गुरु पौर्णिमेच्या दिवशी दुष्कर्म, आसाराम बापूंना 22 वर्ष जुन्या प्रकरणात जन्मठेप

अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम बापूवर एका पीडितेने दुष्कर्म केल्याचा आरोप केला होता. आसाराम बापू गेल्या १० वर्षापासून तुरुंगात आहे. आसाराम बापूवर दोन महिलांसोबत दुष्कर्म केल्याचा आरोप होता. ज्यामध्ये आसाराम बापूला दोषी ठरवण्यात आलंं आहे.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी दुष्कर्म, आसाराम बापूंना 22 वर्ष जुन्या प्रकरणात जन्मठेप
आसाराम बापू
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 5:03 PM

अहमदाबाद : अहमदाबादच्या मोटेरा येथील आश्रमात एक महिला शिष्य सोबत दुष्कर्म केल्याप्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर सेशन कोर्टाने आसाराम बापू यांना ही शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये पीडित महिला शिष्याने आसाराम बापूच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आधी जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तर आसाराम बापूला दोषी ठरवण्यात आलं आहे. आसाराम बापू सध्या जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

22 वर्ष जुन्या प्रकरणात दोषी

महिला शिष्यने 2001 मध्ये तिच्यावर आसाराम बापूकडून दुष्कर्म केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. या पीडित महिलेने एकूण 7 जणांविरोधात आरोप केले होते. त्यापैकी 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. कोर्टाने आसाराम बापूविरोधात 342, 357, 376, 377 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी दुष्कर्म

पीडितेने केलेल्या आरोपानुसार, आसाराम बापूने गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझी वक्ता म्हणून निवड केलं होती. त्यानंतर तिला फार्महाऊसमध्ये बोलवलं. आश्रमचा एक व्यक्ती तिला या ठिकाणी घेऊन आला. आसाराम बापूने यानंतर तिला खोलीत बोलवलं. एका वाटीत तूप घेण्यास सांगितलं. त्यानंतर डोक्याची मालीश करण्यासाठी सांगितले. यानंतर तिच्यासोबत दुष्कर्म करण्यास सुरुवात केली. मी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी समर्पण करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

जोधपूर जेलमध्ये बंद

आसाराम बापू सध्या आणखी एका दुष्कर्म प्रकरणात जोधपूर जेलमध्ये बंद आहे. कोर्टाने 16 वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मागील दहा वर्षापासून आसाराम बापू जेलमध्ये बंद आहे. अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केला गेला. पण सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला. पण आता आसाराम बापू यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

कोण आहे आसाराम बापू?

आसाराम बापू हे अध्यात्मिक गुरु असल्याचा दावा करतात. त्यांचे भारतात लाखो अनुयायी आहेत. आसाराम बापू सत्संगच्या माध्यमातून लोकांना अध्यात्माबाबत मार्गदर्शन करत असत. याआधीही ते काही वेळा वादात सापडले होते. आसाराम बापू यांचे अनुयायी आजही त्यांच्या विरोधातील आरोप हे चुकीचे असल्याचं सांगतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.