Narayan Rane: नारायण राणेंना 8 कमांडोंचं सुरक्ष कवच; केंद्राकडून राणेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राणेंना केंद्राने झेड सुरक्षा दिली आहे. यापूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती.
नवी दिल्ली: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राणेंना केंद्राने झेड सुरक्षा दिली आहे. यापूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. त्यामुळे राणे यांना आता दोन ऐवजी आठ जवानांची सुरक्षा असणार आहे.
नारायण राणेंना या पूर्वी वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र ठाकरे सरकारने राणेंना रत्नागिरीत अटक केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने राणेंच्या सुरक्षेचा आढावा घेत त्याबाबतचा अहवाल मागितला होता. त्यानंतर राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना वाय वरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आधी राणेंच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे दोन कमांडो होते. आता त्यांची संख्या वाढून आठ झाली आहे.
काय घडलं होतं रत्नागिरीत?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
त्यामुळे राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, राणेंनी अटक होण्यापूर्वी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने राणेंचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटींसह जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला. जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या होत्या. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करू नका असं निर्देश दिले होते.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 December 2021#FastNews #News pic.twitter.com/fGhU1br1IW
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 4, 2021
संबंधित बातम्या:
Devendra Fadnavis: संजय राऊतांचे नेते बदलले; देवेंद्र फडणवीसांनी घेतली तीन नेत्यांची नावे
CCTV | कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
Satej Patil : सतेज पाटील कोल्हापूर जिल्हा बँकेतही बिनविरोध? विजयाची औपचारिकता बाकी