Hindutvadi: राहुल गांधी म्हणाले, हिंदूंना सत्तेत आणायचं आहे, ओवैसी म्हणतात, हीच का तुमची धर्मनिरपेक्षता
आज सत्तेत हिंदुत्ववादी आहेत. ते हिंदू नाहीत. आता हिंदुंना सत्तेत आणायचं आहे, असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल गांधींच्या या विधानावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पलटवार केला आहे.
नवी दिल्ली: आज सत्तेत हिंदुत्ववादी आहेत. ते हिंदू नाहीत. आता हिंदुंना सत्तेत आणायचं आहे, असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल गांधींच्या या विधानावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पलटवार केला आहे. हीच का तुमची धर्मनिरपेक्षता? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जयपूरमध्ये महागाई हटाव रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी थेट हिंदुत्वावरच हल्ला करताना आपण हिंदू आहोत आणि हिंदूंची सत्ता आणायची आहे, असं विधान केलं होतं. त्यावर असदुद्दीन ओवैसी यांनी पलटवार केला आहे. ओवैसी यांनी ट्विट करून हल्ला चढवला आहे. काँग्रेस आणि राहुल गांधींनी हिंदुत्वाची पार्श्वभूमी तयार केली आहे. आता ते बहुसंख्यकवादाचे पीक कापण्याचं काम करत आहेत, असं ओवैसी म्हणाले.
धर्मनिरपेक्ष अजेंडा, वाह!
2021मध्ये हिंदुंना सत्तेत आणण्याचा धर्मनिरपेक्ष अजेंडा त्यांनी ठरवला आहे. वाह!, असा टोला लगावतानाच भारत देश सर्वांचा आहे. हा देश केवळ हिंदुंचा नाही. भारत हा सर्व धर्मियांचा आहे. तो जसा अस्तिकांचा देश आहे. तसा तो नास्तिकांचाही आहे, असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी जयपूरच्या रॅलीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्यासमोरच राहुल यांनी हिंदुत्वाची लाईन घेत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही सर्वजण हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेला एहेत. 2014मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले. पण हिंदू आजही सत्तेपासून दूर आहे. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचं आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. हिंदू सत्यासाठी मरत असतो. सत्य हाच त्याचा मार्ग आहे. तो जीवनभर सत्याच्या शोधात असतो. महात्मा गांधींचं संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात गेलं. हिंदुत्ववादी गोडसेने त्यांच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणं देणं नाही. हिंदू हा सत्याचा शोध घेत असताना कधीच कुणापुढे झुकत नाही. मात्र, हिंदुत्ववादी हा सदा द्वेषाने पछाडलेला असतो. कारण त्याच्या मनात भीती असते, असं राहुल गांधी म्हणाले.
Rahul & INC fertilised the ground for Hindutva. Now they’re trying to harvest majoritarianism. Bringing “Hindus to power” is a “secular” agenda in 2021. Wah!
India belongs to all Bharatiyas. Not Hindus alone. India belongs to people of all faiths & also those who have no faith pic.twitter.com/9EfpynChqU
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 12, 2021
संबंधित बातम्या:
Jaipur Rally: हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून घालवा, हिंदूंची सत्ता आणा; राहुल गांधींची हिंदूंना साद
Sharad Pawar | सहकुटुंब, सहपरिवार…भावुक झालेल्या पवारांनी सांगितलं 12 डिसेंबरचं मायाळू नातं…!