्य महाप्रसादगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी याबाबतची माहिती दिली.
-
मुख्यमंत्री दावोसला गेले तिथून मोठी गुंतवणूक आणली – फडणवीस
मुख्यमंत्री दावोसला गेले तिथून मोठी गुंतवणूक आणली आहे. गेल इंडिया कंपनीने कोणत्याही सवलती मागितल्या नाहीत. मुंबई आणि सुरतच्या डायमंड बोर्समध्ये फरत आहे. मुंबईतील डायमंड व्यापारी सुरतला गेलेले नाहीत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
-
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळी वाढ ही कायम आहे. राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती गृहातून 16 हजार क्युसेका विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 23 फूट नऊ इंचांवर पोहोचली आहे. नदीमधील छोटी मोठी मंदिर पाण्याखाली गेली आहेत. शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप मात्र धरण क्षेत्रात संततधार पाऊस.
-
उत्पन्न दाखल्यासाठी पैसे उकळणाऱ्या तलाठ्याविरुद्ध वरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती : लाडकी बहीण योजनेच्या उत्पन्न दाखल्यासाठी पैसे उकळणाऱ्या त्या तलाठ्याविरुद्ध वरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीच्या वरुड पोलीस स्टेशनमध्ये तलाठी तुळशीराम कंठाळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय
-
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यात नगर येथे असताना शिलापूरकर महाराज यांचे आज पहाटे निधन झाले. मागील वीस वर्षांपासून शिलापूरकर महाराज हे पायी दिंडी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांना घेऊन नाशिक त्रंबकेश्वर ते पंढरपूर पर्यंत पायी सोहळ्या सहभागी होत होते. जेष्ठ कीर्तनकार रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
-
हाथरस दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना
हाथरस दुर्घटनेवर आग्रा झोनच्या एडीजींच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. हाथरस घटनेची न्यायालयीन चौकशी होणार आहे. निवृत्त न्यायाधीश याच्या अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
-
पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा इशार नुकताच देण्यात आलाय.
-
काही लोकांवर विनाकारण गुन्हे दाखल आहेत
काही लोकांवर विनाकारण गुन्हे दाखल असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
तलाट्याला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही- पाटील
तलाट्याला पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचा मोठा आरोप विधानसभेत करण्यात आलाय.
-
केज तालुक्यातील केकत सारणी गावात शोले स्टाईल आमरण उपोषण
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी चार तरुणांचे उपोषण सुरू
-
नवी मुबंईत रस्त्यावरील खड्ड्यात बसून ठाकरे गटाच आंदोलन
नवी मुंबई येथे मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहे. ठाकरे गट खड्ड्यासाठी सध्या आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान
महिलांनी घाबरून जाण्याचे कारण नाहीये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
-
लाडकी बहीण योजनेत अडथळा आणल्यास कारवाई होणार- मुख्यमंत्री
लाडकी बहीण योजनेत अडथळा आणल्यास कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत महिलांची अडचण होऊ देऊ नका, असंही त्यांनी म्हटलंय.
-
पुण्याच्या ग्रामीण भागात अजूनही बुलडोझर कारवाई सुरूच
पुण्याच्या ग्रामीण भागात अजूनही बुलडोझर कारवाई सुरूच आहे. अनधिकृत हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यात येत आहे. भूगाव परिसरात ही कारवाई सुरू आहे. मात्र कारवाईपूर्वी नोटीस दिली नसल्याची मालकांची माहिती आहे.
-
बेकायदा फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालाकडून सरकार, महापालिकेची कानउघडणी
बेकायदा फेरीवाल्यांची समस्या सोडविण्यासाठी सर्वसामान्यांना अनिश्चित काळासाठी वाट पाहण्यास आणि ही असह्य परिस्थिती सहन करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच ही समस्या दिवसेंदिवस भयावह होत असताना कारवाईबाबत राज्य सरकार आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकू शकत नाही, अशा शब्दात न्यायालयाने सरकार आणि महापालिकेची कानउघाडणी केली.
-
लाडकी बहीण योजनेवरून विधान परिषदेत चर्चा सुरू
“सुरुवातीला अट होती की 5 एकर शेतजमीन असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 21 ते 65 वर्षे वयोगट आता ठरवण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान मिळणार”, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
-
पुण्यात तरतुदीपेक्षा ३ टीएमसी अधिक पाणी दिलं जातं- फडणवीस
“खडकवासला ते फुरसुंगी बोगदा करतोय. या बोगद्यामुळे अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. पुण्यात तरतुदीपेक्षा ३ टीएमसी अधिक पाणी दिलं जातं. लोकसंख्येच्या आधारावर पाणी देण्याचं नियोजन करण्यात येतंय,” असं फडणवीस म्हणाले.
