उत्तर प्रदेशात भीषण अपघात, बसमध्ये 135 प्रवासी झोपेत असताना काळाचा घाला, देशाला हादरवणारी घटना

135 प्रवाशांनी भरलेली एक 'डबल डेकर' बस पंजाबच्या लुधियाना येथून बिहारच्या दिशेला निघाली. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते.

उत्तर प्रदेशात भीषण अपघात, बसमध्ये 135 प्रवासी झोपेत असताना काळाचा घाला, देशाला हादरवणारी घटना
नियतीने साथ सोडली, बसमध्ये 135 प्रवासी झोपेत असताना काळाचा घाला, देशाला हादरवणारी घटना
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 5:17 PM

लखनऊ : लॉकडाऊन काळात आपण मजुरांचे होणारे हाल बघितले. रेल्वे बंद झाल्याने शेकडो मजूर मुंबईहून कित्येक मैल लांब पायी उत्तर प्रदेशच्या दिशेला निघाल्याचं आपण बघितलं होतं. मजुरांच्या नशिबातलं वणवण अद्यापही कमी झालेलं दिसत नाही. उत्तर प्रदेशच्या बाराबांकी येथे तर प्रचंड मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. लखनऊ-अयोध्या महामार्गावर 135 प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला उभी असताना पाठीमागून एका भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामुळे मोठा हाहा:कार उडाला. जवळपास 18 लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. दुर्घटनेत जखमी आणि मृत्यू झालेल्यांमध्ये मजुरांची संख्या जास्त आहे. ते सर्व बिहारचे होते.

नेमकं काय घडलं?

135 प्रवाशांनी भरलेली एक ‘डबल डेकर’ बस पंजाबच्या लुधियाना येथून बिहारच्या दिशेला निघाली. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. बस डबल डेकर असल्याने काही प्रवासी वर तर काही प्रवासी खाली होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने उत्तर प्रदेशात बाराबांकी जिल्ह्यात रामसनेहीघाट क्षेत्रात बस खराब झाली. चालकाने बस रस्त्याच्या बाजूला लावली. चालक बस दुरुस्त करण्यासाठी खाली उतरला. यावेळी त्याने गाडी दुरुस्त करत असल्याचं सांगत सगळ्यांना झोपायला सांगितलं. त्यानुसार सर्व प्रवासी बसमध्ये झोपले होते. या दरम्यान रात्री बारा वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने बसला धडक दिली. त्यानंतर मोठा गदारोळ झाला. या दुर्घटनेनंतर अनेकांच्या ओरडण्याचा, किंचाळण्याचा तर कुणाचा रडण्याचा आवाज आला. परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत काही जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल

या दुर्घटनेचा आवाज इतका जोरात होता की परिसरातील स्थानिक नेमकं काय झालं ते बघण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय रस्त्याने जाणारे काही नागरिक घटनास्थळी थांबले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांपाठोपाठ अग्निशमन दलाचे जवानांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर जे गंभीर जखमी झाले होते त्यांची जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली.

सर्व प्रवासी बिहारचे

या दुर्घटनेत काही परिवार उद्ध्वस्त झाले. बसमधील बरेच प्रवासी मजूर होते. ते पंजाबमध्ये धान्याची पेरणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते आपापल्या घरी गावाकडे बिहारला निघाले होते. काम केल्यानंतर घरी जाण्याची ओढ ही वेगळीच असते. पण नियतीच्या मनात भलतंच काहितरी होतं. बसमधील मजूर भीषण अपघाताचे शिकार झाले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेतील बाधितांच्या कुटुंबियांसाठी मदतही जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनेप्रती शोक व्यक्त केला आहे.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांची नावे:

1. बिलट यादव 2. फकीरा महतो 3. लरामन मुखिया 4. रूदल सहानी 5. लक्ष्मी सहानी 6. खक्खन सहानी 7. मंगलराम 8. छितारू मण्डल 9. रतीचंद्र 10. हरिकेशन मण्डल 11. सीताराम 12. सुकल मुखिया 13. (उर्वरित सहा जणांची ओळख अद्याप समजू शकलेली नाही)

हेही वाचा : शेतातला बनावट दारुचा कारखाना उधळला, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त, धुळे पोलिसांची दणकेबाज कामगिरी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.