काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा
जे वैफल्य ग्रस्त असतात. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात.
पणजी: जे वैफल्य ग्रस्त असतात. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात (maharashtra) त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी स्पष्ट केलं. 2024मध्ये ज्या निवडणूक होणार आहेत, त्यातही दिल्लीतील चित्रं बदलून जाईल. त्यांनी महाराष्ट्र विसरून जावं आता. ठिक आहे 100 लोकं जिंकतील, 75 लोकं जिंकतील अजून काही करतील पण महाविकास आघाडी (mahavikas aghadi) हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. युतीची कसलीही चर्चा नाही. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वगैरे असं काही नसतं. आमच्याकडून कोणी परस्पर कमेंट करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजप युतीत आम्ही थोडंफार एकत्र होतो. एकत्र नांदलो. हे जे काही नातं होतं ते भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त लोकं असतात, निराश मनाने राजकारण करणारे असतात, त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशा असते, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.
स्थानिक राजकारणाच्या नावाखाली भ्रष्ट हातमिळवणी
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगराध्यक्ष जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी एक पत्रक जारी केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे चांगलं पाऊल आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन ही भूमिका घेतली. स्थानिक राजकारणाच्या नावाखाली अनेकदा भ्रष्ट हातमिळवण्यात होत असतात. युतीत असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. अशा प्रकारची मनमानी आता चालणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या 23 जानेवारीच्या भाषणात स्पष्ट संदेश आणि संकेत दिले आहेत. शिवसेनेकडून असं काही होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही घ्यावी. नगरपरिषदेत सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून यावेत यासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
निवडणूक आयोग गुलाम
उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचा निवडणूक अर्ज बाद झाला आहे. त्यावरूनही त्यांनी हल्ला चढवला. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पण तिकडे भाजप अडचणीत आहे. त्यामुळे ते आमच्या तक्रारीची दखल घेत नाही. आयोग साधी सुनावणीही करत नाही. पुरावे समोर ठेवूनही सुनावणीला घ्यायला तयार नाही. मेरठ, मथुरास, बिजनौर, नोएडा उमेदवार गेले. ही मनमानी आणि हुकूमशाही आहे. निवडणूक आयोग गुलाम झाल्याचं लक्षण आहे, असा हल्ला त्यांनी चढवला आहे.
‘झुकेंगे नही’ हाच सेनेचा बाणा
‘झुकेंगे नही’ हा पुष्पातील डायलॉग हा शिवसेनेच्या बाण्यावरून घेतला असावा. ‘झुकेंगे नही’ हा आमचा गेल्या 50 वर्षापासूनचा नारा आहे. संजय राऊतांचा तर तो नाराच आहे. कशाला झुकायचं? का झुकायचं? आमचे काही उमेदवार बाद झाले असतील पण आम्ही लढू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा TV9 मराठीवरhttps://t.co/dHdeMGPxGD#Maharashtra | #News | #Live | #Mumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 31, 2022
संबंधित बातम्या:
बाबा, माझा चेहरा शेवटचा बघून घ्या, वडिलांना फोन करुन मॉडेलची सहाव्या मजल्यावरुन उडी