मोदींच्या भेटीनंतर आणि पवारांच्या भेटीआधी गडकरींशी खलबतं; ममतादीदींच्या भेटीगाठींमागचा राजकीय संदेश काय?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विजयानंतर पहिल्यांदाच दिल्लीत आल्या आहेत. दिल्लीत आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या राजकीय भेटीगाठी या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. (mamata banerjee Meets Nitin Gadkari)
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विजयानंतर पहिल्यांदाच दिल्लीत आल्या आहेत. दिल्लीत आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या राजकीय भेटीगाठी या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ममतादीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याआधी त्यांनी गडकरी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ममता बॅनर्जींच्या या भेटीगाठीच्या क्रमामागे काही राजकीय खेळी आहे का? की चकवा देण्याचा हा प्रयत्न आहे? अशी चर्चा या निमित्ताने जोर धरू लागली आहे. (mamata banerjee Meets Nitin Gadkari in Delhi to Push for Road, Infra Projects in West Bengal)
ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत आल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या विविध विकास प्रकल्पांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. कालच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. गडकरी यांची भेट घेऊन ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील रस्ते आणि पायाभूत सुविधांवर चर्चा केल्याचं सांगण्यात आलं.
पवार, राऊतांनाही भेटणार?
ममता बॅनर्जी या गडकरींच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रसिद्ध गीतकार, संवाद लेखर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची भेट घेणार आहेत. त्या शिवसेना नेते संजय राऊत यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. ममतादीदींच्या या भेटीगाठी होत असतानाच त्यांच्या भेटीगाठीवर काही प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. मोदींना भेटल्यानंतर ममता दीदी थेट गडकरींना भेटल्याने चर्चा होत आहे. मोदींना भेटल्यानंतर गडकरींना भेटण्यामागचं नेमकं कारण काय? पवारांच्या आधीही गडकरींना भेटण्यामागचा हेतू काय? यातून काही राजकीय संकेत तर ममतादीदींना द्यायचे नाहीत ना?, असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत.
राऊत काय म्हणाले?
दरम्यान, सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना ममतादीदी आणि गडकरी भेटीबाबत विचारण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांचे शरद पवारांशी जिव्हाळ्याशी संबंध आहेत. उद्धव ठाकरेंशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नुसती भेट घेतली की भेट झाली यावर नाती टिकत नसतात. त्यांचे संबंध सर्वांशी चांगले आहेत. भेटीगाठी होत राहतात. अजून दोन दिवस आहेत त्या दिल्लीत. त्या गडकरींना भेटल्यातर तुम्हाला त्याची चिंता का? असा सवाल करतानाच राज्याच्या मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत येतात. तेव्हा आपल्या राज्यातील अनेक विकास कामांची जंत्री घेऊन येतात. गडकरींकडे महामार्ग रस्ते, पायाभूत सुविधा हे खातं आहे. बंगालमधील अशा कामासाठी त्या गडकरींना भेटत असतील तर मीडिया आणि राजकारण्यांना भुवया उंचावण्याचं काही कारण नाही, असं ते म्हणाले. ममता दीदी उद्धव ठाकरेंना भेटणार का मला माहीत नाही. पण जेव्हा ममतादीदी मुंबईत येतात तेव्हा त्या उद्धव ठाकरेंना भेटतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (mamata banerjee Meets Nitin Gadkari in Delhi to Push for Road, Infra Projects in West Bengal)
Chief Minister of West Bengal Sushri @MamataOfficial called on Union Minister Shri @nitin_gadkari Ji today. In the presence of officials they reviewed various road projects being undertaken in the state. pic.twitter.com/ueDD4jTys0
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) July 29, 2021
संबंधित बातम्या:
उत्तर प्रदेशात सपा, राष्ट्रवादी, राजदची आघाडी; संजय राऊत म्हणतात, या आघाडीला पाठिंबा का द्यावा?
सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अमोल कोल्हे म्हणतात, अभिमान असेल, पण…
(mamata banerjee Meets Nitin Gadkari in Delhi to Push for Road, Infra Projects in West Bengal)