नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या; उद्धव ठाकरेंचं शहांसमोर सादरीकरण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. (cm uddhav thackeray demand 1300 cr for development in naxalite area)

नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या; उद्धव ठाकरेंचं शहांसमोर सादरीकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 1:08 PM

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (cm uddhav thackeray demand 1300 cr for development in naxalite area)

केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरण केलं. नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्गम भागात नवीन पोलीस पोस्ट स्थापन करणे, नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक मोबाईल टॉवर बसवणे, नवीन शाळा बांधण्यावर भर देणे आदींसाठी हा निधी लागणार आहे. त्याबाबतचे सादरीकरणच मुख्यमंत्र्यांनी शहांना दिलं.

ममता बॅनर्जी गैरहजर

दरम्यान, या बैठकीला उद्धव ठाकरेंशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित आहेत. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जनगमोहन रेड्डी, केरळचे मुख्यमंत्री ओमाना चांडी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

वैयक्तिक चर्चा होणार का?

मराठा आरक्षण आणि अन्य महत्वाच्या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर जवळपास अडीच महिन्यांनी मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी होते आहे. गेल्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींशी जवळपास अर्धा तास व्यक्तीगत चर्चा केल्याने त्यांची दिल्ली वारी बरीच चर्चेत राहिली. सध्या पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने आयोजित केलेल्या आजच्या बैठकीनंतर अमित शाह यांच्याशी उद्धव ठाकरेंचा व्यक्तिगत संवाद होतो का ? याबाबत उत्सुकता असेल. मुख्यमंत्री बैठकीनंतर दुपारी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आज 26 सप्टेंबर रोजी देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देतील. (cm uddhav thackeray demand 1300 cr for development in naxalite area)

संबंधित बातम्या:

Uddhav Thackeay Delhi Visit : अमित शहा यांनी बैठक बोलावली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर

‘त्या’ पत्रामुळे चंद्रकांतदादांचेच धोतर सुटले, महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा! किती मनोरंजन कराल?; राऊतांची शेरेबाजी सुरूच

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांसोबतही बैठक, नेमकं कारण काय?

(cm uddhav thackeray demand 1300 cr for development in naxalite area)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.