Jaipur Rally: हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून घालवा, हिंदूंची सत्ता आणा; राहुल गांधींची हिंदूंना साद

देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. त्यामुळे या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा. देशात पुन्हा हिंदुंची सत्ता आणा, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं.

Jaipur Rally: हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून घालवा, हिंदूंची सत्ता आणा; राहुल गांधींची हिंदूंना साद
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 2:44 PM

जयपूर: देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. त्यामुळे या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा. देशात पुन्हा हिंदुंची सत्ता आणा, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं.

जयपूर येथे काँग्रेसने महारॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या रॅलीत बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीही यावेळी उपस्थित होत्या. जयपूरच्या विद्यानगर स्टेडियममध्ये ही रॅली सुरू आहे. रॅलीच्या भोवती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मोठे मोठे पोस्टर लावले होते. तसेच रॅलीला हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्ही सर्वजण हिंदू आहात. हिंदुत्ववादी सत्तेचे भुकेला एहेत. 2014मध्ये हिंदुत्वावादी सत्तेत आले. पण हिंदू आजही सत्तेपासून दूर आहे. आपल्याला या हिंदुत्ववाद्यांना हटवून हिंदूंना सत्तेत आणायचं आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

हिंदुत्ववादी द्वेषाने पछाडलेले

हिंदू सत्यासाठी मरत असतो. सत्य हाच त्याचा मार्ग आहे. तो जीवनभर सत्याच्या शोधात असतो. महात्मा गांधींचं संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात गेलं. हिंदुत्ववादी गोडसेने त्यांच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणं देणं नाही. हिंदू हा सत्याचा शोध घेत असताना कधीच कुणापुढे झुकत नाही. मात्र, हिंदुत्ववादी हा सदा द्वेषाने पछाडलेला असतो. कारण त्याच्या मनात भीती असते, असं राहुल गांधी म्हणाले.

हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवीय

आपल्याला घाबरवलं जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे. त्यांना सत्य नको आहे. त्यांचा मार्ग सत्याग्रहाचा नाही. तर सत्ता ग्रहचा आहे. हिंदू नेहमीच भयाशी संघर्ष करत असतो. ते महादेवाप्रमाणे भयाचं प्राशन करतो, असंही त्यांनी सांगितलं.

गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्वादी

यावेळी त्यांनी गांधी आणि गोडसेंमधील फरकही समजावून सांगितला. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन शब्दांची आत्मा एक सारखी असूच शकत नाही. मी हिंदू आहे. पण हिंदुत्ववादी नाही. या देशात या दोन शब्दांचा संघर्ष आहे. एक शब्द आहे हिंदू आणि दुसरा आहे हिंदुत्ववादी आहे. हे दोन्ही शब्द एक नाहीये. हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदुत्ववादी होता, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नेहरू सेंटरच्या कार्यक्रमात अजित पवार यांचं दाटलेल्या आवाजातल भाषण …

Sharad Pawar | सहकुटुंब, सहपरिवार…भावुक झालेल्या पवारांनी सांगितलं 12 डिसेंबरचं मायाळू नातं…!

Sharad Pawar Birthday : ‘शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक’

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.