‘ऋषी सुनक’ पुस्तक ठरतंय बेस्ट सेलर, आठ दिवसांत तिसरी आवृत्ती

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे.

'ऋषी सुनक' पुस्तक ठरतंय बेस्ट सेलर, आठ दिवसांत तिसरी आवृत्ती
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 11:43 PM

पुणे : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजीटल माध्यमांमुळे समोर आले आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे, अशी भावना वाचकांची आहे.

“एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटत आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत. दिवस-रात्र मेहनत करत आहेत”, अशी भावना भारतातील अनेक नागरिकांची आहे.

माय मिररचे मनोज अंबिके यांनी प्रतिक्रिया दिली. “ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोनच दिवसांमध्ये आम्ही दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज अंबिके यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे”, अशी प्रतिक्रिया ऋषी सुनक यांनी दिली.

कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.