-
पुण्यातील पाणी प्रश्नाबाबत विधानसभेत चर्चा
पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. पुण्यातील पाणी प्रश्नाबाबत विधानसभेत चर्चा सुरू आहे. “पुण्यामध्ये आम्ही समान पाणी वाटप योजना हाती घेतली. याचा साधारण कालावधी 8 वर्षांचा आहे. यामध्ये सर्व एरियामधील पाईपलाइन दुरुस्ती करावी लागते. पुण्यात मोठ्या प्रमाणावर याचं काम झालं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
-
Maharashtra News : पुण्याच्या ग्रामीण भागात अजूनही बुलडोझर कारवाई सुरुच
पुण्याच्या ग्रामीण भागात अजूनही बुलडोझर कारवाई सुरुच… अनधीकृत हॉटेल बारवर कारवाई… भूगाव परिसरात सुरू आहे कारवाई… अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
-
Maharashtra News : भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणू – मोदी
भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणू… पुढील 5 वर्ष मुलभूत सुविधांवर अधिक भर देणार… पुढील 5 वर्ष गरिबीच्या विरोधात लढाई असेल… असं वक्तव्य देखील राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
-
Maharashtra News : मोदींच्या वक्तव्यावर विरोधकांचा संसदेत गदारोळ
विरोधकांनी संविधान दिनाला विरोध केला. संविधानाचा राष्ट्रव्यापी उत्सव साजरा करणारा… विरोधक आपला पराभव स्वीकार करत आहेत… मोदींच्या वक्तव्यावर विरोधकांचा संसदेत गदारोळ
-
Maharashtra News : विधान परिषदेच्या आजच्या कामकाजावर ठाकरे गटाचा बहिष्कार
ठाकरे गटाचा एकही आमदार विधान परिषदेत उपस्थित नाही.. अंबादास दानवेंच्या निलंबनामुळे ठाकरे गट आक्रमक… विधान परिषदेच्या आजच्या कामकाजावर ठाकरे गटाचा बहिष्कार…
-
Maharashtra News : देशाच्या जनतेनं आम्हाला निवडून दिलं – पंतप्रधान मोदी
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत भाषण… देशाच्या जनतेनं आम्हाला निवडून दिलं… 60 वर्षांनंतर लोकसभेत बहुमत मिळालं आहे… संभ्रमाच्या राजकारणाला जनतेनं नाकारलं… आम्ही केलेल्या सेवेला जनतेनं समर्थन केलं… देशात सलग तिसऱ्यांदा आमचं सरकार आलं आहे… असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
-
Maharashtra News : सोलापुरात रिक्षाचालकांचा सरकार विरोधात मोर्चा
फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून सोलापुरात सहा हजार रिक्षा चालक आक्रमक… राज्य परिवहन विभागाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत भव्य मोर्चा… फिटनेस नसलेल्या वाहनांना 2016 सालापासून ते आजपर्यंत प्रतिदिन 50 रुपये दंड भरावा लागणार … या नव्या नियमामुळे प्रत्येक रिक्षावाल्याला 80 हजार पेक्षा जास्त दंड भरावा लागणार आहे… या निर्णयाविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे…
-
राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत होणार सहभागी
काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी हे येत्या 14 जुलै वारीत सहभागी होणार आहेत. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी ही माहिती दिली आहे.
-
विधिमंडळात अंबादास दानवे यांचे निलंबन , ठाकरे गट आक्रमक
विधिमंडळात अंबादास दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या निलंबनविरोधात क्रांती चौकात आंदोलन सुरू असून घोषणाबाजी करण्यात येत आहे.
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हातरसमध्ये पोहोचले, जखमींची केली विचारपूस
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हातरसमध्ये पोहोचले, चेंगराचेंगरीच्या घटनेतील जखमींची केली विचारपूस. या चेंगराचेंगरीमध्ये आत्तापर्यत 121 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
#WATCH | Uttar Pradesh CM Yogi Adityanath meets the injured in the stampede incident, at Hathras government hospital
121 people lost their lives in a stampede during a religious event in Hathras yesterday pic.twitter.com/mDpTLBxpL2
— ANI (@ANI) July 3, 2024
-
पुणे – काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक , संभाजी भिडेंविरोधात आंदोलन सुरू
संभाजी भि़डे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुण्यात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून त्यांनी भिडेंविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. ‘ वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं,’ असं वक्तव्य भिडे यांनी केलं होतं, त्यामुळे वाद निर्माण झाला.
