Zakir Naik: इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर केंद्राची बंदी, झाकीर नाईकला मोठा धक्का
इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईकला (Zakir Naik) केंद्र सरकारने जोरदार धक्का दिला आहे. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
नवी दिल्ली: इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईकला (Zakir Naik) केंद्र सरकारने जोरदार धक्का दिला आहे. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यूएपीए कायद्यांतर्गत (Unlawful Activities (Prevention) Act) ही बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल यांच्या ट्रिब्यूनलने सुनावणीच्या सुरुवातीलाच या प्रकरणावर भाष्य केलं होतं. त्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली.
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घातल्याची केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. देशाच्या सुरक्षेला प्रतिकूल असणाऱ्या कृत्यांमध्ये इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन सामिल आहे. त्यामुळे देशातील शांतता भंग होऊ शकतो. सांप्रदायिक सद्भाव बिघडू शकतो. तसेच देशाच्या धर्मनिरपेक्षतेला बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे यूएपीएच्या अधिनियम1967 (1967 च्या 37) च्या कलम 3 चे पोटकलम (1) द्वारा देाण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घातली आहे.
ट्रिब्यूनल कशासाठी?
बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी ट्रिब्यूलनची स्थापना् करण्यात आली होती. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला बेकायदेशीर घोषित करण्यासाठी पुरेसे कारण आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी ट्रिब्यूनलची स्थापना करण्यात आली होती. ही पडताळणी झाल्यानंतर असोसिएशन आणि ट्रिब्यूनलने बंदीची घोषणा केली आहे.
झाकीर नाईक द्वेष पसरवतोय
फाऊंडेशन आणि त्याचे सदस्य… खासकरून फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष झाकीर नाईक हा द्वेष पसरविण्याचं काम करत आहे. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. त्यामुळे देशाच्या अखंडता आणि सुरक्षेला हानी पोहोचू शकते, असं केंद्र सरकारने मान्य केलं आहे.
ही कारणं दिली
1. झाकीर नाईकने दिलेली भाषण द्वेष पसरवणारी आणि विध्वंसक असतात. 2. अशी भाषणे आणि विधानांमुळे नाईक विविध धार्मिक समूहांमध्ये वैर निर्माण करत आहेत. द्वेष पसवरण्याचं काम करत आहेत. भारत आणि विदेशातील एका विशेष धर्मातील तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यास भाग पाडलं जात आहे. 3. झाकीर नाईकने आंतरराष्ट्रीय सॅटेलाईट टीव्ही नेटवर्क, इंटरनेट, प्रिंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लाखो लोकांसमोर कट्टरपंथी विधाने केली आहेत. भाषण दिली आहेत.
फाऊंडेशनच्या कारवायांना आळा घातला नाही तर…
1. फाऊंडेशन आपल्या कारवाया सुरूच ठेवेल. तसेच फरार आहेत, अशा कार्यकर्त्यांना पुन्हा संघटीत करेल. 2. लोकांच्या मनात सांप्रदायिक वैमनस्याची भावना निर्माण करून लोकांना भडकावून देशाच्या धर्मनिरपेक्षतेला भंग करू शकतात. 3. देश विरोधी भावनाचा प्रचार केला जाईल 4. उग्रवादाचं समर्थन करून फुटीरतेला खतपाणी घातलं जाईल 5. देशची संप्रभुसत्ता, अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवाया केल्या जाईल.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 20 December 2021#Fastnews #News https://t.co/ZVrpFyfwmI pic.twitter.com/Wk8deOGk4T
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 20, 2021
संबंधित बातम्या:
#LoveisLove | ‘हो, आम्ही ऑफिशीअली एकमेकांचे झालो!’ समलैंगिक जोडप्याचा शाही विवाहसोहळा
Girl Suicide | लैंगिक छळाला कंटाळून अकारावीतील मुलीनं जीव दिला! सुसाईड नोटमुळे गुंता वाढला