पवार-प्रशांत किशोर यांच्यात पावणे दोनतास खलबतं; विरोधकांच्या मंगळवारच्या बैठकीचा अजेंडा ठरला?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातील बैठक संपली आहे. तब्बल पावणे दोन तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली. (sharad pawar)
नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजनीतीकार प्रशांत किशोर यांच्यातील बैठक संपली आहे. तब्बल पावणे दोन तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत भाजपविरोधातील आघाडी निर्माण करण्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच उद्या मंगळवारी शरद पवार यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचा अजेंडाही या बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. (After meeting Prashant Kishor, Sharad Pawar calls for Opposition party meet tomorrow)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कालच दिल्लीत आले. त्यानंतर आज प्रशांत किशोर यांनी दुपारी 2 वाजता पवारांचं 6 जनपथ निवासस्थान गाठलं. यावेळी या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. 3.45च्या सुमारास ही बैठक संपली. बैठक संपल्यानंतर प्रशांत किशोर रिलॅक्स मूडमध्ये बैठकीतून बाहेर पडताना दिसले. त्यामुळे या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं आणि मोठी राजकीय रणनीती ठरल्याचं बोललं जात आहे. या बैठकीत भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्याविषयी चर्चा झाली. तसेच काँग्रेससोबत आल्यास आणि काँग्रेस सोबत न आल्यास काय रणनीती असेल त्यावरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच विरोधी पक्षांचं नेतृत्व पवारांकडेच कसं राहील यांचीही रणनीती या बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, यातील कोणत्याही तपशीलाला राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने दुजोरा दिलेला नाही.
उद्या बैठक
दरम्यान, शरद पवार यांनी उद्या दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी दुपारी 4 वाजता एका बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हाही उपस्थित राहणार आहे. राष्ट्रमंचच्या बॅनरखाली ही बैठक होणार आहे. उद्याच्या होणाऱ्या बैठकीसाठी राजदचे नेते तेजस्वी यादव यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, राजदचे खासदार मनोज झा उद्या दिल्लीत नाही. त्यामुळे ते बैठकीला येणार उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येतं.
सोनिया गांधींशी चर्चा करणार?
दरम्यान, उद्या होणाऱ्या बैठकीला काँग्रेसलाही आमंत्रित केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी पवार आज फोनवरून बोलून चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या शक्यता असल्या तरी उद्याच्या बैठकीवेळीच या बैठकीत कोणते राजकीय पक्ष सहभागी होतील हे स्पष्ट होणार आहे. (After meeting Prashant Kishor, Sharad Pawar calls for Opposition party meet tomorrow)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 21 June 2021 https://t.co/Z9QmN28e5z #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2021
संबंधित बातम्या:
(After meeting Prashant Kishor, Sharad Pawar calls for Opposition party meet tomorrow)