-
सोलापुरातील मुळेगावात हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्ग कामगारांनी रोखला
सोलापुरातील मुळेगावात हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्ग कामगारांनी रोखला आहे .सुट्टीच्या दिवशी बोलावूनही बांधकाम कामगारांना साहित्य न दिल्याने ते आक्रमक झाले आहेत.
-
Maharashtra News : लाडकी बहीण योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयात गर्दी
लाडकी बहीण योजनेसाठी सलग तिसऱ्या दिवशी महिलांची गर्दी. छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर गर्दी. आज रांग लावून महिलांकडून रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गर्दी. तालुक्यातील महिलांची लागली भलीमोठी रांग.
-
Maharashtra News : संजय राऊत सकाळी कोल्हेकुई करतात – नरेश म्हस्के
“महाराष्ट्राने वाघ कोण, आणि संजय राऊत सारखा उंदीर कोण हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. कोविड काळात मुख्यमंत्री वाघाप्रमाणे बाहेर पडले नाहीत, अडीच वर्षे ते बिळात बसून राहिले त्यामुळे वाघ, लांडगा, कोल्हा आणि उंदीर कोण हे हिंदुस्थानाने आणि महाराष्ट्राने पाहिलं आहे. संजय राऊत सकाळी कोल्हेकुई करतात” अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
-
Maharashtra News : पुण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन
पुण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच आंदोलन. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा करणार निषेध. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन. पोलिसांचा बंदोबस्त पण लावण्यात आलाय.
-
Maharashtra News : लाडकी बहिण योजनेसाठी कोल्हापुरात मोठी रांग
लाडकी बहिण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या नागरी सेवा केंद्रात नागरिकांची रांग. जन्म दाखला मिळवण्यासाठी महिलांसह पुरुषही रांगेत. योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवूनही कोल्हापुरातील रांग कायम.
-
Marathi News : मनमाडमध्ये भाजी मार्केटसाठी आंदोलन
नाशिक मनमाडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचे पूर्ण करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व डेली मार्केट व्यापारी संघटनेच्या वतीने गंगादादा त्रिभुवन यांनी अर्धनग्न होऊन डेली मार्केटच्या इमारतीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनांची चांगलीच तारांबळ उडाली.सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते.
-
Marathi News : घोरपड विकणाऱ्यांच्या पोलिसांवर हल्ला
अमरावती शहरातील वडाळी परिसरात घोरपडींची राजरोस विक्री रोखण्यासाठी गेलेल्या वनविभाग व पोलिसांच्या पथकावर समूहाकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. तो परतवून लावत चार घोरपडी जप्त करण्यात आल्या तसेच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
-
Marathi News : परळीत आज बंद
परळीतील गोळीबार प्रकरणी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळी बंदची हाक देण्यात आलीय. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिले होते. शनिवारी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली. यातील आरोपी अद्याप फरार आहेत. शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांचा यात समावेश आहे. दरम्यान आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आज परळी शहर बंद ठेवण्यात आले आहे.
-
Marathi News : ठाण्यात नवीन जलवाहिनीची प्रतिक्षा
ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील साईनाथनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी ठाणे स्टेशन रोड येथे नव्याने जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी २५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच सहा इंची जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने कोपरीवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.
-
विशाल अग्रवालला पुन्हा अटक
पुण्यातील सदनिका धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल अग्रवालला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर अपघातातील एका गुन्ह्यातून जामीन मिळताच दुसऱ्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी विशाल अग्रवालला अटक केली आहे.
-
पुण्यातील L3 बार पार्टीप्रकरणी नवीन अपडेट समोर
पुण्यातील L3 बार पार्टी प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. ड्रग्स पुरवठा केल्याप्रकरणी नायजेरियन सह तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ केली गेली आहे.
-
पुण्यात झिका व्हायरसचा विळखा, रुग्णांचा आकडा वाढला
पुण्यात झिका विषाणूने थैमान घातले आहे. पुण्यात आतापर्यंत झिका विषाणूचे 7 रुग्ण आढळले आहेत. त्यात एक डॉक्टर आणि दोन गर्भवती महिलांचाही समावेश आहे. पुण्यात झिका विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकड़ून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
-
Maharashtra News : राज्यात यलो अलर्ट जारी
हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे आणि नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, रत्नागिरी, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published On - Jul 03,2024 8:15 AM