VIDEO: तो असंसदीय शब्द नाही, मी वापरलेला शब्द योग्यच, काय तक्रार करायची ती करा; राऊतांनी फटकारले
शिवसेना नेते संजय राऊत यांनी वापरलेल्या एका शब्दाला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपने केली आहे.
नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत यांनी वापरलेल्या एका शब्दाला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही भाजपने केली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत आपल्या शब्दावर कायम आहेत. मी वापरलेला शब्द असंसदीय नाही. तो शब्द योग्यच आहे. काय तक्रार करायची ती करा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजप नेते आणि ट्रोलर्सवर टीका केली होती. त्यांनी टीकाकारांना Xतिया असा शब्द वापराल होता. त्यानंतर भाजपने त्याला आक्षेप घेऊन राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत राऊत यांनी टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया देताना आपली भूमिका स्पष्ट केली. हे अशिक्षित अडाणी लोकं आहेत. ते हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात. पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश उघडले, पाहिले, चाळले तर मी वापरलेला शब्द असंसदीय नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख, पढत मूर्ख, शतमूर्ख असाच आहे. पण हे लोक ते समजून घेत नाहीत, असा चिमटा राऊतांनी काढला.
बाळासाहेबांनी शब्द भांडार दिलंय
ज्या प्रकारे काही दिवसांपासून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा शब्द योग्यच आहे असं मला वाटलं. सोपा शब्द आहे. लोकांना पटेल, कळेल, त्यांनाही समजेल की आपण काय आहोत. म्हणून तो शब्द वापरला. मला सोपं बोलण्याची सवय आहे. बाळासाहेब ठाकरे माझे गुरू आहेत. त्यांचे शब्द भांडार आपल्याला माहीत आहे. ते गुरू असल्यामुळे हे शब्द भांडार आम्ही त्यांच्याकडून घेतलं आहे. त्यातील काही शब्द विरोधी पक्षांना चपखल बसतात. म्हणून बघा ना त्यांना लागलं. आम्ही तेच आहोत… आम्ही तेच आहोत… आम्ही तेच आहोत… हे त्यांनी स्वीकारलंय. ते तेच आहेत. म्हणून त्यांनी तांडव सुरू केलं आहे. मूर्ख बोलणं हा काही असंसदीय शब्द आहे का? शब्द कोशात एका शब्दाला वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढले जातात. त्याचे पर्यायी शब्द असतात. त्याची मांडणी असते, असं त्यांनी सांगितलं.
मला वाटलं ते सुशिक्षित असतील
या लोकांनी अभ्यास केला पाहिजे. भाजप हा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. त्यांचं वाचन चांगलं आहे. ते रामभाऊ म्हाळगी सारखी संस्था चालवतात. तिथे सुक्षित कार्यकर्ते निर्माण करतात, असं मला वाटत होतं. पण अशा प्रकारचे… म्हणजे मी म्हणालो तसे कार्यकर्ते ते निर्माण करतात हे मला माहीत नव्हतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
योगींनीच तो शब्द अनेक वेळा वापरला
महाराष्ट्राला संस्कार आणि संस्कृतीची परंपरा आहे. तुम्ही शिकलं पाहिजे. शिकाल तर मोठे व्हाल. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा हा शब्द वापरला आहे. त्यांचे पंधरा ट्विट दाखवेन. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे हा शब्द वापरला आहे. भाजपच्या उत्तर प्रदेशातील अनेक नेत्यांनी हा शब्द वापरला आहे. कारण तिथला ग्रामीण भागातील तो शब्द आहे. आम्ही इथे वापरला. मी दिल्लीत आहे. महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात असतो तर कदाचित हा शब्द नसता वापरला. पण इथली ती बोलीभाषा आहे. त्यामुळे सर्वांना समजेल उमजेल असा शब्द वापरला. तो शब्द योग्यच आहे. कुणाला काही तक्रार करायच्या असतील तर कराव्यात. माझी काही अडचण नाही. पण त्यांनी शब्दकोश चाळावेत. नसतील तर त्यांना शब्दकोश पाठवून देईन, असा टोलाही त्यांनी हाणला.
दुनिया में चुतियोंकी कमी नही एक धूंडो तो हजार मिलेंगे… जरा योगिजी को सूनीये.. pic.twitter.com/jd1R9bFAI8
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 9, 2021
यातच विरोधकांचं आयुष्य चाललंय
तुमच्याविरोधात भाजपने गदारोळ सुरू केला आहे. तक्रार करण्याची मागणीही केली आहे, असं राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर, ते म्हणाले की, त्यांनी देश पेटवावा. काम काय त्यांना. एखाद्याला मूर्ख म्हटल्यावर ते जर देश पेटवणार असेल तर त्यांनी देश पेटवावा. त्यांच्याकडे आता काही काम नाही. त्यांची डोकी कामातून गेली आहेत. सरकार येत नाही. विरोधी पक्ष झोपलेला आहे. काय करावं ते त्यांना कळत नाही. खरं तर त्यांना विधायक कामं करता येईल. हे निरुद्योग आहेत. कोणी तरी कोल्हापुरात काय तरी बोलतोय अन् मुंबईतून कोणी त्यावर प्रतिक्रिया देत आहे. यातच विरोधकांचं आयुष्य चाललं आहे. त्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्याला काय करू शकतो, असा टोलाही त्यांनी हाणला.
तोंडात कवळ्या असणाऱ्यांनी बोलू नये
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. या वाघाच्या जबड्यात हात घाला. आमचे दात मोजा. प्रत्येक शिवसैनिक वाघ आहे. मोजा आमचे दात, प्रयत्न करा. ज्यांच्या तोंडात कवळ्या आहेत, त्यांनी दुसऱ्यांच्या दातांची पर्वा करू नये. आमचे दात मजबूत आणि ओरिजनल आहेत. कुठेही गडबड नाही. विरोधकांना कच्चे चावून खाऊ. आमची ताकद कायम आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. हे समजून घ्या. आमच्याकडे उधार उसनवारी नाही. आमचे प्रत्येक अवयव जागच्या जागी आहेत. तुम्ही तुमचे अवयव सांभाळा, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
VIDEO: शरद पवारांना खुर्ची दिली, संजय राऊत ट्रोल; राऊत म्हणतात, XXगिरी बंद करा!
Obc Reservation: तर सर्वच निवडणुका पुढे ढकला; ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ आक्रमक