AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खान’ असल्यामुळेच शाहरुखच्या मुलावर कारवाई; महबूबा मुफ्तींचा केंद्रावर आरोप

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईवरून पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (Aryan Khan being 'targeted because of his surname: Mehbooba Mufti)

'खान' असल्यामुळेच शाहरुखच्या मुलावर कारवाई; महबूबा मुफ्तींचा केंद्रावर आरोप
Mehbooba Mufti
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 4:32 PM
Share

श्रीनगर: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईवरून पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केवळ नावात खान असल्यामुळेच शाहरुख खानचा मुलगा आर्यनवर कारवाई केली जात आहे, असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.

मेहबूबा मुफ्ती यांनी लखीमपूर हिंसेवरूनही केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार लखीमपूर खीरी हिंसेकडे दुर्लक्ष करत आहे. लखीमपूरमध्ये काय चाललंय हे सरकारला दिसत नाही. एका 23 वर्षीय मुलाला सरकारी एजन्सी टार्गेट करत आहेत, असं सांगतानाच केवळ काही मतदारांना खूश करण्यासाठी भाजप मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला.

काय म्हटलंय ट्विटमध्ये?

मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट करून केंद्रावर टीका केली आहे. चार शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला अटक करण्याऐवजी तपास यंत्रणा एका 23 वर्षाच्या मुलाला त्रास देत आहे. कारण त्याचं आडनाव खान आहे. न्यायाची खिल्ली उडवून केवळ आपल्या मतदारांना खूश करणअयासाठी भाजप मुस्लिमांना टार्गेट करत आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आर्यनचा मुक्काम वाढला

दरम्यान, आर्यन खानचा जामीन कोर्टाने पुन्हा फेटाळला. त्यामुळे आर्यनचा मुक्काम आणखी दोन दिवस म्हणजेच बुधवार 13 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्येच असेल. आर्यन खानच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी जामिनावर बुधवारी सुनावणी घेण्याची मागणी केली. विशेष कोर्टात आर्यनच्या जामिनावर बुधवारी दुपारी 2.45 वाजता सुनावणी होईल.

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंतची मुदत दिली. क्रूझ ड्रग्ज छापेमारी प्रकरणी बोलताना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, “आम्ही आणि फिर्यादी प्रयत्न करू की प्रकरण तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल.

आतापर्यंत किती वेळा कोठडीत वाढ

ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर देण्यात आलेल्या एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना कोठडी सुनावली होती. त्यानंतर आठ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने 14 दिवसांची कोठडी आरोपींना सुनावली.

संबंधित बातम्या:

Aryan Khan Drug Case | आर्यन खानला दिलासा नाहीच, कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Mumbai drugs case : आर्यन खानच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो, कोर्टात NCBचा मोठा दावा

Cruise Party EXCLUSIVE Video : आर्यन खानला NCB ने उचललं, त्या क्रुझ पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ

(Aryan Khan being ‘targeted because of his surname: Mehbooba Mufti)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.